ओवी लाईव्ह....The Goal

    07-Aug-2016   
Total Views |

मीनू धापा टाकत माझ्या desk वर आली, "चल ना, अरुनिमाचा talk सुरु होत आहे. येणार नाहीस?"

"कोण अरुनिमा?"

"अग, आपली आजच्या 'Know Your Heros' ची guest speaker, अरुनिमा सिन्हा! कृत्रिम पायाने Everest सर करणारी पहिली भारतीय महिला."   

आम्ही पटापट hall मध्ये मागे जाऊन बसलो. अरुनिमा तिची हकीकत सांगत होती.

 

"…चालत्या रेल्वे मधून मला काही गुंडांनी फेकून दिले. रेल्वे ट्रैकवर पडल्यामुळे एक पाय तुटला, कमरेला आणि दुसऱ्या पायाला गंभीर इजा झाली. चार महिन्यांनी, एका पायात रॉड, आणि एक कृत्रीम पाय असे accessories बरोबर घेऊन मी रुग्णालयातून बाहेर पडले. शरीराने विकलांग झाले असले तरी मनाने मात्र कणखर होते. त्या काळातल्या भयंकर मानसिक व शारीरिक यातना मी एकाच ध्येयावर सोसू शकले. आणि ते ध्येय होते - Everest शिखर सर करायचे.

रुग्णालय सोडल्यावर, घरी जायच्या आधी बचेंद्री पाल यांच्या मौण्टेनीयरिंग प्रशिक्षण केंद्रात गेले. पुढचे १.५ वर्ष अथक मेहेनत करून Everest सर केला!

आता माझे पुढचे ध्येय आहे - प्रत्येक continent मधील सर्वात उंच शिखर सर करणे! … "

अरुनिमाच्या धैर्याला, तपश्चर्येला सलाम करत आम्ही hall मधून बाहेर पडलो.

अशा भयंकर संकटात कुणी निराशेच्या गर्तेत गेले असते. त्या संकटातून, केवळ एका ध्येयाच्या जोरावर अरुनिमा त्यातून बाहेर आली. इतकेच नव्हे तर she became an inspiration for all!

 


बेंजामिन मेस म्हणतो - The tragedy in life doesn’t lie in not reaching your goal. The tragedy lies in having no goal to reach. 

 

ज्ञानेश्वर म्हणतात - प्रत्येक कर्म करतांना ते का करतोय हे आठवावे. आपले ध्येय आपल्याला ते कर्म करण्याची शक्ती देते. कष्ट सोसायची शक्ती देते. विरोधाला तोंड देण्याची शक्ती देते.  आपले ध्येय जितके उच्च असेल, तितकी अधिक शक्ती ते आपल्याला देते. ह्या करिता उत्तम, उदात्त ध्येय उराशी बाळगणे आवश्यक आहे.

 -दिपाली पाटवदकर


दीपाली पाटवदकर

संतसाहित्य, खगोलशास्त्र, भूमिती, इतिहास व चित्रकला या सर्वाचा मिलाफ त्यांच्या लिखाणात आहे. ‘चित्र ज्ञानेश्वरी’ हे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवरचे चित्रमय पुस्तक, 'नक्षत्रांची फुले' हे आकाशाच्या गोष्टींचे पुस्तक प्रकाशित. त्यांनी काढलेल्या ज्ञानेश्वरी व आकाशाच्या चित्रांची प्रदर्शने झाली आहेत. त्यांची चित्रे व पुस्तके www.facebook.com/kalaapushpa पाहायला मिळतील.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121