WhatsApp Buddies- सुसाईड इज नॉट द सॉल्युशन..

    07-Apr-2017   
Total Views | 1


 
आई बाबा I am so sorry.. I could not fullfill your dreams.. मी चुकले.. मला माफ करा.. मी जातेय... असा मॅसेज सौम्याने टाईप केला.. आणि ती तो सेंड करणार इतक्यात मागून ताई आली. सौम्या रडत होती.. खूप रडत होती.. काही कळतच नव्हतं तिला.. काय करु काय नको ते.. ताई घाबरली.. ताईला काही केल्या कळेना.. आई बाबा गावाला गेले होते, ताई कोचिंगला गेली असणार असा विचार करुन सौम्याने काही बाही ठरवलं होतं. पण ताईची कोचिंग कॅन्सल झाली आणि खऱ्या अर्थाने सौम्याचा जीव वाचला..

ताईने तिचा फोन हिसकावून तो मॅसेज वाचला.. आणि ताईच गार पडली.. काय झालंय सौम्या बोल.. असं करु नकोस.. मूर्ख आहेस का तू? आई बाबा जीव देतील स्वत:चा तू असं केलस तर.. आणि हे पंख्याला काय बांधून ठेवलंयस काढ ते.. लग्गेच काढ.. ताईची धावपळ सुरु झाली.. सौम्या अजूनही रडत होती.. 

ताईने तिला शांत केलं.. तिला हा असला विचार डोक्यात येण्यामागचं कारण विचारलं आणि जे काही समोर आलं ते भीषण होतं... सौम्याचं आशुतोष वर अमाप प्रेम होतं. जीवापाड.. अवघ्या १८ वर्षाच्या वयात त्याच्या सोबत आपण संपूर्ण आयुष्य काढू शकतो हे तिला पटलं होतं.. जेमतेम वर्ष झालं होतं त्यांच्या रिलेशनशिपला. आणि हळू हळू आशुतोषनं सौम्याकडे तिचे निरनिराळे फोटोज मागण्याची सुरुवात केली. आधी ऑफशोल्डर टॉप पासून ते पुढे अगदी लिमिट क्रॉस होई पर्यंत.. पण आपण जर हे केलं नाही तर आशुतोष आपल्याला सोडून जाईल, या भितीने सौम्यानं त्याच्या सगळ्या डिमांड्स पुरवल्या. आणि आज तेच तिच्या अंगाशी आलं होतं. "तू मला एकट्यात हॉटेलच्या रुममध्ये भेट नाही तर तुझे सगळे फोटोज इंटरनेटवर टाकीन अशी धमकी सौम्याला आशुने दिली होती." त्याने असं केलं तर आई बाबा कोणाला तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाही हे कळताच सौम्याला स्वत:ला संपवणं जास्त योग्य वाटलं.. गेले कित्तेक महीने ती याच प्रेशर खाली जगत होती.. 
 
ताईला हे सगळं कळताच ती सुन्न झाली... सौम्या ऐक.. तू चुकीच्या मुलावर प्रेम केलं आहेस.. प्रेम हे असं नसतं... हे सगळं चूक आहे.. यातून बाहेर पडायला हवं. तू गेली असतीस तरी त्याने इंटरनेटवर फोटोज टाकलेच असते. मग काय केलं असतं आम्ही? पण सौम्या काही समजून घेण्याच्या मन:स्थितीतच नव्हती. ताईला धोक्याची घंटा जाणवली. तिने लगेच तिच्या सायकोलॉजिस्ट मैत्रीणीला फोन केला. धावतच ती आली.. तिने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला.

पुढे सौम्याच्या ताईने आई बाबांना सगळं सांगितलं.. आधी ते खूप चिडले पण आपल्या पोरीच्या जीवापेक्षा काही महत्वाचं नाही हे लक्षात घेवून त्यांनी त्वरित पोलिस कंप्लेंट केली. पोलिसांनी ते सगळे फोटोज डिलीट करुन घेतले.. संपूर्ण चौकशी झाली.. कारवाई झाली आणि सौम्या वाचली.. या सगळ्या प्रकरणामुळे सौम्या डिप्रेशनमध्ये गेली होती. तिच्या मेंटल हेल्थचं महत्व लक्षात घेता ताईच्या मैत्रीणीच्या मदतीनं तिच्या डिप्रेशन वर उपचारही झाले..

एक सौम्या तर वाचली पण अशा कितीतरी सौम्या आहेत ज्या अशा प्रकरणाच्या बळी पडतात, आणि त्यांचे आई वडील जन्मभर रडत राहतात. त्यामुळे प्रत्येक अशा सौम्याने स्वत:चं महत्व लक्षात घ्यावं. प्रेम हे असं विद्रुप नसतं.. ते खूप pure असतं.. ते तसं नसल्यास ते प्रेमच नाही हे ही लक्षात घेतलं पाहीजे.. आणि अशा गोष्टींबद्दल गप्प न राहता, बोललं पाहीजे. आपल्या जवळच्या व्यक्तींना विश्वासात घेणं गरजेचं आहे...

डिप्रेशन सारख्या आजारावर सुसाइड हा उपाय नाही... बोललं तर अशा अनेक सौम्या कदाचित वाचतील.. 
 
आपण त्यांना वाचवूयात... 
 
- निहारिका पोळ

निहारिका पोळ

रानडे इन्टिट्यूट पुणे विद्यापीठातून पत्रकारितेत पद् व्युत्तर शिक्षण. सध्या वेब मुंबई तरूण भारत येथे उपसंपादक. मूळ गाव जबलपूर. कथक नृत्यात अलंकार. कला, संस्कृती, युवांशी संबंधित विषयांवर लिहिण्याची आवड. 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121