आज बाल दिन आणि या दिनानिमित्त अनेक लघुपट, जाहीराती, व्हिडियोज आपल्याला बघायला मिळाले असतील, मात्र आजचा हा लघुपट जरासा वेगळा आहे. ही कहाणी आहे एका जोडप्याची, श्रेया आणि कबीरची. बायको एका मोठ्या कंपनीत काम करणारी महत्वाकांक्षी स्त्री. नवरा एक उत्तम उद्योजक आणि दुबईत नवा उद्योग स्थापन करण्याच्या प्रयत्नात. असं हे जोडपं सुखात असतं, आनंदात असतं. आणि अचानक एक दिवशी कळतं की श्रेया गरोदर आहे. पण ते दोघेही या मोठ्या जबाबदारीसाठी तयार नसतात. आणि मग?...
मग होतं असं की श्रेया 'अबॉर्शन' करण्यासाठी जाते. मनातून धाकधूक असते, आपण करतोय ते बरोबर करतोय का हा विचार सतत मनात घोळत असतो. त्यातून कबीरला दुबईला जावं लागतं त्यामुळे कुठतरी एकटं पडल्यासारखं वाटतं. पण या घालमेलीत ती काय निर्णय घेते? तिला बाळ हवं पण असतं, मात्र कबीरचा याला नकार असतो. अशा वेळी ती काय करते? जाणून घेण्यासाठी नक्की बघा हा लघुपट.
एसआयटी या यूट्यूब वाहिनीनं प्रदर्शित केलेल्या या लघुपटाला आतापर्यंत ३ लाख १२ हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या लघुपटात मुख्यभूमिका निभावल्या आहेत छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कलाकार नमित दास आणि मानसी पारेख यांनी या लघुपटाची संकल्पना आणि दिग्दर्शन आहे मोहित हुसैन यांची तर संवाद लिहीले आहेत छवी मित्तल यांनी. कहाणीत पुढे काय झालं जाणून घेण्यासाठी एकदा तरी नक्कीच बघा 'द राइट टाईम'.
- निहारिका पोळ
शुभम भवतु म्हणणारा आवाज कायमचा थांबला: जेष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे निधन!..