#ओवी Live - सूर्याचे चालणे

    04-Sep-2016   
Total Views |

 सूर्याचे चालणे

"पूजा ताई, तू म्हणतेस ना, पूर्वी भारतात ज्ञानाचे मोठे भांडार होते. कशावरून?", सागरने पृच्छा केली.

पूजा म्हणाली, “त्यासाठी आपल्याला खूप मागे जायला लागेल. ब्रिटिश राजच्या आधी. शिवाजी महाराजांच्या आधी, यादव कालीन महाराष्ट्रात आपण जाऊ. १२९० सालात. किती जुनी गोष्ट आहे बघ ही - तेंव्हा युरोपचा मार्को पोलो चीनची सफर करत होता. अमेरिकेत रेड इंडियन, अझटेक इत्यादी जमाती नांदत होत्या. ऑस्ट्रेलिया मध्ये आदिवासी राहत होते. मोंगल जेन्गीझ खानचे साम्राज्य चीन, रशिया व पर्शिया मध्ये पसरले होते. आणि युरोपचे गणितज्ञ भारतीय दशमान पद्धत (, , , ३ … ९) शिकत होते.

इतक्या पूर्वी आपण जात आहोत. नेवासे या गावी. ज्ञानेश्वर गीतार्थ सांगतायत तिथे.”

ओह! म्हणजे ज्ञानेश्वरी ना? पण ज्ञानेश्वरीचा विज्ञानाशी काय संबंध?”

ज्ञानोबांनी सामान्यातल्या सामान्य माणसा पर्यंत गीता पोहोचावी या हेतूने अगदी रोजची, माहितीतली उदाहरणे देऊन अवघड संकल्पना समजावून दिल्या. या उदाहरणां मध्ये काही वैज्ञानिक उदाहरणे ज्ञानोबा सहज देतात. त्यातला हे एक उदाहरण–

मी कर्म करतो हा एक देखावा आहे. मी काम करतोय असे दिसते, पण विवेकाने विचार केला असता कळते की आपली हालचाल हा प्रकृतीचा खेळ आहे.

उदाहरणार्थ, नावेतून जातांना काठावरची झाडे पळतांना दिसतात. पण विचार केला असता झाडे स्थिर असून आपण फिरत आहोत असे कळते.

किंवा रोज सूर्याचा उदय-अस्त पाहून, सूर्य चालत आहे असा भास होतो. पण विचार केला असता सूर्य स्थिर असून पृथ्वी फिरत आहे हे कळते.”


 

सागर आश्चर्याने म्हणाला, “Wow! Interesting! तुला माहितेय, १६३२ मध्ये गलेलिओचे Dialogue concerning two chief world systems नावाचे पुस्तक प्रकाशित झाले. ह्या पुस्तकात गलेलिओने Solar System Heliocentric असल्याचे पुरावे दिले.

त्याकाळी, युरोप मध्ये पृथ्वी स्थिर असून सूर्य पृथ्वी भोवती फिरतो असा समज दृढ होता (Geocentric Solar System). त्यामुळे, चर्चने गलेलिओ विरुद्ध खटला चालवला. त्याच्या पुस्तकावर बंदी घातली. त्याच्यावर 'असले' सिद्धांत शिकवायला, नवीन पुस्तक लिहायला बंदी घातली. पुढची १० वर्ष, त्याच्या मृत्यु पर्यंत गेलेलिओ नजर कैदेत राहिला.

Galelio आधी ४५० वर्ष, Heliocentric Solar System भारतातल्या एका लहान गावातल्या सामान्य माणसांना परिचित होती. ही आचंबित करणारी गोष्ट आहे!”

-दिपाली पाटवदकर

 

दीपाली पाटवदकर

संतसाहित्य, खगोलशास्त्र, भूमिती, इतिहास व चित्रकला या सर्वाचा मिलाफ त्यांच्या लिखाणात आहे. ‘चित्र ज्ञानेश्वरी’ हे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवरचे चित्रमय पुस्तक, 'नक्षत्रांची फुले' हे आकाशाच्या गोष्टींचे पुस्तक प्रकाशित. त्यांनी काढलेल्या ज्ञानेश्वरी व आकाशाच्या चित्रांची प्रदर्शने झाली आहेत. त्यांची चित्रे व पुस्तके www.facebook.com/kalaapushpa पाहायला मिळतील.

अग्रलेख
जरुर वाचा
अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Bangladeshi राजस्थानातील अजमेर पोलिसांनी २३ वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी घुसखोरी व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या आहेत. व्हिसाशिवाय अवैधपणे बांगलादेशी व्यक्तीने भारतात घुसखोरी केली आणि त्याला तब्बल २३ वर्षानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित अवैधपणे घुसखोरी करणाऱ्याचे नाव हे मोहम्मद शाहिद असून त्याचे वय वर्षे हे ४० आहे. तो अजमेरमधील अंदर कोट परिसरात अवैधपणे वास्तव्य करत होता. एटीएएफने एकूण अकरा कारवायांमध्ये एकूण २१ घुसखोरांना पकडले आहे. दरम्यान, आता दर्गा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121