अक्षत... तुमच्या आमच्या सारखाच एक २८ वर्षाचा तरुण, त्याची बायको आयुषी.. अत्यंत गोड, सुंदर आणि लाघवी.. पण एकदा आयुषी ऑफिस मधून परत येत असताना तिचा अपघात झाला. त्यात तिचा प्रचंड blood loss झाला. अक्षत खूप टेंशनमध्ये होता. इतक्या मोठ्या प्रमाणावर रक्त आणायचं कुठून? मात्र त्याच वेळेस त्याचा मदतीला धावून आलं Whatsapp.. कसं?.. चला जाणून घेवूया...
अक्षत : अरे अमित.. काय करु कळत नाहीये रे.. आयुषीचं bloog group तसं rare आहे.. AB-, blood banks कडे पण जावून आलो.. पण रक्त जास्त प्रमाणात लागणार आहे रे.. काय करु कळत नाहीये..
अमित : अक्षत ऐक.. काळजी करु नकोस we all are with you.. एक काम कर.. एक व्हॉट्सअॅप मॅसेज पाठव मला आणि आपल्या फ्रेंड्स ग्रुपवर.. मी तुला दोन तीन ग्रुप्स मध्ये अॅड करतो.. काही ओळखीचे लोक आहेत जे मदत करु शकतील. आपण पाठवूयात तो मॅसेज सगळ्यांना.. काही ना काही मदत मिळेलच.
अक्षत : अरे माझ्या सगळ्या नातेवाईकांना, काही मित्रांना मॅसेजेस, कॉल्स करुन झालेत. पण काही रिस्पॉन्स मिळाला नाहीये. अशा वेळी ना.. च्यायला कुणी साथ देत नाही.. तिथे आयुषीला माझी, आपल्या सगळ्यांची खूप गरज आहे रे.. आणि तिच्याचसाठी रक्ताची सोय करताना मला तिच्या जवळ थांबताही येत नाहीये.. जिथे आपल्याच काही लोकांचा अशा परिस्थितीत काही response नाहीये, तिथे अनोळखी लोकांकडून काय अपेक्षा करणार?
अमित : अक्षत असं नसतं... कधी कधी मॅसेज उशीरा पण बघितला जावू शकतो की नाही.. आणि आता हा विचार करत बसण्याचा वेळ आहे का आपल्या हातात. आयुषीला कुठल्याही परिस्थीत आज रात्रीपर्यंत रक्त द्यावच लागणार आहे. त्यामुळे आपल्या हातत जे आहे ते आपण करुयात. आणि बरेचदा काही अनोळखी लोकच देवासारखे धावून येतात. चल मी तुला ग्रुप वर अॅड करतो...
Amit added akshat to kothrud katta
Amit added akshat to friends
Amit added askat to we are here for you
अक्षत : Hey people I may be don't know you, but my wife met with an accident and I need AB- blood, PLEASE HELP..!!!!
अमित : Guys we need it by night.. Its really Urgent.. please help my friend..
शोभित : नक्कीच.. माझं आहे AB- पत्ता कळवा मी येतो..
अनन्या : I am also AB- i can come let me know the address
शारदा : ohh sad.. get well soon to your wife.. i am spreading this messege to my other groups too... कुणी मिळाल्यास नक्की कळवते.. फोन करते..
वरद : माझ्या भावाचं आहे AB- आणि माझे जीजाजी ब्लड बँकेत आहेत, काही मदत मिळाल्यास कळवतो.
(अशा प्रकारे हा मॅसेज अनेक ग्रुप्स पर्यंत पोहोचतो. अनेक ब्लड डोनर्स रक्तदानासाठी हॉस्पिटल मध्ये येतात. इतक्या अनोळखी देवांना पाहून अक्षत अक्षरश: गदगद होतो. त्याच्या बायकोचे प्राण वाचतात. आणि ती घरी देखील येते. या सर्व घटनेच्या २ महिन्यांनंतर अमित अक्षतला भेटायला त्याच्या घरी जातो.)
अमित : काय आयुषी कशी आहेस? आता बरं आहे ना?
आयुषी : हो अमित मी मजेत.. अक्षत सांगत होता त्या दिवशी वेळेत रक्त मिळालं म्हणून आज सगळं ठीक आहे. नाहीतर देवजाणे कायच झालं असतं. मला तर अक्षत बद्दल विचार करुन भितीच वाटते..
अमित : आयुषी.. शांत हो.. काहीही झालं नसतं... आम्ही सगळे असताना अक्षतला तुला काहीही होवू शकत नाही.
आयुषी : थँक्स अमित..
अमित : थँक्स काय अगं...
अक्षत : नाही अमित खरंय तिचं. मी त्या दिवशी तुला म्हटंल आपलेच लोक मदत करत नाहीत तर अनोळखी काय मदत करणार. but i was wrong.. Its all about humanity... त्या दिवशी व्हॉट्सअॅपचे ते ग्रुप्स नसते, ती अनोळखी देवमाणसं नसती, तर आज मी कल्पनाही करु शकत नाही काय झालं असतं ते.. आता पर्यंत ज्या technology चा वापर मी forwarded messeges पाठवायला करत होतो, त्याच technology मुळे माझ्या बायकोचे प्राण वाचले रे..
अमित : सगळं आपल्या वापरण्यावर असतं अरे.. खैर,, अंत भला तो सब भला.. आयुषी आता तू बरीच बरी झालेली दिसतेय.. एक चाय हो जाय....
(रोजच आपल्या ओळखीतल्या, कधी कधी ओळखीत नसलेल्याही लोकांना मदतीची खरच गरज असते, आपल्या व्हॉट्सअॅप वरचा थोडासा वेळ त्यांना दिल्यास कदाचित अश्या अनेक आयुषींचे प्राण आपल्याला वाचवता येतील.. काय म्हणता?..)
-निहारिका पोळ