नाद बागेश्री- २२ एप्रिल, Earth Day

    20-Apr-2017   
Total Views |

पृथ्वीच्या रोजनिशी मधून -

२२ एप्रिल, Earth Day

आज २२ एप्रिल. दर वर्षी प्रमाणे, आजही माझी मुले ‘अर्थ डे’ म्हणून माझा दिवस साजरा करणार.

आज रोजनिशी चाळली, तर मागच्या पानांवर हे लिहिलेले सापडले –


अति प्रचंड कचऱ्याची निर्मिती आणि त्यात प्लास्टिकचे प्रमाण भरपूर. कचऱ्याच्या ढिगाचे तापमान आधीच वाढत असते. त्यात प्लास्टिक लवकर पेट घेते. अनेक कारणांपैकी, माहित असलेले, आगीचे हे एक कारण आहे.   

Bad News अशी की, आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काही करणार आहेत, त्या कशानेही कचऱ्याच्या ढीगाची समस्या सुटणार नाही.

आणखीन एक Bad News अशी की, कचऱ्याच्या ढीगाने – दुषित जमीन, दुषित पाणी आणि दुषित वायुचा त्रास प्रत्येकाला आहे.

अजून एक Bad News अशी की, कचऱ्याच्या ढीग उंच करण्यात प्रत्येकाचा हातभार आहे.

 

तर आता Good News! कचऱ्याच्या समस्येचे उत्तर प्रत्येकाकडे आहे.

आणि उपाय अतिशय सोपा आहे.

 

फक्त खालील तीन गोष्टी केल्या, तरी त्या ढिगाऱ्यात पडणारा कचरा कमी होईल-

  • कचऱ्याचे वर्गीकरण घरात करा!
  • घरातला ओला कचरा घरात जिरवा!
  • प्लास्टिकचा, कागद, काच, कापडाचा कचरा Recycle करा.  

 

घरोघरी असे केले तरच Earth Day साजरा करण्यात ‘अर्थ’ आहे!

 

 

- दिपाली पाटवदकर

दीपाली पाटवदकर

संतसाहित्य, खगोलशास्त्र, भूमिती, इतिहास व चित्रकला या सर्वाचा मिलाफ त्यांच्या लिखाणात आहे. ‘चित्र ज्ञानेश्वरी’ हे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवरचे चित्रमय पुस्तक, 'नक्षत्रांची फुले' हे आकाशाच्या गोष्टींचे पुस्तक प्रकाशित. त्यांनी काढलेल्या ज्ञानेश्वरी व आकाशाच्या चित्रांची प्रदर्शने झाली आहेत. त्यांची चित्रे व पुस्तके www.facebook.com/kalaapushpa पाहायला मिळतील.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121