गुंतवणुकीचा विचार करताय, मग हा लेख वाचाच!

    23-Dec-2017
Total Views | 33


 
 
गुंतवणुकीचा विषय निघाला कि आजकाल म्युचुअल फंड बाबत बरेच जण बोलताना दिसतात. असे असले तरी सामन्य गुंतवणूकदारास याबाबत फारशी माहिती नसते. आपण जेंव्हा गुंतवणूक करू इच्छितो त्यावेळी आपण गुंतवणुकीचा जो पर्याय निवडतो त्याबाबत आपल्याला बेसिक माहिती असणे आवश्यक असते. त्यादृष्टीने आज आपण थोडक्यात माहिती घेऊ.
 

'म्युचुअल फंड' हा एकत्रित गुंतवणुकीचा प्रकार असून यामध्ये भाग घेणारा प्रत्येक गुंतवणूकदार आपली रक्कम म्युचुअल फंडमध्ये गुंतवीत असतो व संबंधीत म्युचुअल फंड गुंतवणूकदार ज्या प्रमाणात जोखीम (रिस्क) घेऊ इच्छितो त्या नुसार गुंतवणूक करत असतो व अशी गुंतवणूक केल्यावर गुंतवणूकदारास त्याने केलेल्या गुंतवणुकीच्या प्रमाणात युनिट देऊ केले जातात. एका युनिटची दर्शनी किंमत जरी रु.१० इतकी असली तरी युनिटची खरेदी बाजार भावाने होत असल्याने गुंतविलेली रक्कम भागिले युनिटची बाजारातील किंमत एवढे युनिट गुंतवणूकदारास देऊ केले जातात.

 

उदा :
गुंतवणूकदराने रु.५०,००० गुंतविले असतील व एका युनिटची बाजारातील
किंमत 
रु. २५ असेल तर त्याला २००० युनिट दिले जातात.
युनिटची बाजारातील किंमत बाजारातील चढ उतारानुसार कमी अधिक होत असते.

 

'म्युचुअल फंड'चे प्रामुख्याने डेट, बॅलन्स व इक्विटी असे तीन प्रकार असून तुलनेने इक्विटी फंडातील गुंतवणुकीस जास्त जोखीम असून त्याहून कमी जोखीम बॅलन्स व अगदी कमी जोखीम 'डेट फंडातील' गुंतवणुकीत असते. मात्र मिळणारा रिटर्न (परतावा) जोखिमीच्या प्रमाणत असतो त्यामुळे इक्विटी फंडातील गुंतवणुकीवर मिळणारा रिटर्न जास्त असल्याचे दिसून येते. साधारणपणे ४ ते ५ इतक्या कालावधीसाठी इक्विटी फंडात केलेली गुंतवणूक १३ ते १४ टक्के इतका रिटर्न देऊ शकते. मात्र रिटर्न बाबत कोणीही खात्रीशीर पणे सांगू शकत नाही. तर बॅलन्स फंडातील ४ ते ५ वर्षासाठीची गुंतवणूक ११ ते १२ टक्के इतका रिटर्न देऊ शकते. याउलट डेट फंडातील गुंतवणूक बँकेतील गुंतवणुकीपेक्षा ०.५ ते १ टक्के जास्त रिटर्न देऊ शकते.

म्युचुअल फंडात एक रकमी तसेच दरमहा पद्धतीने ठराविक रक्कम गुंतविता येते. एक रकमी किमान रु.५,००० गुंतवावे लागतात. याउलट दरमहा पद्धतीने किमान रु.१,००० (काही फंड रु.५०० सुद्धा स्वीकारतात) एवढी रक्कम गुंतवावी लागते. सामन्य गुंतवणूकदाराच्या दृष्टीने दरमहाची गुंतवणूक फायदेशीर असल्याचे दिसून येते. यालाच 'एस. आय. पी.' असे म्हणतात. या योजनेचा फायदा लोक मोठ्या प्रमाणावर घेत असल्याचे दिसून येते.

 

थोडक्यात असे म्हणता येईल की, गुंतवणूकदार आपल्या जोखीम घेण्याचा क्षमतेनुसार पर्याय निवडू शकतो मात्र म्युचुअल फंडातील गुंतवणूक बाजारातील चढ उतारावर कमी जास्त होत असते आणि त्यादृष्टीने गुंतवणुकदाराने गुंतवणूक करण्यापूर्वी यातील जोखीम समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे एव्हढे मात्र खरे कि सध्याच्या कमी होत असलेल्या व्याज दरांच्या पार्श्वभूमीवर म्युचुअल फंड हा एक निश्चितच फायदेशीर पर्याय आहे.

- सुधाकर कुलकर्णी
सर्टिफायीड फायनान्सियल प्लॅनर, पुणे.

 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121