लव्हिंग फॅमिली या ग्रुपमध्ये निखिल सह त्याचे आई, वडील, भाऊ, बहिणी, आत्या, काका, चुलत भावंड, कॅनेडात असलेली ताई, जर्मनीत असलेला दादा सगळे होते.. रोज नवीन धमाल असायची त्या ग्रुप वर.. पण आज मात्र काही तरी खास आहे... आज आहे निखिलचे आजोबा म्हणजेच बापू आजोबांचा वाढदिवस.. आणि तयारी सुरु आहे त्यांना सरप्राइज देण्याची.....
_H@@IGHT_900_W@@IDTH_1200.jpg)
निखिल : दादा काका संध्याकाळी डॉट ६.३० ला आपण निघूया.. म्हणजे आजोबांचं फिरणं होई पर्यंत we can come back.. आणि त्यांना doubt पण येणार नाही..
दादा काका : हो रे मस्त आयडिया...
सोनल ताई : ए तुम्ही सगळे कित्ती धमाल करणार यार..



मला पण यायचंय.. i wish बापू आजोबांचा बर्थडे डिसेंबर मध्ये असता... मी आणि सतीश पण आलो असतो...
मैत्रेयी काकू : हो नं गं सोना तू आली असतीस तर बापूंना पण खूप आनंद झाला असता गं.. दोन वर्ष झाली तुला बघितलं ही नाहीये गं बेटा..
मैत्रेयी काकू : भाऊजी तुम्ही पण... अरे देवा ..
निखिल : अरे संध्याकाळचं प्लानिंग सोडून TP काय करताय... सगळे ७.३० पर्यंत पोहचा पण...
आई : निखिल जा आधी दही घेवून ये..
सोनल ताई : 

अर्णव दादा : waooo it seems so much fun is going on.. wish bapu ajoba from my side too. Atya i miss gajar cha shira made by u...
आनंदी : लो आ गये फिरंगी... ए मराठीत बोल की दादा...


नाही तर जर्मन भाषेत तरी बोल..
अर्णव दादा : हो हो.. मला गाजराचा शिरा पाठवून द्या...

सोनल ताई : निखिल do send the pics haan...
निखिल : yup नक्की सेंडतो...
( शाल्मली, सोनल ताईची २ वर्षाची मुलगी : तिने व्हॉइस नोट पाठवला.. happy bday bapu aaba... )
मैत्रेयी काकू : छकू गं माझी ती.. सोना घेवून ये गं हिला पटकन... मोठंच होउन जाईल आमचं पिल्लू गं...
निखिल : सोना ताई घेवून ये प्लिज हिला... Picsss pathav naa...
सोनल ताई : आधी तुम्ही पाठवा..

मैत्रेयी काकू : ए ड्रेसकोडचं काय??
आनंदी : अगं आई... कालच ठरलं ना ग्रुपवर.. ब्लू व्हाईट कॉम्बिनेशन..
आई : ए ड्रेसकोड नको... वाटेल ते घाला..
सोना ताई : 

फोटो नक्की पाठव हां..
बाबा : ए आता गप्पा बंद करा.. भेटूच दोन तासात....
( संध्याकाळच्या कार्यक्रमानंतर....)
निखिल :
सोनल ताई : omg... बापू आजोबा कसले गोड दिसताते....


अर्णव दादा : seriously... I am seeing him after almost 6 years... Thanks a lot nikhil...
शिवा : we missd u sona tai and arnav dada...
आनंदी : yess we really missed u..
दादा काका : निखिल मुळे हे शक्य झालं.. good beta...
निखिल : बापू आजोबांची reaction बघण्या सारखी होती...
( कोण म्हणतं आजच्या काळात नाती लांब गेली आहेत.. तुमचे माझे सगळ्यांचे असे अनेक फॅमिली ग्रुप्स असतील.. मामाच्या बाजूचा एक, काकाच्या बाजूचा एक, भावंडांचा एक.. हो नं.. आणि त्यातही अशीच चकल्लस होत असणार.. निखिलच्या बापू आजोबांना ग्रुप वरची ही धमाल कळल्यावर, शाल्मलीचा व्हॉइस नोट ऐकल्यावर कित्ती आनंद झाला असेल नाही... )
- निहारिका पोळ