( अनेकदा आपल्याला नाही का ते मॅसेजेस येतात.. plese send this messege to 30 people and see the magic.. किंवा plese forward this messege don't ignore within 3 hours good luck will come.. else 2 years of badluck... किती इरिटेटिंग असतात नाही असे मॅसेजेस.. असाच मॅसेज अनन्या ने पाठवला अभिनव ला... बघू काय झालं पुढे...)
अभिनव : shit man.. तू सुद्धा.. काय फालतू मॅसेजेस करतेस गं..

अनन्या : अरे त्यात काय झालं Just time pass म्हणून रे..

अभिनव : अगं tp च करायचा आहे, तर काही जोक्स पाठव, व्हिडियो पाठव, चीझी मॅसेजेस पण चालतील... ते सहन करेन मी.. पण हे नको..

अनन्या : अरे चिडतोस काय असा..

अनन्या : अरे पण आईचीच शपथ दिल्यावर काय करणार आता... मला असं कसं तरी होतं..

अभिनव : हे तुझ्या सारख्यांच्या कसं तरी होण्यामुळेच ना आम्हाला सहन करावं लागतं.. परवा काय म्हणे तर नाही फॉर्वर्ड केला मॅसेज तर दोन वर्ष bad luck येणार..
अनन्या : अरे मग रिस्क कशाला घ्यायची..
अनन्या : अरे but i feel.. की कुणी पाठवतं आपल्याला तर का मन मोडायचं..
अभिनव : तू खरच बावळट आहेत अनन्या... यात मन मोडणं कुठे आलं. समोरचा बावळटपणा करतो, म्हणून आपणही करायचा का?


अनन्या : खरंय पटतयं मला.. की असं काही नसतं.. पण मग उगाच नंतर मनात येतं..

अभिनव : अगं हाच खरा त्या मॅसेजेसचा हेतू असतो.. तू लॉजिक लाव.. नाही तू तो मॅसेज फॉर्वर्ड केलास तर काय होईल? असे अनेक लोक आहेत जे असे मॅसेजेस वाचतही नाही.. त्यामुळे emotional fool बनणं बंद कर.. आणि अक्कल वापर..


अनन्या : बरं... ठीक आहे.. ऐकलं तुझं.. खूश आता?..

अभिनव : आणि परत असा मॅसेज केलास ना तर ब्लॉक करेन तुला.

.
अनन्या : बरं.. हुह...


(खरंच नको तिथे इमोशनल फूल बनतो आपण.. काही गरज नसते असे मॅसेजेस फॉर्वर्ड करण्याची.. ही देखील एक प्रकारची अँधश्रद्धाच आहे.. आणि आपण त्याला महत्व न दिलेलंच बरं.. तुम्हाला काय वाटतं?)