पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर बंदी घालण्याची सुफी उलेमांच्या संघटनेची मागणी

    04-Nov-2017
Total Views | 5


 

नवी दिल्ली : केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ले करण्याचा आरोप असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी आज एका निवेदनाद्वारे सूफी उलेमांच्या संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. आज केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी जाऊन आपले निवेदन देणार असल्याची माहिती सकाळी ‘ऑल इंडिया तंज़ीम उलेमा ए इस्लाम’ या सूफी संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष मुफ्ती अशफाक हुसैन कादरी यांनी दिली होती.

 

 

हे निवेदन देताना सूफी संघटनेच्या अध्यक्षांनी म्हटले आहे की, एका वृत्त वाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही संघटना सक्तीने धर्म परिवर्तन करून केरळच्या हिंदू नागरिकांमध्ये दहशत पसरवत आहे, हे स्पष्टपणे दिसत आहे. काल रवि शंकर प्रसाद यांनीही राष्ट्रीय तपास पथकाच्या शोधकार्यात पॉप्युलर फ्रंट ही संघटना धार्मिक द्वेष पसरवणे आणि बळजबरीने धर्मांतर करण्याच्या प्रकरणात संशयी आढळल्याच्या दाव्याला पुष्टी दिली आहे.

 

 

सूफी संघटनेने म्हटले आहे, आज दिलेल्या निवेदनात आम्ही स्पष्ट केले आहे की, पॉप्युलर फ्रंट ही मुस्लिम ब्रदरहुड या कडव्या धर्मविद्वेशी संघटनेची भारतातील शाखा आहे. ही संघटना भारतासाठी धोकादायक असल्याने त्यावर बंदी घालणे अत्यावश्यक आहे. तसेच पॉप्युलर फ्रंटने दिल्लीतील शास्त्री पार्क येथे उद्या रविवारी ५ नोव्हेंबर २०१७ रोजी आयोजित केलेल्या रॅलीची परवानगी काढून घेण्यात यावी.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121