सूर्याचे चालणे
सुमितने प्रश्न केला - "आबा तुम्ही नेहेमी ‘सूर्याचा प्रवास’, ‘सूर्याचा मार्ग’ असे म्हणता. ते नक्की काय आहे?"
आबा म्हणाले, "सगळं खोटं आहे बघ, सुमित! माया आहे माया! त्या विश्वेश्वराची एक लीला आहे झालं! Multiplex च्या पडद्यावर दिसणाऱ्या चित्रपटापेक्षा हा आकाशाच्या पटावर उलगडणारा चित्रपट इतका खरा भासतो, इतका जिवंत असतो की, चित्रपट पाहता पाहता आपण त्यातले एक पात्र होऊन जातो आणि आपल्याला ते कळतही नाही!”
“इतकं भन्नाट illusion आहे तरी काय?” सुमितने विचारले.
"या illusion वर पृथ्वीवरचे समस्त जीव जगतात! वैज्ञानिकांच्या हजारो पिढ्यांना पुरून उरलेले illusion आहे. त्यावर आपली कालमापनाची गणिते, समीकरणे, वैज्ञानिक आराखडे तंतोतंत चालतात.”
आबांच्या उत्तराने गोंधळून सुमित म्हणाला, "आबा! Illusion वर आधारित गणित आणि विज्ञान? कसं शक्य आहे हे?"
“म्हणजे बघ, खरं असं आहे की पृथ्वी सूर्या भोवती फिरते. पण इथे पृथ्वीवर बसून सूर्य आपल्या भोवती फिरतो असे दिसते. सूर्याचा रोजचा उदय-अस्त हा एक प्रवास, आणि वर्षातून एकदा पृथ्वी भोवती आकाशातून एक फेरी हा त्याचा दुसरा प्रवास.
“हे खोटं आहे, असं माहित असलं तरी, आपल्याला कालमापनासाठी 'सूर्य चालतो' असंच गृहीत धरावे लागते. किंवा solar concentrators adjust करण्यासाठी 'सूर्याच्या चालीचा' अभ्यास करावाच लागतो. किंवा ऋतुचक्राचे विज्ञान समजण्यासाठी 'सूर्य चालतो' असं धरूनच अभ्यास करावा लागतो.” आबा म्हणाले.
“खरं आहे आबा! हा भास इतका घट्ट आहे, आपल्या रोजच्या बोलण्यात पण दिसतो, जसे - 'सूर्योदय झाला', 'सूर्यास्त झाला', 'Sunrise Point', 'सूर्याचा मकर राशीत प्रवेश', असं आपण सहज बोलतो.” सुमितने पुस्ती जोडली.
"एकूण, आपण काय पाहणार आहोत तर - सूर्याच्या भासमान प्रवासाचा मार्ग! हा प्रवास भासमान आहे हे establish करून, आता या प्रवासाचा आनंद घेऊ!
“एका वर्षात सूर्य १२ राशींमधून प्रवास करून, पुन्हा होता तिथे येतो. ही सूर्याची एक फेरी, आकाशात अशी दिसते -
“आता हा सूर्याचा वर्तुळाकार मार्ग, ecliptic ला छेदतो. त्यामुळे या वर्तुळाकार मार्गाचे २ भाग पडतात. अर्धा भाग ecliptic च्या वर आणि अर्धा भाग ecliptic च्या खाली. त्यानुसार वर्षाचे किंवा या प्रवासाचे दोन भाग पडतात - ६ महिने उत्तरायणाचे व ६ महिने दक्षिणायनाचे. म्हणजे तोच प्रवास बाजूने पहिला तर असा दिसतो –
आणि हाच दक्षिणोत्तर प्रवास जर रोज घरातून पहिला, म्हणजे रोजचे सूर्योदयाचे स्थान जर टिपले तर ते घडाळ्याच्या लंबका प्रमाणे - ६ महिने उत्तरेकडे व ६ महिने दक्षिणेकडे जातांना दिसेल.
“आता ह्या उत्तरायण, दक्षिणायनाच्या प्रवासात सूर्य जास्तीत जास्त उत्तरेला जातो ती पृथ्वीवरची रेखा म्हणजे कर्क वृत्त. आणि जास्तीत जास्त दक्षिणेला जातो ती पृथ्वीवरची रेखा म्हणजे मकर वृत्त.”
"म्हणजे या भासमान मार्गाचे वेगवेगळे पैलू आहेत. एक आकाशातला १२ राशींमधून जाणारा वर्तुळाकार मार्ग. तो actually आकाशातील एक sine-wave आहे. आणि वेगळ्या पद्धतीने पहिला असता, तोच प्रवास pendulum ची simple harmonic motion आहे. आणि त्या मार्गाच्या amplitude ची पृथ्वीवरची सावली म्हणजे कर्क वृत्त आणि मकर वृत्त!", सुमितने सार सांगितले.
"अरे वाह! भले सुमित!”, सुमितची पाठ थोपटून आबा म्हणाले, “सूर्याच्या प्रवासाचे दृष्य परिणाम म्हणजे - दिवसाची व रात्रीची लांबी, जगभरातले ऋतूचक्र आणि सूर्योदयाची बदलती जागा. पुढच्या भेटीत तुला सूर्याच्या प्रवासाचा वेग आणि त्याचे पृथ्वीवर दिसणारे परिणाम याबद्दल सांगेन." आबा म्हणाले.