#What`s app Buddies- अरे... इट्स अ ट्रिप ना..

    13-Jan-2017   
Total Views |
(श्वेता, राहूल, मैत्रेयी, अदिती, शोभित आणि मुग्धा छान ट्रिप वर गेले आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात, जंगल, नदी आणि प्रकृती अनुभवायला... पण मुग्धा आपली फोटो काढून पोस्ट करण्यातच busy. कधी फेसबुक, कधी ट्विटर, कधी इन्स्टाग्राम आणि सगळ्या व्हॉट्सअॅप ग्रुप्स वर सुद्धा अपडेट असणं हे महत्वाचंच आहे नाही का? मात्र यामुळे खरोखरच निसर्ग enjoy करण्यासाठी आलेले इतर सगळे irritate झाले आहेत.. बघूया पुढे काय होतं ते... ) 
 
 
राहूल : मुग्धा stop yar.. enough yar आता किती फोटोज आणि सेल्फीज काढणार आहेस? झालं ना आता... common yar. ठेव तो फोन आता..
 
मुग्धा : yar we are here for the frst time.. आपण काय सारखं सारखं येणार नाही इथें. मग मला सगळे पिक्स क्लिक करुन फेसबुक वर पण टाकायचे आहेत. i wanna tell the world i am enjoying every bit of it.. 😍
 
शोभित : ohhh common.. yar common.. जगात घंटा कुणाला काही पडलेली नाही कोण कुठे फिरायला गेलंय, काय करतंय ते.. look at the view man... जरा कॅमेऱ्याची ती छोटीशी स्क्रीन बाजूला करुन डोळे फाडून बघ... नजर जाईल तिथे फक्त पाणी आहे.. isn't it amazing?😍😍😍
मुग्धा : true wat a view... इन्स्टा वर इफेक्ट्स दिले ना की अज्जून भारी दिसेल हे.. 😎
 
अदिती : मुग्धा बास अगं.. look at the real view na.. इफेक्ट द्यावासाच कसा वाटतोय तुला यार.. its nature efffect and its perfect.. 😃
 
मैत्रेयी : ए खरच... its soooo beautiful.. ए चला ना आपण अजून थोडं वर जाऊ तिकडे, तिथून तर अजून भारी दिसेल ना...
 
मुग्धा : hey i will be back.. इथे रेंज नाहीये, नेट नीट चालत नाहीये.. मला आपल्या ग्रुप वर पोस्ट करायचंय.. आणि रेंजच येत नाहीये. त्या मघाच्या पॉईंट ला होती रेंज मी तिथे जावून टाकते.. आणि येते पटकन.
 
श्वेता : Don't spoil the mood yar mugdha... आता तू एकटीच कुठे जातेय मागे परत.. we cant wait and not even we can allow you to go alone.. just for the sake of your idiotic range.. 😠
 
मुग्धा : पण काही लांब थोडी जायचंय.. you can see me from that point yar...😦
 
मैत्रेयी : अगं पण आपण एकटे फिरायला आलोय का इथे? we came together because we wanna enjoy together na... 
 
राहूल : like seriously? 😰 you seriously wanna go just to post pictures on our group? mugdhaaa.. you can do it once we reach  hotel na.. 
 
मुग्धा : अरे तो पर्यंत खूप पिक्स होतील. इतके टाकता येणार नाहीत म्हणून मी लगेच तेव्हाच्या तेव्हा टाकतेय ना..
 
शोभित : अगं पण दर मिनिटाची रिपोर्ट द्यायला कुणी compulssion केलंय का? चिल ना.. आणि एन्जॉय कर.. आणि प्लिज आम्हालाही करु दे.. 
 
मुग्धा : ohhhh... so I am stopping you all from enjoying.. ठिके.. करा तुम्ही तुमचं एन्जॉय.. आणि मला माझं करु द्या.. आई बाबा आणि तुमच्यात काही फरक नाही.. सतत माझ्या मोबाईल वरुन बोलत असतात.. हे कर ते करु नकोस.. enough yar... i wanna keep each and every memory of our trip.. and wanna tell people how awesomely we are enjoying it.. 
 
श्वेता : हो नां. कसंलं ऑसम एन्जॉय करतोय ना आपण की भांडतच बसलोय.. 😂😂😂
 
मैत्रेयी : बरं बाई आता जे फोटोज काढायचे आहेत ते पुढे जावून काढ आणि तिथूनच टाक.
 
मुग्धा : पण तिथे रेंज नाही मिळाली तर?
 
राहूल : तर.. घे तुझा मोबाईल आणि घाल माझ्या डोक्यात.. बावळट.. चल आता हाल इथून..
 
मुग्धा : guysss.. common yar.. you people are so boaringggg...
 
सगळे : हो माहीत आहे... चलललल आता...
 
(मुग्धा हिरमुसते, रागावते, चिडते.. पुढचे काही तास कुणाशीच बोलत नाही.. सगळे तिला थोडं ignore सुदधा करतात. कारण त्यांना निसर्ग एन्जॉय करायचा होता... आणि जगाला काय नंतरही सांगितलं तर काय असा मोठा फरक पडणार आहे... we all are same.. आपणही वागतो कधीतरी मुग्धा सारखं.. पण the beauty of nature can only be felt.. त्याला आपण कितीही कॅप्चर करायचा प्रयत्न केला तरी होवू शकत नाही.. one thing we can do is.. पेशंस ठेवून थोडावेळ मोबाईल आणि स्वत: ला वेगळं करावं आणि जेव्हा पुन्हा त्या आठवणी जगण्याची इच्छा होईल तेव्हा ते फोटोज फेसबुक वर टाकून जगाला सांगावं.. पण हाँ.. फिरुन आल्यानंतर हाँ... )  
-निहारिका पोळ

निहारिका पोळ

रानडे इन्टिट्यूट पुणे विद्यापीठातून पत्रकारितेत पद् व्युत्तर शिक्षण. सध्या वेब मुंबई तरूण भारत येथे उपसंपादक. मूळ गाव जबलपूर. कथक नृत्यात अलंकार. कला, संस्कृती, युवांशी संबंधित विषयांवर लिहिण्याची आवड. 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121