"टेक्नो सॅव्ही" चिमुकले..

    19-Dec-2017   
Total Views | 11

 
 
आजचे जग खरोखरीच तंत्रज्ञानाचे जग झाले आहे. मोबाईल आल्यानंतर ९० च्या दशकातील मुलांना कॉलेज मध्ये गेल्यावर किंवा फार फारतर १० वी नंतर मोबाइल वापरायला मिळाले. मात्र आता घरी लहान मूल असेल तर त्याला कार्टून दाखवण्यासाठी सुद्धा वेगळा मोबाइल, टॅब असतो. गेल्या काही दिवसांमध्ये समाज माध्यमांवर देखील लहान मुलांचा वावर वाढला आहे. सोशल मीडियावर लहान मुलांना अधिकच महत्व मिळतंय. त्यांची अधिकच वाह वाह होतेय. त्याचे काय कारण?
 
तर त्याचे कारण म्हणजे त्यांच्या आई वडीलांनी समाज माध्यमांवर त्यांच्या नावाने उघडलेली खाती. इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर अशा माध्यमांवर आता लहान मुलांची खातीही दिसून येतात. त्यांचे आई वडील त्यांच्या भाषेत पोस्ट टाकतात, आणि चाहत्यांना एक वेगळाच आनंद अनुभवता येतो. ही लहा मुले म्हणजे काही शाळेत जाणारी, किंवा पाचवी सहावीती मुले नाहीत, तर अगदीच काही महीन्यांची, काही दिवसांची देखील आहेत.
 
समाज माध्यमे जेव्हा नवीन होती, तेव्हा त्यावर आपले खाते बनवण्यासाठी वय वर्षे १८ ची वयोमर्यादा होती. मात्र काळासकट नियमही बदलले आणि ही लहान मुले समाज माध्यमांवर अधिकच दिसायला लागली. यामध्ये छोट्या पडद्यावरील कलाकारांच्या लहान मुलांची संख्या अधिक आहे. एकता कपूरच्या "कसौटी झिंदगी की" या मालिकेत प्रेमच्या भूमिकेतून प्रसिद्ध झालेला कलाकार करणवीर बोहरा आजकाल त्याच्या स्वत:मुळे नाही तर त्याच्या जुळ्या मुलींमुळे चर्चेत असतो, त्याच्या जुळ्या मुलींचा नुकताच पहिला वाढदिवस झाला. मात्र त्या आधीपासूनच त्या इंस्टाग्राम आणि आता यूट्यूबवर देखील 'स्टार' झालेल्या आहेत. त्यांची नावे आहेत 'बॅला' आणि 'व्हिएन्ना'. त्यांच्या आईने म्हणजेच टीजे सिधूने इंस्टाग्रामवर 'ट्विन बेबी डायरीज' नावाचे एक खाते सुरु केले. आणि या चिमुकल्या गोड मुलींच्या मनात काय विचार येत असतील? ते चाहत्यांपर्यंत पोहोचविले. या पोस्टची भाषा पण चिमुकल्यांचीच असते, हे वाचून असे वाटते की, आपण त्यांच्याच तोंडून हे ऐकत आहोत, वाचत आहोत.
 
 
 
 
 
याच प्रमाणे 'ये रिश्ता क्या कहलाता है." या मालिकेत 'नैतिक' च्या भूमिकेतून प्रसिद्ध झालेला कलाकार 'करन मेहरा' हा देखील आजकाल त्याच्या वर्षाच्याही आतल्या बाळामुळे प्रसिद्ध झाला आहे. इंस्टाग्रामवर 'कविश मेहरा' या नावाचे एक खाते आहे. त्यावर देखील या गोड चिमुकल्याचे फोटोज, व्हिडियोज असतात आणि त्याची भाषा देखील हा काही महीन्यांचा गोडुला काय विचार करत असेल? अशीच असते.
 
 
 
 
रोडीज या रिअॅलिटी कार्यक्रमातून प्रसिद्ध झालेला 'रणविजय सिंघा' याची छोटुकली कन्या म्हणजेच कायनात सिंघा देखील आता इंस्टाग्रामवर आली आहे. तिची आई तिच्या मनातील भावना इंस्टाग्रामवर लिहीत असते, त्यामुळे असे वाटते की ही कन्याच आपल्याशी गप्पा मारतेय. या सर्व खात्यांचे फॉलेअर्स देखील मोठ्या प्रमाणात आहेत. ट्विन बेबी डायरीजचे २५७ हजार फॉलोअर्स आहेत, कविश मेहराचे २८.९ हजार फॉलोअर्स आहेत तर कायनात सिंघाचे ६१.१ हजार फॉलोअर्स आहेत. गम्मत म्हणजे यांच्या खात्यांची खात्री पटवणारी निळी 'टिक' देखील आहे. 
 
 
 
 
कळण्याच्या वयाच्या आधीच ही सर्व लहान मुलं 'स्टार्स' झाली आहेत. त्यांना माहीत देखील नाही, आणि जगात त्यांचे असंख्य चाहते आता पासूनच आहेत. मोठे झाल्यानंतर त्यांना अचानक धक्काच बसला नाही तर मोठी बाब.
 
 
 
 
 
 
तसेच करीनाचा तैमूर, ऐश्वर्याची आराध्या, करन जौहरचे यश आणि रूही, सोहाची इनाया, शाहरुखचा अब्राम आणि असे सर्व 'स्टार किड्स' देखील समाज माध्यमांवर सतत झळकलेले असतात. त्यांची स्वत:ची खाती नसली तरी देखील सर्व माध्यमे त्यांच्या मागावर असतात. त्यामुळे आता काही दिवसांनी समाज माध्यमे ही सिने तारकांच्या, कलाकारांच्या, त्यांनी काय घातलं कुठे गेले अशा 'पेज थ्री' बातम्यांनी नव्हे तर त्यांची मुले काय करतायेत, खेळायला 'प्ले डेट्स' साठी कुणाच्या घरी गेले याच्याच बातम्या दिसणार. काही काळानंतर 'हेय मी या जगात आले.' असे ट्विर करणारे, इंस्टाग्रामवर पोस्ट टाकणारे बाळ नाही दिसले तरच नवल म्हणायचे.
 
 
- निहारिका पोळ  

निहारिका पोळ

रानडे इन्टिट्यूट पुणे विद्यापीठातून पत्रकारितेत पद् व्युत्तर शिक्षण. सध्या वेब मुंबई तरूण भारत येथे उपसंपादक. मूळ गाव जबलपूर. कथक नृत्यात अलंकार. कला, संस्कृती, युवांशी संबंधित विषयांवर लिहिण्याची आवड. 

अग्रलेख
जरुर वाचा
Ram Navami ! कोलकातामधील जाधवपूर विद्यापीठात इफ्तार पार्टीला परवानगी अन् रामनवमीला विरोध

Ram Navami ! कोलकातामधील जाधवपूर विद्यापीठात इफ्तार पार्टीला परवानगी अन् रामनवमीला विरोध

Ram Navami : प. बंगालची राजधानी कोलकातामधील जाधवपूर विद्यापीठातील रामनवमी साजरी करण्यास नकार देण्यात आला आहे. विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना विद्यापिठाच्या आवारात राम नवमी साजरी करण्यास विरोध दर्शवला आहे. विद्यापीठाच्या प्रशासनाने राम नवमी साजरी करण्यास परवानगी दिली नाही. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, आधी रमजानदरम्यान इफ्तार पार्टी करण्यास विद्यार्थ्यांना मुभा देण्यात आली होती. मात्र, राम नवमी साजरी करण्यास नकार देण्यात येत आहे. त्यामुळे राम नवमी उत्सव साजरा का करू दिला जात नाही? असा विद्यार्थ्यांनी प्रश्न..

५० वर्षांपूर्वी इस्लाम धर्म स्वीकारणाऱ्यांची हिंदू धर्मात  घरवापसी

५० वर्षांपूर्वी इस्लाम धर्म स्वीकारणाऱ्यांची हिंदू धर्मात घरवापसी

Hinduism उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यातील स्वामी यशवीर महाराज यांनी एका कुटुंबातील १० मुस्लिम सदस्यांना हिंदू धर्मात घरवापसी केल्याची हिंदूंसाठी आनंदवार्ता आहे. स्वामी यशवीर यांनी शांती करत सर्व १० जणांची इस्लाममधून हिंदू धर्मात घरवापसी केली. ते ५० वर्षांपासून देवबंदमध्ये राहणाऱ्या कश्यप समुदायातील एका महिलेने इस्लाम धर्म स्वीकारला होता. त्यावेळी त्या महिलेचा विवाह हा मुस्लिम व्यक्तीसोबत झाला होता. ती अनेकदा पालकांच्या घरीच वास्तव्य करायची. यामुळे तिच्या सासरच्यांना याबाबत मोठा आक्षेप असायचा. संबंधित..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121