विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - ८

    10-Mar-2017   
Total Views | 1

अवंती: मेधाकाकू..... गेले चार दिवस सगळीकडे आंतरराष्ट्रीय महिला दिनाची चर्चा ऐकत्ये मी..... आणि मला या दिवसाचे महत्व माहित्ये.... शाळेत तुझ्याच तासाला ऐकलंय मी तुझे भाषण....!!.. आज मी विचार करत्ये की, या म्हणी आणि वाकप्रचारात काही शतकांपूर्वीच्या मराठी संस्कृतीतील महिलांचा – स्त्रीयांचा उल्लेख नक्कीच आला असेल. काही तरी सांग ना मला याविषयी.

मेधाकाकू: अवंती.... तू खरेच माझी आवडती विद्यार्थिनी आहेस.... आणि तुझ्यातले काय आवडते मला सांगू का.... तुझा रोज नविन काहीतरी शोधायचा प्रयत्न आणि त्यासाठी विचारलेले तुझे प्रश्न. तुझा आजचा प्रश्न अगदी विचारपूर्वक आला आहे. नित्यनेमाने दर वर्षी ८ मार्चला साजरा होणारा महिला दिन म्हणजे काय? याची जाणीव तुला आहे याचेच कौतुक वाटतयं मला. तुझ्या वयाच्या सर्वच मुली-मुलांना याची योग्य जाणीव असायलाच हवी कारण विशेष करून आपल्या प्राचीन भारतीय समाजाने काही सहस्त्र वर्षांपासून कुटुंबातील – समाजातील स्त्रीचे महत्वाचे स्थान ओळखले आहे आणि तिचा सन्मान केला आहे आणि अनेक परंपरांतून कायम राखला आहे. आता ही म्हण अशीच काही शतके मराठी भाषा आणि संस्कृतीत प्रचलित आहे.

बळ मुंगीचें धैर्य स्त्रीचे.  

मेधाकाकू: या म्हणीत आपल्याला वाचता येतंय आणि उमजतंय ते एका शक्तिवान आणि धैर्यशील व्यक्तीचे वर्णन. आता असे बघ अवंती.... यातील शक्तीचे वर्णन करताना ‘मुंगी’ या किटकाचे रूपक वापरलंय. आकार आणि शरीराच्या वजनाच्या प्रमाणात वजन वाहून नेण्याच्या क्षमतेचा विचार केला तर असे लक्षांत येते की, इतर किडे-कीटकांच्यापेक्षा मुंगी खूप शक्तिमान असते. वरकरणी दिसणारा तिचा लहानसा आकार पहाता हे प्रथम आपल्या लक्षात येत नाही पण विज्ञानसाधनेने हे आपल्याला समजले आहे. याच म्हणींतले पुढचे दोन शब्द आहेंत ‘धैर्य स्त्रीचे’. प्रसंगोपात स्त्री नेहमीच पुरुषांपेक्षा जास्त साहसी आणि धैर्यशील असते असा मराठी मातीचा अनुभव आहे. महाराजांची माऊली जिजामाता, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, झांशीची राणी लक्ष्मीबाई, श्रीमंत माधवराव पेशव्यांची सौभाग्यवती रमाबाई आणि शिवरायांची सून ताराराणी ही आहेत धैर्यशील स्त्रीयांची मराठी मातीतील अंतिम रुपे. आणि महत्वाचे म्हणजे मराठी मातीतील शक्तिमान मुंगी, व्याकरण संदर्भासाठी स्त्रीलिंगीच आहे. आता तूच बघ की, ही स्त्री म्हणजेच संपूर्ण कुटुंबाचे आर्थिक व्यवहार, मुलांचे शिक्षण आणि दैनंदिन प्रगती, मंगल कार्ये असे कुटुंबाचे जीवन व्यवहार, प्रसंगी उत्तम शिक्षण घेऊन व्यवसाय-नोकरी करताना समर्थपणे एका हाताने साभाळणारी प्रत्येक घरातील जणू एक मुंगी. तर अनेक शतकांपासून आपल्या रांगड्या पण सुसंस्कृत मराठी समाजांत शक्ती आणि धैर्‍याचे प्रतीक आणि रूपक म्हणून महिलांना-स्त्रीला या म्हणीच्या शब्दशिल्पात अमर स्थान प्राप्त झाले आहे. हा आहे रांगड्या संह्याद्रीच्या मराठी सुगंधाचा अभिमान.

अवंती: अरे वा..... मेधाकाकू.... कॉलर कडक झाली आज आमची.... !!!.... आणि आता पुढची म्हण आपल्या नटण्या-मुरडण्याच्या आवडीविषयी आहेसे दिसतय मला. मेधाकाकू बुगडी म्हणजे कानातला दागिना असतो...... बरोबर आहे ना माझे...!!!

कानात बुगडी गावात फुगडी.

मेधाकाकू: तू म्हणत्येस ते अगदी बरोबर आहे, अवंती. शतकापूर्वीच्या काही गमती जमती आपण आता या म्हणीच्या शब्दाशब्दात आपण वाचूया. वाचूया म्हणजे यातील प्रतीके आणि रूपकांचा अर्थ लाऊयात आणि त्याचा समाजातील समारंभ-उत्सवांशी असलेला संदर्भ शोधूया. अनेक मराठी सिनेमात आपण पाहतो त्यामधे चित्रित केलेल्या पद्धतीप्रमाणे, शतकांपूर्वी सर्व वयोगटातील नऊवारी लुगडे नेसणार्‍या महिला,  घरांत आणि सण-समारंभात वावरतांना डोक्यावरून पदर घेत असत ज्यामुळे कान आणि कानातली बुगडी झाकलेली असे. निसर्गदत्त स्त्रीसुलभ असलेली लज्जा यातूनच ही पद्धत कुटुंबात आणि सर्व समाजात रूढ होती आणि तत्कालीन समाजात स्वीकृत होती. आता तू म्हणालीस त्याप्रमाणे बुगडी म्हणजे स्त्रीची कर्णफुले अर्थात कानांतला एक दागिना. नवरोबानी दिलेली कानातली नवीन बुगडी मिरवण्यासाठी मात्र नवपरिणित-नवविवाहिताना चैत्रातील हळदीकुंकू, श्रावणांतील मंगळागौर आणि केळवण-डोहाळ जेवण अशा फार थोड्या संधी मिळत असत आणि मग त्यांना गावात सगळ्यांसमोर फुगडी खेळता येत असत, ज्यावेळी डोक्यावरचा पदर कमरेला खोचलेला असे आणि कानातली बुगडी सगळ्यांना दिसत असत. आपला समाज इतका संवेदनाशील आहे की या स्त्रीसुलभ भावनांची सुद्धा पारंपरिक म्हणी आणि वाकप्रचारात नोंद घेतली गेली आहे...!! 

अवंती: अरेच्या.... मेधाकाकू आता आपण याला शतकापूर्वीचे सोशल मीडिया असे म्हणायला हरकत नाहीये की.... एकदम सही... कूल – कूल.... !!!

- अरुण फडके

अरूण फडके

गेली ३५ वर्षे इमारत दुरूस्ती व्यवसाय - या विषयातील अनेक यंत्र-तंत्रांचे विशेषज्ञ, नाट्यक्षेत्रातील नामवंत विश्वस्तनिधींचे विश्वस्त, मोठ्या उत्सवी कार्यक्रमांचे अनुभवी संघटक (Event designer),  फ्रीमेसनरी या प्राचीन जागतिक संघटनेचे सदस्य आणि संघटनेच्या भारतातील इतिहासाचे अभ्यासक आणि एक इंटरनॅशनल कॉफी टेबल बूक प्रकाशित, (सिंबॉल–सिंबॉलिझम--अॅलिगरी) चिन्ह-चिन्हसंकेत-चिन्हार्थ या विषयाचे अभ्यासक.

अग्रलेख
जरुर वाचा
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! 
 ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

weather update देशात अवकाळी पावसाने नागरिकांना चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे काही अंशी प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्रात काही दिवसांआधी ढगाळ वातावरण होते. तर काही बागात रिमझिम पावसाच्या सरी आल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर अशातच आता राज्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. वादळी वाऱ्यासोबत अवकाळी पावसाने धिंगाणा घातला आहे. यामुळे जिवीत हाणी झाल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये १० एप्रिल २०२५ रोजी वादळी वाऱ्यामुळे एक दोन नाहीतर ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121