नवा आदित्य
"या सुमितराव!" सुमितचे स्वागत करत आबा म्हणाले, "तू म्हणाला होतास ना, आदित्यची modern गोष्ट सांगा. तर आज तुला नवीन आदित्यची गोष्ट सांगतो."
"पण आबा, तुम्ही तर आज भारतीय देवता आणि यूरोप मधील देवतां मधील साम्य सांगणार होता.", सुमितने आठवण केली.
"माझ्या लक्षात आहे बाबा! ते पण सांगतो. हे बघ, मी तुला दाखवायला कितीतरी ग्रीक देवतांचे फोटो काढून ठेवले आहेत." आबा म्हणाले.
“Two in one गोष्ट आहे तर आज!", हातातली sack ठेवत सुमित म्हणाला.
"हा! हा! खरंय. सुमित, कसं होतं की, भारतीयां प्रमाणे ग्रीकांमध्ये अनेक देवदेवता होत्या. यातील काही देवता पाहतांना आपण भारतीय देवता पाहात आहोत की काय अशी शंका येते!
“१२ आदित्यांमध्ये जसा देवांचा राजा इंद्र आहे, तसं १२ ऑलिंपियन मध्ये देवांचा राजा झीयस होता. झीयस उर्फ ज्युपिटर हा पावसाचा, वादळाचा देव होता, आणि त्याचे शस्त्र होते वीज!”
"इंद्राच्या वज्रासारखे!" सुमित म्हणाला.
“Correct! आणखीन एक ऑलिंपियन देवता आहे पोसायडन, उर्फ नेपच्युन. हातात त्रिशूळ घेतलेल्या या देवतेचा पुतळा पाहून शंकराची आठवण झाल्या शिवाय राहत नाही. संपूर्ण युरोप मध्ये अनेक चौकात पोसायडनचा पुतळा दिसतो.
"आता हा फोटो तर पहा - रोमन देवता 'फॉर्च्यूना'. संपत्ती, समृद्धी व भाग्यदायी देवता." आबांनी फॉर्च्यूनाचा फोटो सुमित कडे दिला.
"ही तर साक्षात लक्ष्मी दिसते!" सुमित उद्गारला.
"आणि हा फोटो पहा! वाटिकन्च्या संग्रहालयातील ही मूर्ती,ख्रिस्तपूर्व१ल्याशतकातीलआहे.”, आबाम्हणाले.
सुमितच्या चेहऱ्यावरचे आश्चर्य पाहून आबा म्हणाले -
"हा पुतळाआहे साटायरॉसनावाच्या ग्रीकउप-देवतेचा. ‘मुरलीधर’आणि ‘गोपाळ’,अनेक ग्रीक मूर्ती व मोसॅकमध्ये दिसतात. पण या देवतेचे कृष्णाशी असलेले साम्य केवळ pose मधेच संपते.
“असो. आपण आपल्या १२ आदित्यांकडे वळू. ग्रीकांच्या १२ ऑलिंपियन देवतांमधील सूर्य देवता आहे- अपोलो किंवा हेलिओस. जगाला प्रकाश देणाऱ्या हेलिओसच्या हातात मशाल दाखवत असत. ज्ञानाच्या प्रकाशाने अज्ञानाचा अंधार दूर करणारी ही देवता आहे. ७ किरणांचे मुकुट धारण करणारा हेलिओस, ४ घोड्यांच्या रथातून आकाशात पूर्व - पश्चिम प्रवास करतो अशी त्यांची धारणा होती." आबाम्हणाले.
"ख्रिस्तपूर्व ३०० वर्ष, ग्रीक सिकंदरचा, म्हणजे Alexander The Great चा सेनापती टॉलेमी; इजिप्ट वर राज्य करत होता. टॉलेमीने अँटिगोनस वर विजय मिळवल्यावर, ऱ्होड येथे हेलिओसचा एक प्रचंड मोठा पुतळा उभा केला. हेलिओसचा पुतळा 'ऱ्होडचा कलोसस्' म्हणजे 'ऱ्होडचा मोठा पुतळा' या नावाने प्रसिद्ध होता. १०० फूट उंच असलेला पुतळा, लवकरच एका भूकंपात पडला. त्या पुतळ्याचे अवशेष जवळ जवळ ८०० वर्ष तिथेच पडले होते, दूरदूर वरून अनेक लोकं ते अवशेष पाहायला येत असत. एका चित्रकाराने त्या पुतळ्याच्या वर्णनावरून काढलेले हे चित्र पहा.
“अमेरिकेला स्वातंत्र्य मिळाल्यावर फ्रान्सच्या लोकांनी अमेरिकेला एक नजराणा पाठवला - स्वातंत्र्य देवतेचा पुतळा! स्वातंत्र्य देवतेच्या हातात मशाल आहे, डोक्यावर ७ किरणांचा मुकुट आहे. स्वातंत्र्य देवतेचे वर्णन करणारी कविता, पुतळ्याच्या पायथ्याशी कोरली आहे. या कवितेचे नाव आहे - ‘The New Colossus’ अर्थात 'नवा आदित्य'!”
शुभम भवतु म्हणणारा आवाज कायमचा थांबला: जेष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे निधन!..