कधी असं झालंय का? तुम्ही प्रवासात आहात, अचानक गाडी खराब झाली, भरपूर पाऊस आहे, फोनची बॅटरी ही डाऊन आहे, आणि जवळपास एका झोपडी शिवाय काहीच नाही. अगदी फिल्मी हॉरर स्टोरी हो ना?.. अशाच एका कथेवर आधारित हा लघुपट आहे "द गेस्ट" मुंबई फिल्म फेस्टिवल मध्ये या लघुपटाला पुरस्कार मिळाला आहे. "लार्ज शॉर्ट फिल्म" यांनी प्रदर्शित केलेला, अय्यप्पा के.एम. यांचा हा लघुपट रोमांचक आहे. एक माणूस एका म्हाताऱ्या बाईच्या घराकडे मदतीसाठी जातो..
पण खरी गम्मत या पुढे आहे.. एका म्हातारीच्या चांगल्या सुंदर घरात "त्याला" आडोसा तर मिळतो, आणि तो रात्री मुक्काम करतो.. पुढे? तुमच्या सोबतही असं झालं तर तुम्ही काय कराल?