जगातील सर्व लोकांची आर्थिक शोषणापासून मुक्तता होण्याकरिता शोषितांची म्हणजे कामगारांची हुकुमशाही निर्माण होईल असे भाकित मार्क्सने केले व त्यानुसार जगभरात कम्युनिस्ट आंदोलने उभी राहिली. एक काळ असा होता की विचारवंत व मार्क्सवादी हे समीकरण जजाले होते. जिथे भांडवलशाहीचा विकास होईल तिथे शोषणाविरूध्द कामगारांचा कसा लढा उभा राहील व अंतिमतः तिथे कशा पध्दतीने कामगारांची हुकुमशाही येईल याचा गणिती सिध्दांत मार्क्सने मांडला. तो सिध्दांत इतर वैद्न्यानिक सिध्दांताप्रमाणेच शास्त्रीय आहे अशी मार्क्सवाद्यांची श्रध्दा होती. परंतु प्रथम मार्क्सवादी क्रांती झाली ती अविकसित भांडवलशाही असलेल्या रशिया व चीनमधे. मार्क्सच्या सिध्दांताप्रमाणे एकाही विकसित भांडवलशाही देशात क्रांती झाली नाही. रशिया व चीन येथेही क्रांतीनंतर राज्यकर्त्यांचे हितसंबंध निर्माण होतात हे स्पष्ट झाले. मार्क्सवादाने क्रांतीत होणारा हिंसाचार केवळ स्वीकारलेलाच नाही तर तो अपरिहार्य मानलेला आहे. त्यामुळे आपल्या विरोधकांना नामशेष करण्यासाठी हिंसात्मक मार्गाचा अवलंब करणे त्यांना सहज व स्वाभाविक वाटते. त्यामुळे स्टॅलिन , माओ यांनी जे कोटींच्या संख्येत मोजावी लागतील एवढी माणसे मारली त्याबद्दल त्यांना थोडीही लाज वाटत नाही की त्याचे दुःख होत नाही. एवढ्या लोकांच्या कम्यनिझम वाचविण्यासाठी हत्या झाल्या त्यात शोषणकर्ते किती होते?
कम्यनिस्टांनी हीच परंपरा प.बंगाल व केरळ येथे चालविली आहे. आपल्या हिंसक घटना लपविण्यासाठी प्रसिध्दी माध्यमांचा कसा उपयोग करायचा याचे एक पध्दत त्यांनी यशस्वीपणे अमलात आणली आहे. आपल्या विरोधकाना आधीच असहिष्णुतेच्या नावाने बदनाम करून टाकायचे, म्हणजे ते बचावाच्या भूमिकेत जातात हा मानसशास्त्रीय खेळ खेळण्यात कम्युनिष्ट पारंगत आहेत. एखाद्याला जरी साधी मारहाण झाली तरी ती मानवतेच्या दृष्टीने किती भयंकर गोष्ट आहे असा प्रचार केला जातो. तशी प्रतिमा समाज मनावर बिंबवली जाते. त्यामुळे अशा एक दोन असहिष्णु लोकांची हत्या झाली तर काय बिघडले असा दावा केला जातो. तोच खेळ सध्या खेळला जात आहे. जवाहरलाल विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या मार्या मार्या यातून देशभरात काहीतरी भयंकर घडत आहे असा मानसशास्त्रीय दबाव उत्पन्न केला जात आहे. या पार्श्वभूमीवर केरळ मधे होणारे कम्युनिस्ट हत्याकांड कसे दुर्लक्षिले जाईल आणि त्याच्या बातम्या आल्या तरी दोन्हीकडूच एकमेकांचे खून पाडले जात आहेत असे चित्र निर्माण करण्यात येत आहे. केरळ मधील अनेक गावे कम्युनिस्ट गावे म्हणून घोषित केली जातात. अशा गावात अन्य कोणत्याही संघटनेने किंवा संस्थेने प्रचार करणे हाही गुन्हा ठरविला जातो व त्याची दहशत निर्माण करण्याकरिता खून पाडले जातात. ज्यांचे खून पडतात त्यातले कोणी शोषक वर्गातले नसतात तर सामान्य , हातावरचे पोट असलेल्या सामाजिक स्तरातले असतात. केरळमधे नवे मार्क्सवाद्यांच्या नेतृ्त्वाखालील सरकार सत्तेवर आल्यावर सर्वप्रकारच्या गुन्हेगारीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे हा कम्युनिस्टांचा हा खरा चेहरा समोर आणणे गरजेचे बनले आहे.