शॉर्ट अॅण्ड क्रिस्प : ऋतु

    05-Dec-2017   
Total Views | 2
 
 
ही कहाणी आहे ऋतु नावाच्या एका मुलीची. बाबाची लाडकी कन्या. आणि एक उत्साही यूट्यूबर. तिला तिचं स्वत:चं यूट्यूब चॅनल सुरु करायचं आहे. तिच्या घरात असतात केवळ ती आणि तिचा बाबा. काही वर्षांआधीच आई देवाघरी गेली आणि घरी उरले बाप-लेक. तर अशा या बाप-लेकीच्या प्रेमळ नात्यावर आधारित हा लघुपट आहे.
 
 
 
मात्र या कहाणीत एक ट्विस्ट येतो, जेव्हा ऋतुच्या बाबाला अचानक काही गोष्टी आठवणं बंद होतं. का होतं असं? ऋतुच्या मैत्रीणीला तिचा बाबा चोर समजायला लागतो. आणि तिला जीवे मारण्याचा प्रयत्न देखील करतो. ऋतुचा बाबा अचानक असा का वागायला लागला? जाणून घेण्यासाठी नक्की बघा हा लघुपट.
 
खरं तर लघुपट वेगळा आहे. काही ठिकाणी संथ वाटतो, तर काही ठिकाणी अतिशयोक्ती देखील वाटू शकते. मात्र एका वेगळ्या अनुभवासाठी, आणि बाप-लेकीच्या सुंदर नात्यासाठी हा लघुपट एकदा तरी बघावा. या लघुपटात मुख्य भूमिका निभावल्या आहेत तेजश्री वैद्य आणि हर्षद काठपुरकर यांनी, आणि संवाद लेखन, संपादन आणि दिग्दर्शन केले आहे कुणाल राणे यांनी. यूट्यूबवर या लघुपटाला मिळाले आहेत १४ हजार ६८६ व्ह्यूज.

निहारिका पोळ

रानडे इन्टिट्यूट पुणे विद्यापीठातून पत्रकारितेत पद् व्युत्तर शिक्षण. सध्या वेब मुंबई तरूण भारत येथे उपसंपादक. मूळ गाव जबलपूर. कथक नृत्यात अलंकार. कला, संस्कृती, युवांशी संबंधित विषयांवर लिहिण्याची आवड. 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121