उत्तम आरोग्यासाठी पपई

Total Views |
 


 
प्रत्येक माणसाला माहीत असलेल्या आणि खिशाला परवडणार्‍या फळांपैकी एक फळ म्हणजे पपई. पपईचा वापर विविधप्रकारे केला जातो. कच्च्या पपईचे लोणचे, पिकलेल्या पपईची चटणी आणि कोशिंबीर. पिकलेल्या पपईचा नुसता गरही खायला उत्तमलागतो. मूळव्याधीवर पपईच्या पानांची भाजी खाल्ली जाते. बियांचा वापरही काळीमिरीप्रमाणे काही अन्नपदार्थांमधून केला जातो. पपई ही त्वचेसाठी, केसांसाठी आणि पोटांच्या विविध तक्रारींसाठी अत्यंत गुणकारी आहे, हे कुठे ना कुठे तरी सर्वांनी ऐकलेले असते, माहीत असते. तेव्हा आज पपईबद्दल अधिक माहिती करून घेऊया.
 
 
पपईचे फळ मूळचे भारतीय नाही. दक्षिण मॅक्सिको, मध्य अमेरिका आणि ब्राझीलमध्ये प्रामुख्याने आढळणारे हे फळ आता जगभरात उपलब्ध आहे. यालाच ’paw paw’ किंवा ’melon tree' असेही म्हणतात. पोर्तुगिजांबरोबर पपई भारतात आली. पोर्तुगीज भाषेत याला ’pepita' म्हणतात. त्यावरून ‘पपीता’ व ‘पपई’ ही नावे पडली. संस्कृतमध्ये याला ‘एरण्डकर्कटी’ असे म्हणतात. पपईचे पान एरंडाच्या पानासदृश आहे. एरंडाच्या पानाला पाच टोके असतात, तर पपईला सात टोके असतात. मॅक्सिकोमधील एक जमात ‘मयन’ आहे. ही जमात पपईच्या झाडाचे पूजन करते. त्याला देव मानते. (याला ‘Tree of life' असे मानते.) कोलंबस जेव्हा विश्र्वभ्रमंती करता-करता मध्य अमेरिकेला पोहोचला, तेथे त्याने पपईचा आस्वाद घेतला. याला त्याने ’fruit of angels' असे नाव दिले. अशी ही पपई त्याच्या आवडत्या फळांपैकी एक होती. पपईच्या विविध भागांचे विविध औषधी गुणधर्म आहेत. याचे कच्चे फळ, पिकलेले फळ, मूळ, खोड, बिया, फळाचे साल, पाने आणि चीक सर्वांचे औषधी उपयोग आहेत.
 
पपईचा चीक
 
चिकापासून ‘papain' हा पाचक स्राव (Enzyme  papain papain) मिळतो. एक ग्रॅमचिकाच्या वापराने २५० ग्रॅममांसाचे पचन होेण्यास मदत होते. मिळविण्यासाठी पूर्ण वाढलेल्या कच्च्या पपईवर अलगद शिरा मारल्या जातात. याने त्यातील चीक पाझरतो. हा चीक गोळा करून वाळविल्यानंतर थोडा दाट होतो. हाच चे प्राकृतिक रूप (crude form) आहे. प्रथिने पचविण्यासाठी, दूध पचविण्यासाठी, मांसाला थोडा मऊ (tenderisedpapain papain  (Roundworm infection)    psoriasis  ) करण्यासाठी वापरले जाते. याचे अजूनही विविध उपयोग आहेत. सर्व प्रकारच्या पचनाच्या तक्रारींवर उपयोगी आहे. (१/२ ग्रॅमदुधाने १/२ लिटर दूध पचते) जंतांवर खूप चांगला फायदा होतो. विशेषतः यासाठी १ ग्रॅमदूध/चीक + १० ग्रॅममध + २० मिली. गरमपाणी प्यावे आणि २ तासांंनी एरंडेल द्यावे. याने विरेचन, (जुलाब) होतात आणि जंत पडतात. चिकाचा फायदा अपचनावरही होतो. तसेच वर उत्तमगुण येतो. चीक जर गर्भाशयाच्या तोंडाशी लावला, तर गर्भाशयाचे आकुंचन सुरू होते. भाजलेल्या भागावर लावल्यास जखमभरण्यास मदत होते. अनियमित मासिक स्राव किंवा संकष्ट मासिक स्राव यात चीक व फळाचा वापर केला जातो. विविध रक्तविकारांमध्येही चीक व फळ उपयोगी आहे. जिभेच्या जखमेवर घशाच्या त्रासांवर चिकाचा लेप करावा. पामा, नायटा इ. त्वचाविकारांवर लेप उपयोगी आहे. विंचू दंशावर चीक लावल्यास अधिक फायदा होतो, पण, चीक खूप तीक्ष्ण आहे. सगळ्यांना तो मानवत नाही. त्याच्याने तीव्र ऍलर्जी निर्माण होते म्हणून नाजूक (sensitive) व्यक्तींनी याचा वापर टाळावा. चिकाने खूप दाह होतो, चुरचुरते तसेच त्वचेवर लालसर चट्टा उमटतो. त्यावर सावधगिरीने याचा वापर करावा. कमी प्रमाणातच चीक वापरावा.
 
पपईचे फळ
 
carotene फळाचा (कच्चा व पिकलेल्या) वापर विविधप्रकारे उपयोगी आहे. फळाचा तपकिरी भगवा रंग त्यातील नामक घटकांमुळे येतो. पपईमध्ये ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्व प्रचुर मात्रेत आहे. ‘अ’ आणि ‘ड’ जीवनसत्वसुद्धा पपईमध्ये आढळते. कच्चे फळ कफ आणि वात कमी करते, तर पिकलेले फळ पित्त कमी करते. पचायला हलके, थोडे रूक्ष व तीक्ष्ण (तीव्र गुणाचे) आहे. पोटात पचल्यानंतर उष्ण आहे आणि पचल्यावर शरीरावर तिखट रसाची निर्मिती करते. पपईचे फळ मलावरोधात, अपचनात, अति ढेकर येत असतेवेळी मूळव्याध, डोकेदुखी, अरुची जेवणात रूची नसते अशावेळी खावे. फायदा होतो. तापातही चांगले. याने ताकद वाढते आणि टॉनिकचे कामकरते. शरीरातील टॉक्सिन्स कमी करण्याचे कामउत्तमरित्या करते. पिकलेल्या पपईची फोड आणि त्यावर काळीमिरी, जिरे व सैंधव मीठ लावून खाल्याने उत्तमपाचक आणि सारक (digestive & laxative ) चे कामघडून येते.
 
पण कच्ची पपई गर्भपात करणारी आहे. ज्यांना अतिमासिक स्रावाचा व उष्णतेचा त्रास होत असेल, त्यांनी पपई टाळावी; अन्यथा रक्तस्राव वाढतो आणि शरीरातील उष्णता वाढते. पपईच्या अतिसेवनाने (arotenemia) नावाचा आजार होऊ शकतो, ज्यात हाताचे व पायाचे तळवे पिवळे पडतात. पण पपई खाणे थांबविल्यावर काही दिवसांनी तळवे पूर्ववत होतात. (याला काविळ समजू नये) ही घातक स्थिती नाही.(Harmless Condition Zeaxanthin Macular Degeneration आहे) पपईच्या फळांची भाजीही खाल्ली जाते. कच्च्या पपईपेक्षा अर्धवट पिकलेल्या पपईची भाजी अधिक स्वादिष्ट लागते. पपईचा रस अनेक देशांमध्ये प्यायला जातो. चामखीळ, कॉर्न्स व जाड झालेल्या त्वचेसाठी ते उपयोगी आहे. विविध आईस्क्रिम, जेली व कँडीमध्ये चवीसाठी हे फळ वापरले जाते. फळातील नामक ऍण्टीऑक्सिडंटमुळे डोळ्यांसाठी ते खूप फायदेशीर आहे. सारख्या डोळ्यांच्या विकारात ज्यामुळे दृष्टीनाश होऊ शकतोे ते टाळता येते व डोळ्यांना घातक नील प्रकाशापासून वाचविले जातक. ‘अ’ जीवनसत्वामुळे (बिटा-कॅरोटिन) प्रोस्टेट कॅन्सरपासून वाचविता येते. तसेच केसांसाठीही हे उपयोगी आहे. केस वाढीसाठी पपई उपयोगी आहे. केसांतील कोंडा कमी करण्यासाठी पपईचा गर आणि बिया एकत्र वाटाव्यात आणि हे मिश्रण डोक्याच्या त्वचेला (Scalp  ) व संपूर्ण केसांना लावून हलका मसाज करावा. एक तास हे मिश्रण असे केसांवर राहू द्यावे. नंतर केस धुवून टाकावेत व शॅम्पू वा तत्समप्रसाधनांनी केस धुवावेत. आठवड्यातून दोन वेळा असे तीन-चार आठवडे नियमित वापरावे. कोंडा नाहीसा होतो. कोंडा होणे म्हणजे बुरशीयुक्त घटकांची वाढ होणे. बिया बुरशी उत्तमरित्या नाहीशी करते. (Anti Fungal Action  so, 'Prevention is better than cure' ) म्हणून याचा वापर होतो. त्वचेवर कोंडा जमा झाल्याने रंधे्र बंद होऊन रक्तपुरवठा खंडित होतो आणि केस गळू लागतात. पपईच्या गराने ही रंध्रे मोकळी केली जातात व रक्ताभिसरण सुधारल्याने पूर्ववत झाल्याने केसांची वाढ उत्तमहोते. कंडिशनर म्हणून पपईचा गर आणि दही वापरावे. पपईचा गर आणि दही एकजीव करावे आणि ही पेस्ट केसांच्या मुळापासून केसांच्या टोकापर्यंत लावावी. तासभर तसेच राहू द्यावे आणि मग कोमट  पाण्याने धुवून काढावे. दह्याने त्वचेवरील आणि केसांतील नैसर्गिक तेलाच्या निर्मितीस चालना मिळते. यामुळे केस सजीव आणि तुकतुकीत दिसतात. उत्तमपरिणामांसाठी आठवड्यापासून दोन वेळा वापरावे व नंतर आठवड्यातून फक्त एकदा. पपईमध्ये जलीय तत्त्वे आणि तंतूमय घटकांचे प्रमाण अधिक असल्याने पपईच्या सेवनाने मलबद्धता दूर होते. तसेच पचनसंस्था सशक्त ठेवली जाते, पण रोज खाऊ नये. आठवड्यातून एकदा किंवा १० दिवसांनी एकदा इतकीच खावी. अनियमित मासिक स्राव असतेवेळी तीन दिवस सलग कच्ची/पिकलेली पपई खाल्ल्याने मासिक स्राव सुरू होतो. इतकी ती तीक्ष्ण गुणाची आहे, हे विसरून चालणार नाही. पुरुषांमध्ये इतर उष्णतेचे त्रास उद्भवू शकतात. हे नेहमी लक्षात ठेवावे.
वैद्य किर्ती देव

वैद्य कीर्ती देव

वैद्य सौ.कीर्ती देव, एम्.डी. (आयुर्वेद, मुंबई), आयुर्वेदिक कॅास्मेटॅालॅाजिस्ट. आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सेचा २५ वर्षांचा अनुभव. आयुर्वेदातील त्वचा व केशविकारांवरत उपचार तसेच सौंदर्य शास्त्र यांचा सखोल अभ्यास करून “आयुर्वेदिक कॅास्मेटॅालॅाजी” ही संकल्पना विकसित केली. गेली पंधरा वर्ष त्वचा व केश विकारांवर संपूर्णपणे आयुर्वेदिक पध्दतीने उपचार करीत आहेत.
आयुर्वेद व सौंदर्य शास्त्राच्या प्रसारार्थ राष्ट्रीय स्तरावर अनेक शोधनिबंध व लेख प्रसिध्द. 
अग्रलेख
जरुर वाचा
जनसुरक्षा कायद्याविरोधी अपप्रचाराचे षड्यंत्र उधळून लावण्याची गरज : सागर शिंदे

जनसुरक्षा कायद्याविरोधी अपप्रचाराचे षड्यंत्र उधळून लावण्याची गरज : सागर शिंदे

राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेसाठी धोकादायक ठरलेल्या शहरी माओवाद आणि नक्षली चळवळीविरोधात ‘महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा’ प्रस्तावित आहे. यासंदर्भात आवश्यक त्या सूचना आणि प्रस्तावदेखील राज्य सरकारच्यावतीने सार्वजनिक स्वरूपात मागवण्यात आले असून, त्या सूचनांचाही कायद्याचा मसुदा अंतिम करण्यापूर्वी विचार केला जाईल. परंतु, या कायद्याविषयी सध्या मोठ्या प्रमाणात संभ्रमनिर्मिती नक्षली संघटनांकडून सुरु आहे. त्यानिमित्ताने या कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी आणि कायद्याविरोधातील अपप्रचाराचे षड्यंत्र, याविषयी ‘विवेक विचार ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121