सुमित आला तसं, दुर्गाबाई पण भाजी निवडायला दिवाणखान्यात घेऊन आल्या.
“आबा, आज इजिप्तची कोणती मंदिरे पाहणार आपण?”, सुमितने विचारले.
“आज आपण मंदिरात न जाता मंदिरांच्या आवारात फिरायचे आहे! स्तंभ पहात!
“स्तंभ उभा करून त्याची पूजा करणे ही फार प्राचीन पद्धत आहे. एकाच दगडात तयार केलेले, monolithic, स्तंभ जगभर दिसतात. Menhirs, Stonehenge ही त्याची अति प्राचीन रूपे आहेत. तर नंतरच्या काळात व्यक्तीच्या स्मरणार्थ, युद्धातील विजयाच्या स्मरणार्थ - स्तंभ उभे करत असत.
“१५ व्या शतकात, महमूद खिल्जी वर विजय मिळवल्यावर, मेवाडच्या राणा कुंभाने चितोडगडावर उभारलेल्या भव्य विजय स्तंभाचा दिमाख काय सांगावा?
“३०० BCE दरम्यान सम्राट अशोकाने आपल्या राज्यात - अफगाणिस्तान, पाकिस्तान, काश्मीर, उत्तरप्रदेश, बिहार, ओडीसा, गुजरात, आंध्र असे ठिकठिकाणी अनेक स्तंभ उभे केले होते. या स्तंभांवरील बौद्ध धर्म आणि अशोकाच्या समाजोपयोगी कार्याची माहिती लिहिली.
“अशोकाच्या आधी, १,००० BCE दरम्यान असुर नगरीत (Assur, Iraq) असुरनसीरपाल, म्हणजे ‘असुर ज्याचे रक्षण करतो असा तो’, नावाचा राजा राज्य करत होत. याने एक स्तंभ उभारून त्यावर आपली विजय गाथा लिहिली आहे. हा White Obelisk आता London Museum मध्ये आहे.
“असो. आपल्याला पाहायचे आहेत ते मंदिरा समोर उभे केलेले स्तंभ. साधारणपणे ध्वजस्तंभ आणि दीपस्तंभ अनेक मंदिरा समोर दिसतात. या शिवाय विष्णूच्या मंदिरा समोर गरुडस्तंभ पाहायला मिळतो. ११३ BCE मध्ये, भगभद्र राजाच्या दरबारात एक ग्रीक राजदूत होता Heliodorus. अर्थात सूर्यदत्त! या Heliodorus ने भोपाळ जवळील विदिशा येथे एक गरुडस्तंभ उभारला. या स्तंभावर त्याने लिहिले आहे – ‘हा गरुडस्तंभ, हरिभक्त Heliodorus ने बांधला आहे.’
“विष्णूच्या मंदिरासमोर गरुडस्तंभ, तसा सूर्याच्या मंदिरासमोर अरुणस्तंभ! कोणार्कच्या सूर्यमंदिरा समोर एक अरुणस्तंभ होता. मंदिराची पडझड झाल्यावर एका मराठी गोसाव्याने कोणार्कची सूर्य मूर्ती आणि अरुणस्तंभ पुरीच्या जगन्नाथ मंदिरात हलविले. हा अरुणस्तंभ आता जगन्नाथ मंदिरा समोर पाहायला मिळतो.”, आबा म्हणाले.
“आपण वेरूळला गेलो होतो तेंव्हा, कैलाश मंदिरासमोर दोन अप्रतिम कोरीव काम केलेले ध्वजस्तंभ पहिले होते.”, दुर्गाबाई म्हणाल्या.
“अगदी बरोबर आठवले दुर्गाबाई. आता आपण इजिप्त मधील सूर्य मंदिरे पाहू. इजिप्तच्या लक्झर, कर्नाक आदि सूर्य मंदिरा समोर अतिशय सुंदर असे obelisk आहेत! कर्नाकच्या प्रांगणात अमुन-रा ही सूर्य देवता, माउत ही सूर्य पत्नी, आणि त्यांचा पुत्र खोन्सू, या चंद्र देवतेची मंदिरे आहेत.
“इजिप्तच्या लोकांची भावना अशी की सूर्याचा गोठलेला किरण म्हणजे स्तंभ! या स्तंभाची पूजा म्हणजेच सूर्याची पूजा! ग्रीक लोक या स्तंभाला obelisk म्हणत. असे अनेक obelisk इजिप्त मधील सूर्योपासक राजांनी उभारले होते.
“रोमन राजे इजिप्त मध्ये आल्यावर या obelisk च्या प्रेमात पडले. प्रचंड जड १०० ते ५०० टन वजनांचे obelisk, इजिप्तच्या मंदिरांमधून काढून रोमला नेले. ते वाहण्यासाठी मुद्दाम जहाजे तयार केली आणि हजारो मजूर व शेकडो घोड्यांच्या मदतीने हे अशक्य वाटणारे काम केले! आज इजिप्त मधील कोणत्याही गावापेक्षा जास्त obelisk रोम मध्ये आहेत! इतरही देशांमध्ये इजिप्तचे obelisk आहेत - फ्रांस, जर्मनी, इंग्लंड, स्वीडन, अमेरिका या ठिकाणी इजिप्त मधील पुरातन obelisks पाहायला मिळतात.
“साधारण २,५०० BCE दरम्यानची गोष्ट - इजिप्तच्या Heliopolis अर्थात ‘सूर्यपूर’ या नगरात एक सूर्य मंदिर होते. या मंदिरासमोर, एका अज्ञात राजाने सूर्यस्तंभ उभारला होता. हा स्तंभ रोमन सम्राट ऑगस्टस् व त्या नंतरच्या सम्राटाने रोम मध्ये हलवला. आज ८० फूट उंचीचा आणि ३२० टन वजनाचा सूर्य किरण, Vatican City च्या Saint Peter’s Square मध्ये उभा आहे. Roman Catholic Church मधील सूर्यपूजेच्या अनेक खुणांपैकी ही एक!
“आणि अगदी अलीकडच्या काळात, सूर्योपासना करणाऱ्या Masonary पैकी एक Geroge Washington, यांच्या स्मरणार्थ Washington येथे सर्वात उंच obelisk उभारला.”, आबा म्हणाले.
“Wow! म्हणजे हे सूर्य पूजेचे व्रत इजिप्तने रोमला दिले, आणि रोमने ते नकळत पाळले!”, सुमित म्हणाला.
-दिपाली पाटवदकर