सोशल मीडीयाचा वापर आपल्या दैनंदिन आयुष्याचा एक भाग झाला आहे. विचार करा बरं मोबाईल शिवाय एक अख्खा दिवस काढणे शक्य आहे का? किंवा फेसबुक गेल्या दोन महिन्यात एकदा ही बघितले नाही.. व्हॉट्सअॅप वर डीपी बदलला नाही. असा विचार केला तरी हसायला येतं. आपण या व्हॉट्सअॅपच्या किती आहारी गेलो आहोत हे आपल्यालाच कळलेलं नाहीये. कदाचित कळलं असेल पण वळलं मात्र नक्कीच नाही. त्याच बद्दल थोडसं.....
निशा टायपिंग....
अपूर्वा अगं कुठे आहेस मी कधी पासून तुझ्या घरा समोर उभी आहे.
अपूर्वा टायपिंग...
अगं मग बेल वाजव बाहेर उभी राहून व्हॉट्सएप काय करतेस.
(दार उघडल्यावर)
अपूर्वा : अगं काय हे मॅड आहेस का तू? बेल का नाही वाजवलीस.?
निशा : अगं आय थॉट उगाच काकूंना डिस्टर्ब होईल सो मॅसेज केला. बाय द वे माझा ही टाईम पास झाला तू दार उघडे पर्यंत. सी आय चेंज्ड माय डी.पी.
अपूर्वा : अगं ही तर शीतल आहे. तू म्हणलेलीस यू डोन्ट लाईक हर एट्यीट्यूड मग आज अचानक तिच्या सोबत डी.पी. वगेरे, भानगड काय आहे मॅडम.
निशा : अगं तिचा आज वाढदिवस आहे. आणि इट्स न्यू व्हॉस्टएप ट्रेंड की वाढदिवसाला त्या व्यक्ति सोबतचा फोटो डी.पी. म्हणून ठेवायचा आणि खूप इम्प्रेसिव्ह असा स्टेटस टाकायचा.
अपूर्वा : अगं पण इफ यू डोन्ट लाईक दॅट पर्सन तर नुसतं जगाला दाखवण्यासाठी असं का करायचं?
निशा : अगं चिल यात इतकं सीरीयस असं काहीच नाहिये. व्हॉट्सएप, फेसबुक वर असताना असं करावं लागतं तेंव्हाच किंमत असते. साध्या विशेस दिल्याने त्या लक्षात राहत नाहीत.
अपूर्वा : एण्ड आय वॉझ थिंकिंग की सगळ्यांचं खरच माझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून माझ्या सोबत डीपी आणि माझ्यासाठी प्रेमळ स्टेटस टाकतात आहेत.
निशा : यू टेक थिंग्स सो सीरीयसली. इतका विचार करायचा नाही. आता माझंच बघ, शीतल मला अजिबात आवडत नाही बट स्टिल मी तिच्या पेक्षा मनाने मोठी आहे, हे तिला जाणवून देण्यासाठी आय डिड दिस. उद्या ती ही विसरेल आणि मी ही.
अपूर्वा : अगं पण जर तू खरच मनाने मोठी आहेस तर मग असं दाखवून देण्याची काय गरज. मनाचा मोठेपणा किंवा रिलेशन्स असे दाखवून जाहीरात करुन पटवून देण्यावर नसतात. तुला खरच कुणाबद्दल काही वाटत असेल तर ते वागण्यातूनच लक्षात येतं. प्रत्यक्षात तू तिच्या कडे बघणारही नाहीस, बोलणारही नाहीस आणि तिच्या वाढदिवसाला कॉलेजच्या कुठल्यातरी फंक्शन मध्ये सगळ्यांचा काढलेला फोटो क्रॉप करुन लावशील यात काय पॉईंट आहे.
निशा : जाऊ देत अप्पू तुला नाही कळणार ते. अगं ऑनलाईन आपली पर्सनॅलिटी वेगळी असते. यू कान्ट रिस्ट्रिक्ट युवरसेल्फ. तिथे सगळ्यांशी चांगलेच टर्म्स ठेवावे लागतात. प्रत्यक्षात काय आहे हे कुणाला कळतय. आता बघ ना मी झुंबाचा क्लास घेते तिथे आय एम द बॉस मग मला त्या ग्रुप वर तसच वागावं लागतं. आपल्या फ्रेंड्स फॉरएव्हर ग्रुपवर मी एकदम वेगळी असते, आणि कॉलेजच्या ग्रुपवर वेगळी. आय कान्ट बी “मी” जेंव्हा मी ऑनलाईन असते. मला शीतल आवडत नाही हे मला आणि तुला माहितीये ते जगाला का सांगायचं.
अपूर्वा : अगं हो पण ती तुझी जिवलग मैत्रिण आहे असं तरी का भासवायचं?
निशा : आर यू गेटिंग जेलस?
अपूर्वा : अजिबात नाही माझा पॉईंट व्हॅलिड आहे.
निशा : जाऊ देत म्हटलं ना अप्पू तुला नाही समजायचं ते, तू व्हॉट्सएपवर नवीन आहेस. हळू हळू रुळशील तेंव्हा कळेल तुला. चल आय हॅव टू गो. क्लास आहे माझा भेटू उद्या, एण्ड चिल सगळं काही मनाला लावून घेत जावू नकोस.
बेस्ट डीपी बडीज खऱ्या जीवनात मैत्रिणी असतील का? केवळ फेसबुक केवळ फेसबुक, व्हॉट्स्अॅप वर दाखवूनच मैत्री खरी आहे का नाही हे सिद्ध होतं? मग मनापासून जपलेल्या मैत्रीचं काय? नाती बदलली, व्यक्तिरेखा बदलल्या का सगळच बदलल, कि काहीच नाही?
रानडे इन्टिट्यूट पुणे विद्यापीठातून पत्रकारितेत पद् व्युत्तर शिक्षण. सध्या वेब मुंबई तरूण भारत येथे उपसंपादक. मूळ गाव जबलपूर. कथक नृत्यात अलंकार. कला, संस्कृती, युवांशी संबंधित विषयांवर लिहिण्याची आवड.