ही घटना काही एका मुलीच्या किंवा मुलाच्या आयुष्यातील नाही.. प्रत्येकच मुलीला आणि मुलाला आपल्या आयु्यात यातून एकदा तरी जावं लागतं.. मुलीला शाळेत पीरेड्स येणं,ते ही पहिल्यांदाच आणि एखाद्या मुलाने ते नोटीस करणं, त्यावरुन तिला टीझ करणं हे अनेक शाळांमध्ये अगदी नेहमीच होतं. पण यातून जाणाऱ्या मुलीला कित्ती लाज वाटत असणार कित्ती इंबॅरेसमेंट सहन करावी लागत असणार याची कल्पना केवळ त्या मुलीलाच येते. यावेळी प्रत्येका आईचं काम आहे, आपल्या मुलाला या बद्दल जागृत करणं, त्याला याविषयाची पूर्ण माहिती देणं, आणि समजावून सांगणं की "त्या" मुलीला हे असं चिडवणं योग्य नाही.. तसंच शाळेचं काम आहे, या बद्दल मुलांना माहिती देण्यासाठी कार्यक्रम किंवा कार्यशाळेचे आयोजन करणं...
हेच सांगण्यात आलं आहे या लघुपटात.. नावातून कदाचित अर्थ स्पष्ट होत नसेल, पण एकदा बघितल्यानंतर आपल्याला नेमका अर्थ लक्षात येतो.. टेल्स एन टॉकीज निर्मित या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे अब्बास मिर्झा यांनी. अत्यंत सुंदर आणि बोलक्या अभिनयानं या माय लेकांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली नाही तरच नवल..
रानडे इन्टिट्यूट पुणे विद्यापीठातून पत्रकारितेत पद् व्युत्तर शिक्षण. सध्या वेब मुंबई तरूण भारत येथे उपसंपादक. मूळ गाव जबलपूर. कथक नृत्यात अलंकार. कला, संस्कृती, युवांशी संबंधित विषयांवर लिहिण्याची आवड.