आकाशाशी जडले नाते- सूर्यवंशी गंधार

    04-Jan-2017   
Total Views |

आकाशाशी जडले नाते- सूर्यवंशी गंधार 

“आबा, हा कसला रोल आहे तुमच्या हातात?”, सुमितने आबांना विचारले.

“एक जुना नकाशा आहे. या नकाशाच्या आधारे, सूर्य मंदिरे पहायच्या निमित्ताने भटकंती करू.”, बोलता बोलता आबांनी नकाशा टेबलवर पसरला. आणि हातात भिंग घेऊन बराच वेळ आबा त्यात वाकून पाहू लागले.

“शंकरराव, आणखीन थोडं वाकालात तर आत मध्ये पडाल बरे, डुबूकन्!”, दुर्गाबाईंच्या वाक्याने आबांना हसू आवरेना! हसत हसतच आबा म्हणाले, “दुर्गाबाई, सांगा बरे आपण कोणत्या प्रांतातील सूर्य मंदिरे पहिली आहेत?”

आता दुर्गाबाई पण नाकावर चष्मा चढवून, नकाशात वाकून पाहू लागल्या. “आपण – उज्जैनीचे कर्कराजेश्वर, कलिंगचे कोणार्क, गयाचे दक्षिणार्क आणि काश्मीरचे मार्तंड मंदिर पहिले आहे. आणि एक आदित्य मंदिर पहिले होते, पण ते मुलतान कोठे दिसत नाही.”, दुर्गाबाई म्हणाल्या.



“प्रांतांची जुनी नावे असल्याने, त्यांची नव्याने ओळख करून देतो. आदित्य मंदिर होते सप्तसिंधू प्रांतातले. सप्तसिंधू म्हणजे ७ नद्यांचा प्रदेश – सिंधू, रावी, बियास, झेलम, सतलज, चेनाब आणि सरस्वती. यातील सरस्वती नदी नंतर लुप्त झाली.”, आबांच्या पेनसिलीने नकाशावर प्रवासाला सुरवात केली होती.

“आबा, यातील तीन प्रांत रामायण व महाभारतातील राजकन्यांमुळे मला माहित आहेत - केकयची कैकयी, गंधारची गांधारी आणि मद्रची माद्री!”, सुमित म्हणाला.
“भले सुमित! अगदी बरोबर! आता गंधार या नावाची आठवण ‘कंदाहर’ नावाच्या अफगाणी शहरात उरली आहे.

“तर आजच्या गोष्टीची सुरवात सूर्यवंशी राम आणि भरतापासून होते! भरताचे आजोळ म्हणजे केकय देश. भरताची मुले – पुष्कल व तक्ष यांनी गंधार प्रांतात दोन नगरी वसवल्या – पुष्कलावती आणि तक्षशीला. तर रामपुत्र लवने, लवपुरी नगरी वसवली असे म्हणतात. या तीनही नगरींची आपण सफर करू.

“लवपुरी म्हणजे आजचे लाहोर. लव आणि कुशचे गुरु वाल्मिकी, यांचे मंदिर आजही लाहोर मध्ये पाहायला मिळते!

 
“पुष्कलावती नगरी काही काळ गंधारची राजधानी होती. या नगरीचे नाव बदलत बदलत पुढे – पुरुषपुरा व मग पेशावर झाले. ही रम्य नगरी अतिशय मोक्याच्या ठिकाणी वसली आहे - खयबर पास जवळ. भारतावरची अनेक आक्रमणे या नगरीने झेलली.


“आणि आता तक्षशीला नगरी! गंधारची राजधानी म्हणून मोठा काळ गाजवलेली नगरी! या नगरीत प्राचीन Silk Road ला अयोध्येहून येणारा उत्तरापथ मिळतो.

“उत्तरापथ आता Grand Trunk Road नावाने ओळखला जातो. आशिया खंडातील हा सर्वात जुन्या व सर्वात मोठ्या highways पैकी एक. बांगलादेशातील चीटगोंग पासून, कोलकोता, बनारस, दिल्ली, अमृतसर, लाहोर, पेशावर, करत अफगाणिस्तानातील काबुल पर्यंत जाणारा महामार्ग.

“तर Silk Route हा युरोप, Egypt, पर्शिया, रशिया आणि चीन यांना जोडणारा महामार्ग. Egyptian glass, Persian carpets, Indian spices, Chienese silk इत्यादी व्यापाराचा राजमार्ग.

“या भौगोलिक स्थानामुळे तक्षशिला एक मोठे Trade Center म्हणून भरभराटीस आले.

“या शिवाय तक्षशीलेला विश्वविख्यात विद्यापीठ होते. देशोदेशीचे हजारो विद्यार्थी - आयुर्वेद, स्थापत्य, गणित, ज्योतीर्शास्त्र, अर्थशास्त्र, भाषा इत्यादी विषय शिकत असत. या विद्यापीठातून शिकलेले काही विद्यार्थी रत्न पहा – चाणक्य, पाणिनी आणि चरक!

“७ व्या शतकात तक्षशीला नगरीचे प्राबल्य संपले. आता या ‘Taxila’ नगरीचे अवशेष World Heritage Center म्हणून घोषित केले आहेत.



“तर सूर्यवंशी राजांच्या या गंधार प्रदेशात, सहाजिकच अनेक सूर्य मंदिरे होती. पण आता काबुल जवळ त्यातील एक मात्र सूर्य मंदिर शिल्लक आहे.”, आबा म्हणाले.

“आबा, इतक्या दऱ्याखोऱ्यात फिरून, नद्या ओलांडून एकच सूर्य मंदिर?”, सुमित म्हणाला.

“एक तरी सूर्य मंदिर पाहायला मिळाले हेच आश्चर्य आहे! ग्रीक, हुण, मोंगल, अरब, मुजाहिदीन, Russian Occupation आणि तालिबानच्या विळख्यात या भागाचा पार नायनाट झाला आहे.


”असो. पुढच्या वेळी, तुला असुरांच्या प्रदेशात नेऊन खूप सूर्य मंदिरे दाखवीन!”

 

 

दीपाली पाटवदकर

संतसाहित्य, खगोलशास्त्र, भूमिती, इतिहास व चित्रकला या सर्वाचा मिलाफ त्यांच्या लिखाणात आहे. ‘चित्र ज्ञानेश्वरी’ हे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवरचे चित्रमय पुस्तक, 'नक्षत्रांची फुले' हे आकाशाच्या गोष्टींचे पुस्तक प्रकाशित. त्यांनी काढलेल्या ज्ञानेश्वरी व आकाशाच्या चित्रांची प्रदर्शने झाली आहेत. त्यांची चित्रे व पुस्तके www.facebook.com/kalaapushpa पाहायला मिळतील.

अग्रलेख
जरुर वाचा
छत्रपती शिवाजी महाराज भारताच्या शाश्वत विजयाचे प्रेरणास्त्रोत

छत्रपती शिवाजी महाराज भारताच्या शाश्वत विजयाचे प्रेरणास्त्रोत

"छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या शाश्वत विजयाचे प्रेरणास्त्रोत आहेत. शिव चरित्राचा अभ्यास करून आपण त्यांच्या ऋणानुबंधाशी जोडले जातो. शिवचरित्र कायम संघर्षाची प्रेरणा देते. म्हणूनच त्यांस युगंधर, युगप्रवर्तक आणि युगपुरुष म्हणतात. एक व्यक्ती आणि राजा म्हणून शिवाजी महाराजांचे चारित्र्य अनुकरणीय आहे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. नागपुरातील मुंडले सभागृहात 'युगंधर शिवराय' हे पुस्तक नुकतेच सरसंघचालकांच्या शुभहस्ते प्रकाशित झाले. त्यावेळी ते बोलत होते. Yug..

अखेर मध्यरात्री वक्फ सुधारणा विधेयकाला लोकसभेत मंजुरी! सभागृहात काय काय घडलं?

अखेर मध्यरात्री वक्फ सुधारणा विधेयकाला लोकसभेत मंजुरी! सभागृहात काय काय घडलं?

नवी दिल्ली : (Waqf Amendment Bill Passed in Lok Sabha) केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी यांनी बुधवार दि. २ एप्रिल रोजी बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर केले. सभगृहात या विधेयकावर चर्चा करण्यासाठी आठ तासांचा कालावधी देण्यात आला होता. पुढे दुपारी १२ वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या दीर्घकाळ चर्चेनंतर झालेल्या मतदानामधून अखेरीस वक्फ दुरूस्ती विधेयक लोकसभेत पारित करण्यात आले. यावेळी या विधेयकाच्या बाजूने २८८ मते पडली. तर, विरोधात २३२ मते पडली आहेत...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121