विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग- ९

    17-Mar-2017   
Total Views | 1


अवंती: काय मेधाकाकू.... किती रंग बनवलेस घरी..... धूळवडीसाठी...!!.. मी तर रंग बनवायचे सगळे प्रयोग घरी करून पहिले... जसे विज्ञानाच्या बाईंनी वर्गात शिकवले होते त्याप्रमाणे...... आम्ही सगळ्या मुलांनी तेच रंग वापरले एकमेकांना रंगवताना...!

मेधाकाकू: अरे व्वा अवंती... म्हणजे दिवाळीत कंदील घरी बनवण्यातली आणि सगळ्यांनी मिळून किल्ले बनवण्यातली गम्मत होळीच्या दिवशी सुद्धा तुमच्या लक्षात आली हे बाकी मस्तच झाले.... तुम्हा मुलांच्या शब्दात म्हणायचे तर “ एकदम सही ”....! अवंती, आता हा वेगळा विचार बघ पटतोय का...!! होलिकोत्सव किंवा शिमग्याचा सण सगळ्यांचा आवडता नक्कीच, मात्र याची मांडणी आपल्या समाजात फार विचारपूर्वक झालेली आहे असे मला जाणवते....!! आता शिमग्याच्या संदर्भातल्या या म्हणी आणि वाकप्रचार आपल्याला अगदी झणझणींत आणि तिखट चवीच्या वाटतील अशाच आहेत.

अवंती: मेधाकाकू सांग-सांग.... मला मोठी गंम्मतच वाटत्ये... काही शतकांपूर्वी या सगळ्या सण-समारंभावर इतकी सखोल चर्चा झालेली पाहून...!

मेधाकाकू: अवंती.. आता असे बघ.... आपले सगळेच सण आणि उत्सव जणू काही या निसर्गक्रमानुसारच आखलेले आहेत. फाल्गुन महिन्यात आपला निसर्ग जुने कपडे बदलून नविन कपडे घालण्याची जणू तयारी करत असतो आणि म्हणून झाडावरची जुनी पाने झडतात आणि चैत्र महिन्यात नव्या पालवीचा बहर येतो. निसर्गात बदल घडत असताना नेमके याच वेळी आपल्या प्रगत-समंजस समाजाने स्वताःमध्ये बदल घडवायचे ठरवलेले असते आणि मग आपल्या नको असलेल्या किंवा चुकीच्या सवयी, कालानुरूप अनावश्यक ठरलेल्या प्रथा आणि काही लोकभ्रम आपल्या विचारातून आणि वागणुकीतून दूर करायचा प्रयत्न या शिमग्याच्या सणाच्या निमिताने आपल्या समाजात होत असतो.....!! तुला माहीतच आहे की या समाजात होकारार्थी जीवन व्यवहार करणारे नागरिक जसे आहेत तसेच कायम नकारार्थी विचार मंडणारेही आहेतच.....!! आणि या म्हणी, शिमग्याबरोबरच गेल्या आठवड्यात यशस्वी झालेल्या पांच राज्यांच्या निवडणुकांच्या आधीचे, काहींनी मांडलेले नकारार्थी विचार किती फोल होते त्याचाच अनुभव थोडक्या शब्दात वर्णन करतात...!!           

शिमग्याच्या अधीच बोंब.

याचा भावार्थ असा..... की शिमगा जवळ आला की जसे काही रिकाम टेकडे, वेगवेगळी सोंगे घेऊन लोकरंजनाच्या बुरख्या आड लपून चक्क भीक मागतात तसेच काहीसे झाले या निवडणुकांच्या आधी...!!.. लोकसेवा आणि विकासाच्या बुरख्या आड लपून मतांची भीक मागणार्‍यांचे काय झाले ते आपण अनुभवत आहोतच अजूनही. याला आपण ‘शिमग्या आधीची बोंब’ असे म्हणायला हरकत नाही. म्हणूनच पुढची म्हण आपल्याला सांगते ... 


शिमगा जाई आणि कवित्व राही.

अवंती, या म्हणीतली गंम्मत तर काही मंडळींना बोचरी वाटेल...... शिमगा-होळीतले गमतीचे कार्यक्रम साजरे झाले की व्यवहारी नागरिक आपआपल्या कामाला लागतात, मात्र शिमग्याची सोंगे घेतलेली लबाड मंडळी, शिमगा झाला तरी सोंगे नाचवतच रहातात.....!! आता आपण आधुनिक काळातले, शिमग्यानंतरचे कवित्व म्हणजे काय ते पाहूया...! भारतीय संविधान आणि कायद्याने निवडलेल्या उमेदवारांच्या आणि सरकारच्या निवडीवर, असे सोंगधारी अनेकानेक संशय व्यक्त करतात, सतत प्रगतीच्या आड येऊन माध्यमातून त्रागा करत रहातात... आता अचानक यांना निवड प्रक्रियाच चुकीची वाटायला लागते, त्यात काही बिघाड आहे अशी रड सुरू होते.....!! हेच आहे शिमग्यानंतरचे कवित्व..!

अवंती: याला काय संबोधन वापरलेस तू मेधाकाकू.... ‘कालातीत’ !! बरोबर ना....?? म्हणजे कुठल्याही काळात घडणार्‍या घटनांना समर्पक असणारे वाकप्रचार....!! बरोबर आहे ना माझे...??

मेधाकाकू:  एकदम सही.... अवंती.. आता मलाही आश्चर्य वांटतय ... या एकामागून एक अशा येणार्‍या समर्पक म्हणींचे..!... आता पुढची म्हण तर अशा प्रसंगांना एकदम फिट वाटत्ये...!       

होळीचा होळकर व मोलाचा रडणार.

मेधाकाकू: अवंती, होळीच्या पूजेला परिसरातले अनेक नागरिक जमतात, त्यांना ‘होळकर’ असे संबोधन वापरले जाते, जे फक्त त्या होलिकोत्सवाच्या दिवशीच समर्पक असते. होळीची पूजा करून अग्नी प्रसन्न झाला की ‘बोंब’ मारणे इतकेच या होळकर्‍यांचे काम असते आणि त्यापलीकडे प्रत्यक्षात त्यातले कोणीच आपले मित्र किंवा स्नेही नसतात. या म्हणीतले मोलाचा रडणार हे दोन शब्द काही वेगळेच सांगतात. आता कालबाह्य झाल्यासारख्या असल्या तरीही आपल्या समाजात काही प्रथा आजही प्रचलित आहेत. त्यातलीच एखाद्या कुटुंबियाच्या मृत्यूनंतर शोक व्यक्त करण्यासाठी योजलेली एक प्रथा ज्याला ‘रड घालणे’ असे मराठी भाषिक समाजात संबोधले जाते किंवा ‘रुदाली’ असे गुजराती भाषिक समाजात संबोधले जाते. आता या म्हणीत उल्लेखल्या प्रमाणे असे शोक व्यक्त करण्यासाठी रड घालणारी मंडळी पैसे देऊन बोलवलेली असली तरीही ते जमलेल्या होळकरांपेक्षाही आपल्याला जवळचे वाटावे, इतके त्या होळकर्‍यांचे वर्तन अनपेक्षित असते. या म्हणींतल्या होळकर्‍यांसारखे, स्वताःच्या लाभासाठी केले जाणारे काहींचे  वर्तन आपल्याला आजही लक्षात येते.   

मेधाकाकू: अवंती, सार्वजनिक निवडणुकांमागोमाग आलेला शिमग्याचा सण, असा आणि इतकाच आजचा संदर्भ..... या म्हणींच्या कालातीत लोकसंस्कृतीचा...!!

 

- अरुण फडके

अरूण फडके

गेली ३५ वर्षे इमारत दुरूस्ती व्यवसाय - या विषयातील अनेक यंत्र-तंत्रांचे विशेषज्ञ, नाट्यक्षेत्रातील नामवंत विश्वस्तनिधींचे विश्वस्त, मोठ्या उत्सवी कार्यक्रमांचे अनुभवी संघटक (Event designer),  फ्रीमेसनरी या प्राचीन जागतिक संघटनेचे सदस्य आणि संघटनेच्या भारतातील इतिहासाचे अभ्यासक आणि एक इंटरनॅशनल कॉफी टेबल बूक प्रकाशित, (सिंबॉल–सिंबॉलिझम--अॅलिगरी) चिन्ह-चिन्हसंकेत-चिन्हार्थ या विषयाचे अभ्यासक.

अग्रलेख
जरुर वाचा
हे वक्फ बोर्ड नाहीतर तर हे

हे वक्फ बोर्ड नाहीतर तर हे 'लँड माफिया', योगी आदित्यनाथ यांचा टोला

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वक्फच्या सावळा गोंधळावरून टीका केली आहे. त्यांच्यावर प्रयागराजमध्ये जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. योगींच्या वक्तव्याने लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या वक्फ दुरूस्ती विधेयक, २०२५ च्या आवश्यकतेनुसार समर्थन करण्यात आले, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. त्यानंतर ते म्हणाले की, महाकुंभादरम्यान, वक्फ बोर्ड जमीन त्यांची आहे असे मनमानी कारभार करणारी विधानं करत होत आणि आता मात्र वक्फ बोर्ड हे जमीन लाटण्याचा प्रकार आहे का असा प्रश्न उपस्थित होत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121