उत्तम आरोग्यासाठी पपई (भाग-२)

Total Views |



(उत्तरार्ध)

पपईतील ‘सी’ जीवनसत्व त्वचेसाठीही खूप उपयोगी आहे. ची (त्वचेतील आणि केसांतील स्निग्धता) वृद्धी करणे आणि टिकविणे हे दोन्ही पपईमुळेे चांगले घडून येते. रुक्ष त्वचेसाठी पपईचा गर खूप उपयोगी आहे. हा गर चेहर्‍यावर लावल्याने त्वचा मऊ-मुलायम होते. यासाठी मोठा चमचा पपईचा गर आणि छोटा चमचा मध एकजीव करावे आणि चेहर्‍यावर याचा लेप लावावा. अर्धा तास तसाच राहू द्यावा आणि नंतर सुकल्यावर थंड पाण्याने (फ्रिजच्या पाण्याने नव्हे) तो धुवून टाकावा. त्यामुळे खरबरीत, रूक्ष, त्वचा निघून जाते आणि त्वचेला जलांश मिळाल्याने ती मऊ होते. त्वचेवरील विविध इन्फेक्शन्समध्ये तसेच मुरूमांवरही पपईचा गर उत्तमगुण देतो. रंध्रे मोकळी होऊन रक्ताभिसरणही
सुधारते. यामुळे त्वचा टवटवीत व तजेलदार दिसते. पपईचा रस कापसाच्या बोळ्याने चेहर्‍यावर लावावा. पंधरा मिनिटे तो चेहर्‍यावर राहू द्यावा. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा. असे नियमित केल्याने त्वचेवरील काळे डाग कमी होतात. मुरुमांमुळेही पडलेल्या डागांवरही पपईचा रस उत्तमआहे. जसा रस आणि गर उपयोगी आहे तसेच फळाचे सालही (आतील बाजू) त्वचेसाठी उपयोगी आहे. त्वचेवरील सुरकुत्यांवर पपईची साल वापरावी. पपईची साल चेहर्‍यावर अलगद घासावी. असे केल्याने त्वचेवरील मृतपेशी निघून जातात. सुरकुत्या कमी होतात आणि वयपरत्वे येणारे डागही
नाहीसे होतात. आंबवलेल्या पपईच्या गराचाही वापर त्वचेसाठी उत्तमआहे. त्यानेही मृत त्वचा विरघळते आणि त्वचा टवटवीत व तुकतुकीत होते. अकाली वार्धक्य टळते.

पपईमध्ये जे (Choline ) असते, त्याने मांसल भागाला मदत होते. पेशींची रचना टिकवणे, त्यातून संवेदना पोहोचविणे आणि जुनाट सूज कमी करणे, या सगळ्या क्रियांमध्ये पपईचा उत्तमवापर होतो. ज्यांना झोपेची तक्रार आहे, अंगदुखी, अंग जखडणे इ. होते, ज्यांच्यामध्ये स्मृती आणि समज यांची कमतरता भासते, यामध्ये पपई खायला द्यावी. तसेच चरबीचे शोषणही चांगल्याप्रकारे घडवून आणते. म्हणून वजन कमी करण्याच्या आहारामध्ये पपईचा समावेश करावा
पण, आधी सांगितल्याप्रमाणे रोज पपई खाऊ नये.
पपईमध्ये अ जीवनसत्व प्रचुर मात्रेत असल्यामुळे प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठीही पपई उत्तमआहे. आतड्यांमधील जंतूसंसर्गावर (colon infections ) पपई उत्तमगुणकारी आहे. तेथील शेंग (Mucus) आणि पू (Pus) कमी करून जखम/व्रण भरून येण्यास मदत होते. पण यासाठी नियमित पपईचा वापर हवा. कच्च्या पपईने मृदुसारक गुण येतो. तसेच मूत्राचे प्रमाण वाढते. कच्ची पपई स्तन्यनिर्मितीस उपयोगी आहे. तसेच गर्भपात घडवून आणण्यास उद्युक्त करते. प्रसवकळा सुरू करण्यासही कच्ची पपई उपयोगी आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत गर्भनिरोधासाठी पपईचा वापर केला जात असे, म्हणून गर्भवतीने कटाक्षाने पपई खाणे टाळावे. पिकलेल्या पपईचा वापर आमगतातही सांगितला आहे. तसेच मूत्रातील आम्लीयता कमी करून क्षारीय करण्यास ही पपई फायदेशीर आहे. पपईतील ‘सी’ जीवनसत्वामुळे पपई विविध दातांच्या विकारांंवर उपयोगी आहे.

हिरड्या सुजणे, पू येणे, रक्त येणे तसेच दात नाजूक होणे यासाठी फायदा होतो. अस्थींच्या व्याधींवर आणि उच्च रक्तदाबासाठी पपई चांगली. मूत्राशयाच्या आणि गुदद्वाराशी संबंधित रोगांपासून संरक्षण मिळते. पपईची पानं पपईची पानेही आहारासाठी आणि औषधी गुणधर्मासाठी उपयोगी आहेत. कोवळी पाने ही भाजीसाठी वापरतात. ’एरण्ड कर्कटी’ जे नाव संस्कृत भाषेत आहे ते देखील पानाच्या आकारावरूनच पडले आहे. (एरंडाच्या पानासदृश पपईचे पान असते) पपईच्या पानांची भाजी खाल्ल्याने मूळव्याधीचा आणि जंताचा त्रास कमी होतो. पपईच्या पानांनी सांधे शेकावेत (पाने गरमकरून दुखर्‍या भागी शेकावी किंवा वाफवून सांध्यांवर बांधावीत) यामुळे संधिवात आणि अन्य वातव्याधींमध्ये
आरामपडतो. दुखणे कमी होते. पानांचा अजून  Carpaine  Carpaine (Resting Phase) एक बाह्यप्रयोग प्रभावी आहे. पाने वाटून त्याचा लगदा हत्तीपायावर बांधावा. सूज आणि दुखणे कमी होते. पपईच्या पानांची वाफ घेतल्याने दमासदृश लक्षणे कमी होतात. श्वास घेण्यास होणारा त्रास कमी होतो. पपईच्या पानांचा जसा बाह्य वापर आहे, तसेच ते खाल्ल्यानेही खूप फायदा होतो. पानांचा काढा प्यायल्याने लघवी साफ होते. अंगावर, पायावर सूज असताना पानांचा काढा किंवा उकाळा द्यावा (गरमपाण्यात, उकळत्या पाण्यात पपईची पाने घालून, झाकून ठेवावे. स्टोव्ह/गॅस बंद करावा. ते पाणी कोमट झाले की ते प्यावे. याला ‘उकाळा’ म्हणतात.) आयुर्वेदात यालाच ‘फाष्ट’ म्हणतात. पानांचा फाण्ट रक्तशोधक आहे आणि सूज घालविण्यात उपयोगी आहे. पपईच्या पानांत हा घटक असतो. ज्याचे कार्य हृदयावर होते. हृदयाचे बळ वाढविण्याचे काममुळे पपईचे पान करते. वाढलेले हृदयाचे ठोके कमी करून, हृदयाची विश्रांती स्थितीत सुधारते आणि हृदयाला ताकद मिळते. यामुळे विविध आजार, जे हृदय कमकुवत झाल्याने उद्भवतात त्यात हा फाष्ट द्यावा. हल्ली जगप्रसिद्ध झालेला पपईच्या पानांचा वापर म्हणजे प्लेटलेट काऊंट वाढविणे होय. यामुळे डेंग्यू आणि अन्य आजारांमध्ये जिथे रक्तातील प्लेटलेट काऊंट कमी झालाय, अशा ठिकाणी पपईच्या पानांचा रस प्यायला द्यावा. यासाठी तीन ते पाच पूर्ण विकसित (वाढ झालेली) पाने घ्यावीत. कीड न लागलेली अशी पाने असावीत. स्वच्छ धुवून पुसून ती पाने वाटून त्याचा रस काढावा. आजारानुसार आणि वयानुसार या रसाचे प्रमाण ठरवावे लागते. (दोन-तीन चमचे ते पाव कप इतका हा रस रोज प्यायल्याने १० दिवसांत उत्तमगुण येतो.) पपईच्या बिया पानांसारखेच पपईच्या बियांचेही काही फायदे आहेत. बिया- बियांपासून तयार केलेले तेल अंगाला लावल्याने विविध चर्मरोगांवर (Skin Disease) चांगला आरामपडतो. तसेच पक्षाघातातही (Paralytic Stroke) हे तेल त्या-त्या भागांवर चोळावे. बियांचा अजून एक उत्तमगुण म्हणजे ते कृमिनाशक आहेत. पोटातील जंत घालविण्यासाठी बिया उपयोगी आहेत. पण बिया भेसळीसाठीही वापरतात! काळीमिरी सदृश दिसत असल्याने त्यांचा भेसळीसाठी वापर केला जातो. हल्ली हायब्रिड जातीचे पपई बाजारात जास्त उपलब्ध असतात पपई जेवढी नैसर्गिक, गावठी तेवढे त्यात औषधी गुण जास्त मात्रेत सापडतात. भगवी, केशरी, पूर्ण वाढलेली पपई आरोग्यासाठी कशी उपयोगी आहे हे तर आपण बघितलेच. भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वात पपई खाल्ली जाते, वापरली जाते. वजन कमी करण्यासाठी पपई हमखास खाल्ली जाते. पण मागील लेखात आणि या लेखात पपईची विस्तृत माहिती दिली आहे. ती वाचूनच आपल्या प्रकृतीला झेपेल इतकीच ठराविक अंतराने खावी. बाह्य व आभ्यंतर दोन्हीप्रकारे पपई उपयोगी आहे. तेव्हा, पपईची लागवड वाढवा आणि
आरोग्य मिळवा.


- वैद्य किर्ती देव

वैद्य कीर्ती देव

वैद्य सौ.कीर्ती देव, एम्.डी. (आयुर्वेद, मुंबई), आयुर्वेदिक कॅास्मेटॅालॅाजिस्ट. आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सेचा २५ वर्षांचा अनुभव. आयुर्वेदातील त्वचा व केशविकारांवरत उपचार तसेच सौंदर्य शास्त्र यांचा सखोल अभ्यास करून “आयुर्वेदिक कॅास्मेटॅालॅाजी” ही संकल्पना विकसित केली. गेली पंधरा वर्ष त्वचा व केश विकारांवर संपूर्णपणे आयुर्वेदिक पध्दतीने उपचार करीत आहेत.
आयुर्वेद व सौंदर्य शास्त्राच्या प्रसारार्थ राष्ट्रीय स्तरावर अनेक शोधनिबंध व लेख प्रसिध्द. 
अग्रलेख
जरुर वाचा
बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानातील वाघाटी प्रजनन केंद्र ठरतोय पांढरा हत्ती; तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नेमणूकच नाही

बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानातील वाघाटी प्रजनन केंद्र ठरतोय पांढरा हत्ती; तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नेमणूकच नाही

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 'वाघाटी संवर्धन प्रजनन केंद्र' पांढरा हत्ती ठरला आहे (rusty spotted cat breeding centre). कारण, 'केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणा'ने (सीझेडए) सूचित केलेल्या तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नेमणूकच लाखो रुपये खर्चुन तयार करण्यात आलेल्या या केंद्रात न झाल्यामुळे याठिकाणी वाघाटींचे प्रजनन गेल्या १३ वर्षात झालेले नाही (rusty spotted cat breeding centre). दै. 'मुंबई तरुण भारत'ने मंगळवार दि. १ एप्रिल रोजी केंद्रातील वाघाटीच्या पिल्लांचे मृत्यूचे वृत्त प्रकाशित केले होते (rusty..

छत्रपती शिवाजी महाराज भारताच्या शाश्वत विजयाचे प्रेरणास्त्रोत

छत्रपती शिवाजी महाराज भारताच्या शाश्वत विजयाचे प्रेरणास्त्रोत

"छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या शाश्वत विजयाचे प्रेरणास्त्रोत आहेत. शिव चरित्राचा अभ्यास करून आपण त्यांच्या ऋणानुबंधाशी जोडले जातो. शिवचरित्र कायम संघर्षाची प्रेरणा देते. म्हणूनच त्यांस युगंधर, युगप्रवर्तक आणि युगपुरुष म्हणतात. एक व्यक्ती आणि राजा म्हणून शिवाजी महाराजांचे चारित्र्य अनुकरणीय आहे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. नागपुरातील मुंडले सभागृहात 'युगंधर शिवराय' हे पुस्तक नुकतेच सरसंघचालकांच्या शुभहस्ते प्रकाशित झाले. त्यावेळी ते बोलत होते. Yug..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121