मनस्वी : शनया बघितलंस का ग्रुपवर त्या लदाख ट्रिपच्या? त्या अभिषेक का वाढदिवस आहे आज.
शनया : हो गं जस्ट बघितलं.
मनस्वी : अगं मग हॅपी बर्थडे का टाकलं नाहीस? सगळ्यांनी विश केलंय त्याला.
शनया : अगं. I don't know him much. I havent seen him in last ३ years. आपल्या ट्रिप मध्ये मी उशीरा जॉईन झाल्यामुळे
केवळ २ दिवस आपण सगळे एकत्र होतो. ओळख नाहीये तेवढी अगं.
मनस्वी : अगं तर काय झालं? its just about wishing. विश कर आणि सोडून दे. कोण तो तुला त्याच्या बर्थ डे पार्टीत बोलावणार आहे.. :P
शनया : अगं हो.. ते आहेच पण आपली एखाद्याशी इतकी ओळख नसेल तर विश करण्यातही काय पॉईंट आहे?
मनस्वी : अगं वाढदिवस आहे आज त्याचा. त्याला बरं वाटेल. बाकी काही नाही..
शनया : मने तू मला सांग तुला बरं कधी वाटतं?
मनस्वी : हा काय प्रश्न आहे?
शनया : सांग ना.. तुझ्या वाढ दिवसाच्या दिवशी तुला बरं कधी वाटेल?
मनस्वी : जेव्हा माझे फ्रेंड्स मला विश करती, फॅमिली सोबत सेलिब्रेट करने, कुणीतरी मला सरप्राईझ देईल, तेव्हा.
शनया : म्हणजे जेव्हा कुठली तरी आपली व्यक्ती, तुझी व्यक्ती तुला विश करेल तेव्हाच ना?
मनस्वी : अगं obviously.. अगं पण असे प्रश्न का विचारते आहेस तू?
शनया : म्हणजे एखाद्या अनोळखी माणसाने तुला विश केलं तर तुला special feel नाही होणार हो की नाही?
मनस्वी : अगं कसे प्रश्न विचारतेयस? हाँ.. थोडं suprised feel होईल. पण जे फीलिंग आपल्या लोकांच्या विश करण्याने येतं ते नाही येणार हे नक्की.
शनया : Exactly.. मी ही तुला हेच सांगतेय, अभिषेक माझा मित्र ही नाहीये, it just that आपण एकत्र ट्रिपला होतो. आणि मनापासून जर कुणाबद्दल वाटत नसेल, तर मग विश करण्यातही काय अर्थ. त्या विशेस मनापासून नसतील ना..
मनस्वी : अगं पण ग्रुप वर सगळ्यांनी केलयं.
शनया : मान्य आहे मला.. हेच होतं हल्ली. ग्रुपवर सगळे विश करतात, आणि त्या प्रेशर मध्ये येवून आपल्यालाही करणं भाग पडतं. आणि गम्मत अशी की याचा सगळ्यात जास्त त्रास ज्याचा बर्थडे असतो ना त्यालाच होतो, प्रत्येकाला थॅंक्स म्हणत बसा.. आणि एखाद्याचं नाव सुटलं तर झाली ना गोची. खा शिव्या. आणि ते ही नाही, नुसतं थॅंक्स टू ऑल म्हटलं की ते Rude वाटतं. मग करायचं काय?
मनस्वी : don't you think तू जरा जास्तच विचार करतेयेस. आता तूच सांग करायला काय हवं मग?
शनया : हे बघ आपली तितकी चांगली मैत्री असेल तर माणूस भेटून, नाही तर किमान फोन करुन तरी विश करतो, आणि नसेलच तर मग मॅसेज करण्यालाही काय अर्थ. बरं मॅसेज करायचाच असेल तर असा ग्रुप वर न करता पर्सनल तरी करावा. थोडं तरी आपलेपणाचं फीलींग येतं.
मनस्वी : तसं खरंय हे पण. At least पर्सनल मॅसेज करता येवूच शकतो. आणि व्हॉईस नोट्स, व्हिडियो कित्ती काय काय करता येवू शकतं.
शनया : हो नं. पण त्याच्या साठी जो आपला मित्र आहे, जो जवळचा आहे. आता अनेक ग्रुप्स मध्ये कितीतरी असे लोक असतात ज्यांना आपण काळं का गोरं बघितलेलं नाही. मग त्यांना कसं काय करणार ना विश.
मनस्वी : खरंयं...
शनया : सो.. Don't worry.. तुझ्या बर्थडे ला तुला भारी सप्राईज देणार.. काळजी नको करुस..
मनस्वी : yo baby.. :P
(खरंय.. या व्हॉट्सअॅपमुळे लोकांचे वाढ दिवस लक्षात राहणंच बंद झालंय, बर हे खरंय की आपल्या जवळच्या व्यक्तीपासून लांब असल्यावर त्याला या माध्यमातून बर्शडे विश करता येतं. मात्र ग्रुप वर अनोळखी व्यक्तींचा वाढदिवस साजरा करणं जरा त्रासदायक होवू शकतं बरं का... )
- निहारिका पोळ