#Whatsapp Buddies हाऊ डेअर यू..

    20-Jan-2017   
Total Views |

 
(चारु आणि सम्यक एक मेकांच्या आकंठ प्रेमात बुडालेलं कपल. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद होत आहेत. चारु जितकी social media maniac आहे, सम्यक तितकाच शांत आणि जगापासून दूर पळणारा... चारु आणि सम्यक यांच्यातील नातं व्हॉट्सअॅप आणि फेसबुक वरुन जाहीरपणे सांगणं, त्यांच्या पर्सनल गोष्टी share करणं त्याला काही पटत नव्हतं. यामुळेच झाली भांडणं आणि त्याचा परिणाम झाला अत्यंत वाईट...)



सम्यक : 
चारु listen to me baby, is it IMP to share all personal stuff of ours on social media? म्हणजे... का? का सांगायचं सगळ्यांना की आज आपण भांडलो आहोत?

चारु : अरे मी काही ठरवून करत नाही ते. माझ्या mood शी रिलेटेड एखादा quote मिळतो मला fb वर मग करते मी तो शेअर त्यात एव्हढं काय? 😒

सम्यक : only qoute? is it only about the qoutes? नाही चारु.. see ur whatsapp status.. "ना समझ पाए वो मुझे कभी तो खता क्या है? दिल का हर अरमान पूरा हो ये जरूरी तो नहीं." काय आहे हे? इतकी sad आणि dull लाईफ आहे का तुझी? or i really dnt understand you? तुला कितीदा सांगितलं आहे की आपल्यात काही issues झाले तर ते मला कळण्याच्या आतच एफबी आणि व्हॉट्सअॅपवर टाकतेस तू, मला नाही आवडत हे. जस्ट.. काल मी खूप दमलेलो होतो, नाही बोलू शकलो फोन वर म्हणून लगेच असा स्टेटस टाकावा का? आपले सगळे friends मला फोन करुन विचारताते काय झालं तुमच्यात म्हणून? 😠

चारु : come on सम्यक.. हा स्टेटस तुझ्यासाठीच असेल असं कुणी म्हटलयं. हा मृण्मयीसाठी, आई बाबांसाठी, आशुसाठी कुणासाठीही असूच शकतो ना अरे? 
 
सम्यक : हा असा स्टेटस कोण आपल्या बेस्ट फ्रेंड, आई बाबा किंवा लहान भावासाठी टाकतं तूच मला सांग चारु. use थोडासा common sense yar... 😵
seee...
just now मला मृण्मयीचाच messege आला.. काही झालंय का तुमच्यात.. चारु सांगत होती गेल्या दोन महीन्यांपासून तू तिला जवळही घेतलं नाहीयेस.. what the hell is this yar... हे सगळं मृण्मयीला सांगण्याची काही तरी गरज होती का?😣

चारु : अरे ... she is my best friend yar... इतना तो बनता है. असं काय सांगितलंय मी.. खरंच तर सांगितलंय ना? जरा प्रेमानी बोलला आहेस तू? नुसतं आपलं routine.. गुड मॉर्निंग, गुड नाईट, ऑफिसला पोचलो, जेवलो. काय हे? आपण भेटलो की सुद्धा फक्त जॉब आणि कामाच्याच गप्पा. भेटलो तरीही तू माझा हातही पकडत नाहीस, जवळ घेणं तर फारच लांब राहीलं रे..  इतके दिवसात आपण कुठे बाहेरही गेलेलो नाही. मग काय करु मी दुसरं?😞

सम्यक : तुलाही माहितीये सोना मी सध्या कुठल्या टेंशन्समध्ये आहे. जॉबचं टेन्शन, घराचं टेन्शन, बाबांच्या तब्येतीचं टेन्शन काय करु मी तरी? i am so sorry dear.. पण आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम्स असल्यावर ते जग जाहीर करणं गरजेचं आहे का?😥😥

चारु : let people know na की तू कसा वागतोय माझ्याशी म्हणजेच तुला कळेल.. what i am feeling right now.. आणि मी फक्त माझ्या बेस्ट फ्रेंड ला सांगितलं आहे. 😖

सम्यक : हो का ? आणि हे काय मग? फेसबुक वर? feeling alone... i wish old days could come back i wanna be loved... attentionless.. what is this yar.. 246 likes, 77 comments.. आली मजा तुला आता हे सगळं करुन? तुझ्या मॉमने विचारलंय कमेंटमध्ये काय झालं सगळं ओके आहे ना? त्यांना का टेंशन देतेयस?😣😣😣

चारु : see सम्यक कुणाला एव्हढं काही पडलेलं नाहीये. कुणालाही इतका वेळही नाहीये. 

सम्यक : हो म्हणूनच इतके कमेंट्स आणि लाईक्स आले नाही का? अगं जगाला गॉसिप हवंच असतं. आणि चारु तू तुझ्या मैत्रिणींशी काय बोलतेस हे मला माहीत नाहीये असं समजू नकोस. माझं तुझ्यावर खरच प्रेम आहे, म्हणून मी आता पर्यंत गप्प होतो, but this is the limit.. तुला मजा येते self victimization करायला. sympathy gain करायला.. मला नाही आवडत हे कारण its not only about you.. its about us.. i think we need a break.. मला अजून माझ्या आयुष्याची जाहीरात करुन घ्यायची नाहीये. तुला काय हवं ते तू कर..😫😫😫

चारु : R u insane? इतक्याशा गोष्टीवरुन you are breaking up with me?
😨
सम्यक : i wanna keep my personal life very personal... तुझ्यासाठी ही इतकीशी गोष्ट असेलंही. पण माझ्यासाठी नाहीये.. सो प्लीज.. नंतर बोलूयात बाय...

चारु : अरे पण....
सम्यक : बाय...

चारु : 😧 😢😢😢
 
( आपल्या पर्सनल लाईफला शक्यतितकं पर्सनल ठेवलं पाहीजे नाही का? लोकांना काय गॉसिप हे नेहमीच लागतं. आपल्यालाही टाईमपास साठी गॉसिप पाहीजेच. पण आपणच का म्हणून लोकांचं गॉसिप व्हावं? पर्सनल लाईफ पब्लिक केल्यावर पर्सनल नातीही पब्लिक होतात, त्यातील भांडणंही.. आणि मग आपलंसं असं, पर्सनल, खाजगी.. काही उरतच नाही... ) 

निहारिका पोळ

रानडे इन्टिट्यूट पुणे विद्यापीठातून पत्रकारितेत पद् व्युत्तर शिक्षण. सध्या वेब मुंबई तरूण भारत येथे उपसंपादक. मूळ गाव जबलपूर. कथक नृत्यात अलंकार. कला, संस्कृती, युवांशी संबंधित विषयांवर लिहिण्याची आवड. 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121