WhatsApp Buddies - इट्स लाँग डिस्टेंस यू नो..

    17-Mar-2017   
Total Views |
 
 
(आराध्या आणि अक्षता जीवाभावाच्या मैत्रीणी, लहानपणापासून एकत्र वाढलेल्या. असा एकही दिवस नव्हता की त्या दोघी एकमेकांना भेटायच्या नाहीत. मात्र दोघींच्या करिअरमुळे आता त्या वेगवेगळ्या शहरात गेल्या आणि समीकरणं थोडी बदलली.. नेमकं काय झालं.. चला बघूया..)
 
आराध्या : अक्षु... अगं तू मला तुझ्या शॉपिंगचे पिक्स पाठवणार होतीस. I was waiting man.. काय हे..

अक्षता : अगं... I got stucked.. आता उशीर झाला आहे. लाईट लावला तर या मुली कटकट करतील. उद्या पाठवते. 
 
आराध्या : This is third time you are doing this to me yar.. मी मूर्खासारखी वाट बघत बसते, आणि तू सतत बिझी असतेस.. काय यार अक्षु..
 
अक्षता : Don't say like this yar.. आराध्या तुला ही माहीत आहे माझं नाईट शिफ्ट असतं.. मी येते तेव्हा तू झोपलेली असतेस, आणि मी जाते तेव्हा तू ऑफिस मध्येच असते.. सांग बरं कधी बोलूयात.. यार तुला माहीत आहे तरी असं बोलतेस तू..
 
आराध्या : Ohhh Come on.. मी रोज वाट बघते तुझी.. तुझ्याशी सगळं शेअर करायची सवय आहे मला.. आणि तुला नवीन लाईफ फारच आवडलंय.. म्हणून विसर मला तू.. जा गधडे..
 
अक्षता : अगं ए... काही काय बरळतेस.. असं काहीही नाहीये.. you were you are and you will always be my bestiee... उग्गाच गर्लफ्रेंड सारखी पझेसिव्ह होवू नकोस.. नवी लोक भेटली म्हणून काय जुनी मैत्री संपत नसते..
 
आराध्या : OMG.. मी GF सारखी मुळीच वागत नाहीये बरं का.. आणि हो.. म्हणूनच लाईट लावल्यावर त्या मुलींना त्रास होईल म्हणून तू मला पिक्स पाठवत नाहीयेस ना.. मग यातच आलं सगळं..
 
अक्षता : God... I cant explain you always.. मी आधीच सांगितलयं तुला की, त्या माझ्या डोक्याशी कटकट करतील.. म्हणून उद्या पाठवते.. तर तुझं आपलं काही तरी भलतचं.. Give me a break yar.. का इरिटेट करतेएस मला?
 
आराध्या : I AM IRRITATING YOU... goshhhhh... cool man.. take a break.. wont disturb u again.. live ur life freely.. go..
 
अक्षता : आता लगेच go म्हणे... मी असं म्हटलंय का तुला.. प्लीझ यार.. टिपीकल भांडणं नकोएत मला.. प्लीझ.. don't behave childish.. 
 
आराध्या : बरं.. मी चाइल्डिश, मी इरिटेटिंग, ठीके.. नको बोलूयात.. 
 
अक्षता : आराध्या.. स्टॉप इट..
 
आराध्या : TTYL... 
 
अक्षता : :(
 
(कोण म्हणतं केवळ लाँग डिस्टंस रिलेशनशिप सांभाळणं कठीण असतं.. लाँग डिस्टंस मैत्री सांभाळणं ही तितकंच कठीण असतं.. त्यासाठी लागते ती खूप Understanding आणि Maturity.. काय म्हणता? तुम्हाला ही असे अनुभव आलेत का? आले असतील तर लेखाच्या खालच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की शेअर करा... )
 
- निहारिका पोळ

निहारिका पोळ

रानडे इन्टिट्यूट पुणे विद्यापीठातून पत्रकारितेत पद् व्युत्तर शिक्षण. सध्या वेब मुंबई तरूण भारत येथे उपसंपादक. मूळ गाव जबलपूर. कथक नृत्यात अलंकार. कला, संस्कृती, युवांशी संबंधित विषयांवर लिहिण्याची आवड. 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121