"आई! आज Dentist काकांची appointment घे ना. काल शाळेत checkup झाला तेंव्हा त्यांनी सांगितले की दातात किटण साठलंय, clean करायला हवेत."
"आई! कालची भाजी डब्यात तशीच राहिलीये. ई!! किती घाण वास येतोय!"
"अग! हा दुसरा kindle मागचं वर्षभर तसाच पडून राहिल्याने खराब झालाय. पुढच्या आठवड्यात office मध्ये e-waste collection drive आहे. तिथे टाकून द्यायची आठवण कर."
"सिंक मध्ये पाणी तुंबलं आहे, आज plumber ला बोलवायला हवं." आई स्वतःशीच म्हणाली.
सकाळच्या गडबडीत चाललेला हा संवाद ऐकून, आजी म्हणाली, "साचतं ते नासतं! वाहतं ते टिकतं!"
आजी बरोबर मटार सोलायला घेत, जयूने आजीला विचारले, "म्हणजे ग काय?"
"अग, दातात अन्नाचे कण अडकून, साठून राहिले की दात किडतो. डब्यातली भाजी तशीच डब्यात राहिली तर कुजते. पाणी वाहिलं नाही तर तुंबून त्याची घाण सुटते. एकांच्या तर घरी म्हणे इतका काळा पैसा ठेवला होता, की ठेवून ठेवून त्या नोटांना वाळवी लागली! जे न वापरता साचून राहते ते नासून जातं. ज्याचा वापर होतो, जे वाहतं राहतं त्याचं चीज होतं.
"नदी कशी वाहत राहते. काठावरच्या प्राण्यांना पाणी देत जाते. देऊन देऊन तिचे पाणी कमी होत नाही, उलट तिच्या देण्याने प्रेरणा घेऊन इतर नद्या तिला मिळतात. तिचा ओघ मोठा होतो. सरते शेवटी आपले सर्व पाणी सागरात अर्पण करून ती महासागर होते!"
"तू सांगेतेयेस ते खरं आहे हं आजी! अग आमच्या वर्गातल्या काही मुलींनी pocket-money एकत्र करून School-Kit* साठी donate करायचं ठरवलं. ते पाहून कितीतरी विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, अगदी शाळेच्या watchman ने पण त्या फंडसाठी थोडे थोडे पैसे दिले. तो छोटासा फंड पाहता पाहता मोठा झाला!", मटाराचे दाणे तोंडात टाकत जयू म्हणाली.
"जयू अगदी तसंच, आपल्याला अवगत असलेली विद्या दुसऱ्याला शिकवतांना आपणही शिकतो. आणि विद्या सुद्धा दिल्याने वाढते, फोफावते."
"So true! Open Source Software सारखं!" बाबा म्हणाला.
"दान दिल्याने वस्तूचे चीज होते, देणाऱ्याला आनंद मिळतो, घेणाऱ्याची नड भागते, आणि समाजाला संतुलन व स्वास्थ्य लाभते. म्हणून जन्मभर देत राहावे. ज्ञानेश्वर म्हणतात - ”
दान करावे तर वृक्षासारखे. त्याच्याकडे आलेला कोणीही विन्मुख जात नाही. पुष्प, मध, सुवास, सावली, फळं, मूळ,
साल काही ना काही देणार. जन्मभर देत राहणे इतकाच त्यांना माहित. वनस्पतींमध्ये पिके पहा - आयुष्यभर देत
राहतात, देता देता शेवटी स्वतः सुकून जातात पण जाता जाता धान्य देऊन जातात!”
*School Kit Project : https://www.facebook.com/sevasahayog
-दिपाली पाटवदकर