WhatsApp Buddies- प्लीज ट्रस्ट मी..

    21-Apr-2017   
Total Views | 1


निशा listen to me.. अगं ऐकून तर घे.. अगं तो कॉन्टेक्स्टच वेगळा होता.. please trust me.. आरव गयावया करत निशाला म्हणाला. पण ती इतकी चिडलेली होती, की काही ऐकूनच घ्यायला तयार नव्हती. आरव this was the limit.. I am blocking you.. असं म्हणत निशाने आरवला ब्लॉक केलं.. ती रडत होती, चिडलेली होती, अपसेट होती.. आणि अनेक विचार तिच्या डोक्यात घोळत होते..


 
मी फोन चेक केला ते बरंच झालं. मनातल्या मनात ती स्वत:लाच म्हणाली. काय गरज होती तिच्याशी बोलायची.. she was ur ex yar..  आणि बोलला तर मला सांगितलं का नाही.. असे अनेक विचार मनात असतानाच आरव चे १२ फोन तिने कट केले होते. शेवटी असह्य होवून तिने फोन रिसीव्ह केला.. रडतच ती म्हणाली, का सारखा कॉल करतोयेस? प्लीज I dnt wanna talk to u arav.. you broke me.. 

निशा, अर्पिता is getting married.. तिचा त्यासाठी मॅसेज आलेला. आणि मी ही तेवढाच रिप्लाय केलेला. Ohh right म्हणूनच nostelgic झालेलास ना.. तिने चिडून म्हटलं. निशा मी तिला आपल्या बद्दल सांगत होतो.. इतक्यात माझा फोन हँग झाला.. आणि सगळे मॅसेजेस आपोआप उडाले.. आणि पुढे जे तू वाचलं ते मी आपल्या बद्दल तिला म्हणालो... की I wish we could get married soon.. I am still trying my best.. I hope the day will come soon.. हे मी आपल्या बद्दल तिला सांगत होतो.. जरा तरी विश्वास ठेवशील का..? I seriously wish.. माझ्याकडे आत्ता ते मॅसेजेस असते.. निशाला समजावण्याच्या सुरात तरीही थोडं वैतागून आरव म्हणाला..

मग मला का सांगितलं नाहीस? मी सोबत असतानाही तू तिच्याशी का चॅट करत होतास. बरं.. करत होतास.. पण मला सांगायचस ना हे सगळं.. निशा रडत रडत म्हणाली.. अगं निशा तू वेळ दिलास का मला.. मी वॉशरूमला गेलो तितक्यात तू फोन चेक केलास.. I am sorry... तू सोबत असताना तो वेळ मी पूर्णपणे तुला द्यायला हवा होता.. मला तेव्हा बोलायला नको होतं.. please try to understand na...

आरव... leave it.. I am sorry for checking your phone.. पण माझ्याकडे दुर्लक्ष केलस तू तेव्हा मला काय वाटणार.. सोड..

सॉरी ना निशा..

त्यांचं भांडण तर मिटलं पण या व्हॉट्सअॅप मॅसेजेसने, फोन चेक करण्याने आणि या भांडणाने संशयाचा ज्या कीड्याने त्यांच्या नात्यात प्रवेश केला होता.. तो त्यांच्या नात्याला आणखी पोखरणार तर नाही ना?... 

निहारिका पोळ

रानडे इन्टिट्यूट पुणे विद्यापीठातून पत्रकारितेत पद् व्युत्तर शिक्षण. सध्या वेब मुंबई तरूण भारत येथे उपसंपादक. मूळ गाव जबलपूर. कथक नृत्यात अलंकार. कला, संस्कृती, युवांशी संबंधित विषयांवर लिहिण्याची आवड. 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121