दिवाळी हा सण आला की आमच्या सारख्या घराबाहेर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा मुला-मुलींना घरी जाण्याची एक संधी मिळते. आपण जितकं घराला मिस करत असतो त्याहून कितीतरी जास्त घर आपल्याला मिस करत असतं पण बरेचदा आपल्याला त्याची किंमत कळत नाही. आपण आपल्या कामात आपल्या आयुष्यात इतके गुंग असतो, कि आपल्या भवती त्यांचे आयुष्य निर्माण करणारे आपले आईवडील यामुळे दु:खी होवू शकतात हे आपल्या लक्षातच येत नाही. मात्र सणावाराला आपल्याला हमखास या सगळ्याची आठवण येते आणि किंमतही कळते, असेच काहीसे दाखवले आहे, या लघुपटात.
आएशा शिक्षणासाठी म्हणून न्यूयॉर्कला जाते तिथून शिक्षण संपवून घरी आल्यानंतर तिच्या आई वडीलांना अत्यंत आनंद झाला असतो. ते तिला मोबाईल भेट म्हणून देतात. खूप खुश असतात. मात्र आएशा तिच्या आयुष्यात इतकी गुंग असते की काय सांगणार. ती नोकरी साठी मुंबईला अर्ज करते, आणि तिला मुंबईत नोकरी मिळते. मात्र तिच्या जाण्याने घर पुन्हा सुने होणार याची जाणीव फक्त तिच्या आई वडीलांना असते, मात्र तिच्या स्वप्नांसाठी ते तिला जावू देतात.
तिच्या मुंबईला गेल्यानंतर तिच्या आई वडीलांना खूप आठवण येते, ते तिला फोन मॅसेज करतात, मात्र ती तिच्या आयुष्यात व्यस्त असते. आई इतक्यात येते दिवाळी. आता आएशाला देखील तिच्या आई वडीलांची खूप आठवण येते. तिला घराची, आईच्या हातच्या लाडवांची खूप आठवण येते. मग ती त्यांना सरप्राइज देते. ती असं काय करते? जाणून घेण्यासाठी हा लघुपट नक्की बघा.
पॉप एक्सो तर्फे प्रदर्शित करण्यात आलेल्या ८१ हजार व्ह्यूज मिळाले आहेत. दिवाळीचा आस्वाद घेण्यासाठी हा लघुपट नक्कीच बघा.
रानडे इन्टिट्यूट पुणे विद्यापीठातून पत्रकारितेत पद् व्युत्तर शिक्षण. सध्या वेब मुंबई तरूण भारत येथे उपसंपादक. मूळ गाव जबलपूर. कथक नृत्यात अलंकार. कला, संस्कृती, युवांशी संबंधित विषयांवर लिहिण्याची आवड.