सर्वसामान्यांसाठी आश्र्वासक आणि विश्वासार्ह

    19-Feb-2017   
Total Views |
 

बाळासाहेबांनंतर सर्वसामान्य मुंबईकरांसाठी कोण, हा सतावणारा प्रश्न आहेच. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शेवटच्या भाषणात मुंबईकरांसाठी जे व्हिजन मांडले ते सर्वसामान्यांसाठी आश्र्वासक तर होतेच; परंतु मुख्यमंत्र्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार केला तर ते विश्र्वासार्हदेखील होते, असे म्हणावे लागेल. आज जो काही मराठी माणूस मुंबईत शिल्लक आहे, त्याच्या समोर प्रचंड समस्यांचा डोंगर उभा आहे. बॉम्बस्फोटानंतरही स्वत:ला सावरणार्‍या मुंबईकरांना तक्रार करायला आणि तक्रारीवर रडायलाही वेळ नसतो. त्याचा पुरेपूर फायदा आतापर्यंत मुंबई महानगरपालिका स्वत:च्या हातात ठेवणार्‍यांनी घेतला. ‘आंधळं दळतंय आणि कुत्रा पीठ खातोय,’ अशी ही स्थिती आहे.

हजारो कोटी रुपयांची महानगरपालिका आणि कराच्या रूपाने पैसे देणार्‍यांना प्यायला शुद्ध पाणी नाही. जो काही मराठी टक्का आज मुंबईत शिल्लक आहे. तो ज्या स्थितीत राहतो ते भयंकर आहे. जुन्या चाळीत, झोपडपट्ट्यांमध्ये आज मराठी माणूस कसे-बसे जगतो आहे. मराठी माणसाच्या लहान घराचा यशस्वी फॉर्म्युलाच मुख्यमंत्र्यांनी मांडला. २६९ चौ. फुटांचे त्यांचे घर आणि त्यात कसा-बसा चालणारा संसार ही स्थिती यापुढे ‘एसआरए’च्या माध्यमातून घर उपलब्ध होेणार्‍यांच्या बाबतीत दिसणार नाही. कारण शासनाने त्यांना ३०५ चौरस फुटांचे घर देण्याची योजना जाहीर केली आहे. अर्धवट पडलेले प्रकल्प ही मुंबईची शोकांतिका झाली आहे आणि महत्त्वाचे म्हणजे सर्वसामान्यांना अशा प्रकारच्या घरांमध्ये न पोहचू देणार्‍यांचे कुणीही काहीही करू शकत नाही, असा संदेश दिला होता. मुख्यमंत्र्यांनी आपल्या आक्रमक भाषेत या सगळ्याचा उत्तमसमाचार तर घेतलाच, पण केवळ भावनिक भाषण न करता आपल्याकडे असलेल्या उत्तरांचीही यादी दिली. पिण्याचे पाणी, समुद्राची सफाई या आणि किती तरी विषयांवर मुख्यमंत्र्यांनी आपले विचार मांडले. मुंबईत शिवसेनेला एकहाती सत्ता देऊनही इथल्या माणसाला २४ तास पाणी मिळू शकत नाही हा मुद्दा त्यांनी अत्यंत योग्य प्रकारे अधोरेखित केला. मुंबईतल्या सांडपाण्याचा प्रश्न आणि त्यामुळे मुंबईच्या आसपासच्या समुद्रांना आलेले गलिच्छ स्वरूप यावर भाष्य करताना त्यांनी सांडपाण्यावर प्रक्रिया करणार्‍या प्रकल्पांच्या बाबत सूतोवाच केले. जगभरात समुद्रात प्रदूषित पाणी सोडण्याच्या प्रक्रियेबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपले धोरण पूर्णपणे बदलले आहे. याचा परिणामशहराच्या अवती-भवती असलेल्या जैवविविधतेवर होतो. किती तरी लहान-मोठ्या शहरांमध्ये आज अशा यंत्रणा बसविल्या गेल्या आहेत.

मुंबई महानगरपालिका ही अशी एकमेव महापालिका असावी जी आपल्या सांडपाण्यावर योग्य प्रकारे प्रक्रिया करीत नाही. पर्यायाने मुंबईच्या आसपासचे सगळे समुद्रकिनारे दूषित झाले आहेत. मुंबईच्या पर्यटन व्यवसायालाही याचा फटका बसणार आहे. मुंबईकरांनी ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास टाकला. त्यांनी या शहराची वाट लावली. महापालिका कार्यालयाचे खेटे मारायला लावले. आज तेच दोन्ही भाऊ मुख्यमंत्र्यांची चेष्टा करीत आहेत. भावनिक आवाहनांना तर ऊत आला आहे. मुंबई तोडण्याच्या, मराठी माणसाच्या नावाने राजकारण करण्याचा जुना डाव पुन्हा खेळला जात आहे. जेव्हा नेमके मुद्दे संपतात तेव्हा अशा गोष्टी सांगाव्या लागतात. मुख्यमंत्र्यांनी जे मांडले त्यात त्यांची तळमळ आणि तडफ दिसली. आता पुढे मुंबईची जनता कोणाला निवडते हे पाहणे औचित्याचे ठरेल.
 
- किरण शेलार 

किरण शेलार

एम सी जे पर्यंत शिक्षण. सध्या मुंबई तरुण भारतचे संपादक. मूळ मुंबईकर आणि बालपणापासून रा. स्व. संघाशी संबंधित. सा. विवेक व तरुण भारत समूहात विपुल लिखाण. वन्यजीव बचावाच्या कामात सक्रिय. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य. राष्ट्रीय प्रश्न, राजकीय, सामाजिक व धोरणविषयक अभ्यास व लिखाण.
 
अग्रलेख
जरुर वाचा
मंदिर-चर्चपासून थेट गावांपर्यंत

मंदिर-चर्चपासून थेट गावांपर्यंत 'कलम ४०' चा गैरवापर; वक्फ बोर्डाचे धक्कादायक वास्तव उघडकीस!

लोकसभेत १२ तासांबून अधिक काळ चाललेल्या चर्चेनंतर अखेर वक्फ सुधारणा विधेयक पास झाले. दरम्यान विधेयकाच्या बाजूने एकूण २८८ मते पडली, तर विरोधात २३२ मते पडली आहेत. वास्तविक हे विधेयक वक्फ मालमत्तेच्या पारदर्शकतेबाबत आहे, मात्र विरोधक याला धार्मिक दिशा देण्याचा प्रयत्न करत आहेत. खरंतर वक्फ विधेयकात सुधारणा करणे आवश्यक होते. कारण त्यातील 'कलम ४०' त्याला कोणत्याही मालमत्तेवर दावा करण्याची सूट देत होते. अशातून वक्फने शेतकऱ्यांच्या जमिनीच नाही तर मंदिरे आणि चर्चवरही आपला दावा मांडला होता. Waqf Board misuse of ..

वक्फ सुधारणा विधेयकामुळे देशाचे विभाजन होईल! मौलानाचा देशाप्रति द्वेष

वक्फ सुधारणा विधेयकामुळे देशाचे विभाजन होईल! मौलानाचा देशाप्रति द्वेष

Waqf Amendment Bill २ एप्रिल २०२५ रोजी संसदेत केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी सादर केले आहे. यावेळी त्यांनी वक्फ सुधारणा विधेयकामुळे गरीब मुस्लिम आणि गरीब निराधार महिलांसाठी हा कायदा महत्त्वपूर्ण असल्याचं म्हटलं आहे. एवढेच नाहीतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही वक्फ सुधारणा विधेयकावर संसदेत भाषण केले. यावेळी बोलताना त्यांनी वक्फची एकूण माहिती दिली. त्यावेळी अनेक विरोधकांनी याला विरोध केला. मात्र, त्यांनी वक्फ सुधारणा विधेयकामुळे गरीब मुस्लिम आणि मुस्लिम महिलांना त्याचा फायदा होईल असेही ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121