ये 'मीम-मीम' क्या है?

    20-Dec-2017   
Total Views | 6
 
 
फेसबुक आपल्या सगळ्यांच्याच रोजच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. त्यातून आता तर मोबाइलमध्ये फेबुची अॅप आल्यामुळे कम्प्यूटर किंवा लॅपटॉप देखील उघडून बघावा लागत नाही. एकाच क्लिकवर संपूर्ण विश्व, त्यातील लोक फेसबुकच्या माध्यमातून आपल्या समोर येतात. मात्र आजकाल या फेसबुकवर एक नवीनच प्रकार सुरु झालाय तो म्हणजे 'मीम' काही लोक याला मेमे असेही म्हणतात. यावर हास्यास्पद एखादा फोटो असतो, आणि ते बघून आपल्याला ज्याची आठवण येईल त्याला त्या मीम वर 'टॅग' करायचे असेत. असे आहे हे मीम प्रकरण.
 
 
 
 
काही काही मीम अगदीच विचित्र असतात :
 
यामधील काही मीम अगदीच विचित्र असतात. जसे की ज्याचे नाव 'के' या अक्षरापासून सुरु होईल त्याला भविष्यात ८ मुले होतील. किंवा एखादा विचित्र फोटो शेअर करून "लग्न करेन तर फक्त राहुल सोबतच', राहुल ला टॅग करा" अशा पद्धतीचे मेमे प्रसिद्ध होत आहे. मात्र अशा मीमविरोधात देखील अनेक लोकांनी फेसबुकच्या पोस्ट्स टाकल्या आहेत. या मीममध्ये ज्यांचे फोटो असतात, त्यांच्यासोबत हे अत्यंत चुकीचे होत आहे. त्यांच्या जाडीची किंवा दिसण्याची यामध्ये खिल्ली उडविण्यात येते. त्यामुळे अशा पद्धतीच्या मीमला आपण पाठींबा देवू नये, अशाही अनेक पोस्ट्स आल्या आहेत. ज्या योग्य देखील आहे. मीम मध्ये 'टॅगाटॅगी' करत असताना आपण समोरच्याची देखील खिल्ली उडवतोय असेही कधी कधी होते. त्यामुळे मीमध्ये टॅग करताना आपण समोरच्याच्या भावना तर दुखवत नाही ना हे ही बघणे आवश्यक आहे.
 
 
 
 
 
 
पॉलिटिकल मीम म्हणजे करमणूकच :
 
असे मीम फेसबुकवर जरा अधिकच शेअर होतात. त्याचे कारण म्हणजे भारतात राजकारण हे सगळ्यांच्याच करमणूकीचे मोठे साधन आहे. आणि एखादी काही घटना घडली की लगेच फेसबुकवर असे मीम शेअर व्हायला लागतात. त्यामध्ये राहुल गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अरविंद केजरीवाल यांच्यावर येणाऱ्या मीम्सची संख्या जास्त आहे. नुकत्याच झालेल्या गुजरात निवडणुकींनंतर तसेच त्याचे निकाल आल्यानंतर अशा मीम्सचा फेसबुकवर अक्षरश: पाऊस पडला.
 
 
 
 
मीम पार्टनर म्हणजे अगदी 'लाईफ पार्टनर' पेक्षाही मोठा बरंका..
 
हे एक नवीनच आहे. असे अनेक मीम्स आता शेअर होत आहेत ज्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त टॅग करणाऱ्या 'मीम' पार्टनरला टॅग करा, किंवा तुमचा मीम पार्टनर हा तुम्हा जीवनसाथीहूनही महत्वाचा आहे, वगैरे आशयाचे भरपूर मीम्स लोक शेअर करतात. आणि त्यामुळे साधारण मैत्री पेक्षाही आता मीम पार्टनर्सची मैत्री अधिकच खास असल्याचे फेसबुकवर दिसून येते.
 
 
 
हॉलिवुड वाल्यांचे, इंग्रजी लोकांचे मारठमोळे मीम्स..
 
इंग्रजी लोक, हॉलिवुडकर आपल्या मराठमोळ्या भाषेत बोलताना कसे वाटतील. अगदी हॅरी पॉर्टर पासून ते हल्क पर्यंत, रोनाल्डो पासून ते स्टीव्ह वॉ पर्यंत सगळ्यांच्याच फोटोचे हावभाव आणि त्याला दिलेला मराठी अर्थ पाहून अनेकदा हसू थांबवणे अशक्य होते. त्यात आपण सार्वजनिक ठिकाणी मोबाइलवर एकटेच हे वाचून हसत सुटलो तर दृश्य वेगळंच असतं. मात्र असे अनेक मीम्स प्रसिद्ध झाले आहेत.
 
 
 
किड्स, अडल्ट्स आणि लेजेंड्स मीम्स :
 
हे मीम्स खूपच प्रसिद्ध झाले आहेत. काही तरी खोचक टिप्पणी करणारे हे मीम्स असतात. उदाहरणार्थ : किड्स सीसीडी मध्ये कॉफी घेतात, अडल्ट्स : स्टारबक्स मध्ये कॉफी घेतात, आणि लेजेंड्स टपरीवरचा चहा पीतात. अशाच पद्धतीचे कितीतरी मीम्स प्रसिद्ध झाले आहेत. हे बघितले की आपल्या मित्रयादीत असलेले कुणीनाकुणी आपल्याला नक्कीच आठवते आणि आपण त्यांना टॅग केल्या शिवाय राहत नाही.
 
 

 
 
 
 
असे कितीतरी मीम्स आहेत. आजकाल तर फेसबुकवर अॅप उघडल्या-उघडल्या कुणाचे लिखाण, कुणाचे फोटोज हे सगळे दिसण्यापेक्षा मीम्सच जास्त दिसतात. नोटिफिकेशन मध्ये देखील 'अमुक तमुक मेन्शन्ड यू' असे पहिले १० नोटिफिकेशन असतात, आणि सगळ्यांमध्ये आपल्याला कुणी ना कुणी कुठल्यातरी मीम वर टॅग केले असते. मग ते 'tag that girl who will be getting married in 2018' असू देत नाही तर 'tag that person who is super lazy' असू देत नाही तर आणखी काही. मात्र या टॅगाटॅगीमुळे अनेकदा महत्वाच्या पोस्ट्स बघणे राहून जाते, किंवा टॅगाटॅगी करत बसण्यात अनेकदा वेळही खूप जातो. तरी यात एक मजा असते हे मात्र नक्कीच.
 
- निहारिका पोळ  

निहारिका पोळ

रानडे इन्टिट्यूट पुणे विद्यापीठातून पत्रकारितेत पद् व्युत्तर शिक्षण. सध्या वेब मुंबई तरूण भारत येथे उपसंपादक. मूळ गाव जबलपूर. कथक नृत्यात अलंकार. कला, संस्कृती, युवांशी संबंधित विषयांवर लिहिण्याची आवड. 

अग्रलेख
जरुर वाचा
बिहारमधील गोपाळगंजमधील घटना, ईदच्या रात्री युवतीचा मृत्यू?

बिहारमधील गोपाळगंजमधील घटना, ईदच्या रात्री युवतीचा मृत्यू?

बिहारमधील गोपालगंजमधील एका युवतीचे धड झाडाला टांगण्यात आले होते. यावेळी युवतीच्या निकटवर्तीयांनी आरोप केला की, गावातील युवकांनी मिळूनच तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि तिची हत्या करण्यात आली. पीडितेने आत्महत्या केली असावी असा समज निर्माण व्हावा यासाठी तिला एका झाडाला टांगण्यात आले होते. संबंधित प्रकरण हे मांझागड ठाणे क्षेत्रातील आहे. पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालत युवतीची हत्या करणाऱ्या प्रियकराच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. पोलिसांनी घडलेल्या घटनेप्रसंगी अनेक तपास करण्यात आले आहेत. या तपासातून संबंधि..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121