आकाशाशी जडले नाते- आदित्य

    24-Aug-2016   
Total Views |

आदित्य


"ये बाबा, बैस. आधी ओवाळते तुला. शुक्रवारचा काही भेटायचा नाहीस तू, रविवारीच सही!" असे म्हणून दुर्गाबाईंनी सुमितला ओवाळून हातात साखर फुटाणे दिले.
फुटाणे खात खात सुमित म्हणाला, "आजी, असे फुटाणे खाल्ले ना, की लहानपणी तू सांगितलेल्या गोष्टी आठवतात. ती रविवारची कोणती ग गोष्ट सांगायचीस तू?"
"रविवारी आदित्यराणूबाईची कहाणी. राजाची राणी आणि प्रधानाची राणी आदितवारी सूर्यपूजेचा वसा घेतात, ती गोष्ट." आजीने सांगितले.
"आबा, आज तुम्ही आदित्यची एक modern कहाणी सांगा!" आबांच्या समोरच्या खुर्चीत, छातीशी उशी धरून, सुमित गोष्ट ऐकायच्या तयारीत बसला! सुमित मोठा झाला तरी, 'एक गोष्ट सांग ना' चा आग्रह चालूच!
विचार करून आबा म्हणाले, "Modern नाही, पण प्राचीन कहाणी सांगतो. फार फार जुनी गोष्ट आहे. त्याकाळी माणसाला देव म्हणजे - ऊन, वारा, पाऊस आणि अग्नी. वैदिक काळात देवत्व प्राप्त झालेले हे ३३ देव होते. १२ आदित्य, ११ रुद्र, ८ वसू आणि २ प्रजापती.
“तर आज या १२ आदित्यांची कहाणी सांगतो. अदितीला १२ मुले होती. या सर्वांना 'आदित्य' म्हणत. हे १२ आदित्य म्हणजे १२ महिन्यांचे १२ सूर्य. प्रत्येक आदित्याचे कार्य निराळं. कुणावर पर्जन्याची जबाबदारी, कुणावर पिकांची जबाबदारी, तर कुणावर वाऱ्यांची.

ऋतू सौर महिना आदित्य
वसंत ऋतू मधू धाता
  माधव आर्यमा
ग्रीष्म शुक्र मित्र
  शुचि वरुण
वर्षा नभस इंद्र
  नभस्य पर्जन्य
शरद ईष त्वष्टा
  ऊर्ज विष्णू
हेमंत सहस अंशुमन
  सहस्य भग
शिशिर तपस पुष
  तपस्य विवस्वान


“या १२ देवता वेगवेगळ्या रूपात भारत पासून यूरोप पर्यंत दिसतात. जसे –

“ग्रीकांच्या १२ ऑलिंपियन देवता. ग्रीकानंतरच्या रोमन लोकांनी याच १२ देवता पुजल्या.
“यूरोप मधील मिथ्र उपासक, आपली सूर्य देवता नेहेमी १२ राशींबरोबर दाखवत.
“ज्यु लोकांमध्ये, जॅकोबला १२ मुले होती. ज्यांच्या पासून १२ इस्रायली जमाती झाल्या.
“टर्की मध्ये १२ देवतांचे पूजन करत असत.
“ख्रिस्त धर्माच्या उदयापूर्वी, युरोप मधील नॉर्स लोकांचे १२ देवतांचे मंदिर असगार्ड येथे होते.
“आणि अलीकडच्या काळात, येशूचे १२ शिष्य. ज्यांनी पुढे ख्रिश्चन धर्माचा प्रसार केला.
“तर ही १२ आदित्यांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण!" आबा म्हणाले.
“Interesting! आबा, पण हे १२ या संख्येत असं काय विशेष आहे?" सुमितची शंका.
“त्याचं कारण गणितात असू शकते. १२ ला २, ३, ४, ६ या संख्यांनी भाग जातो. 12 is the smallest number to have so many factors. त्यामुळे वर्षाचे १२ समान भाग करणे सोयीचे होते. सूर्याची आकाशात एक पूर्ण फेरी म्हणजे १ वर्ष. म्हणून आकाशाचे १२ भाग करून १२ राशी झाल्या. एका राशीचा एक महिना झाला. आणि मग एका वर्षात, ६-६ महिन्यांचे दोन आयन, २-२ महिन्यांचे ६ ऋतू, ४-४ महिन्यांचे ३ चातुर्मास असे सोयीस्कर विभाग करता येणे शक्य झाले. आणि त्यानुसार प्रत्येक महिन्याची १-१ देवता असे १२ आदित्य झाले.
“ऋग्वेदात आधी ८ आदित्य होते. पुढच्या काळात १२ झाले. Maybe वर्षाच्या विभाजनाचे प्रयोग करत करत १२ वर गाडी स्थिर झाली असावी.”
"आबा या देशोदेशीच्या १२ देवतांमध्ये काही साम्य आहे का?" सुमितचा आणखीन एक प्रश्न.
"सुम्या, इतकं साम्य आहे की काही देवता पाहतांना आपण भारतीय देवता पाहात आहोत की काय अशी शंका येते! पुढच्या वेळी त्याबद्दल सविस्तर बोलू. आता मस्त पुरणपोळीचं जेवण आपली वाट पाहत आहे. लाडका नातू आल्याशिवाय मला असं गोडधोड मिळत नाही!" आबा हसत हसत म्हणाले.
"खरं वाटेल हो कुणाला!" दुर्गाबाई रागाचा आव आणून म्हणाल्या.
आजी-आबांचे लटक्या रागातले बोलणे ऐकून, सुमित स्वतःशीच हसत, पाने घ्यायला उठला.


PC: http://voynichportal.com/tag/mithra हौस्टेड, इंगलंड येथील मिथ्रची मूर्ती


PC: unchartedruins.blogspot.com टर्की येथील १२ देवतांचे शिल्प

 


PC: https://en.wikipedia.org/wiki/Twelve_Olympians १२ ग्रीक देवता

 


PC: www.leonardoda-vinci.org. १२ शिष्यांबरोबर येशूचे शेवटचे जेवण. लिओनार्डो द विंचीचे प्रसिद्ध चित्र.

 


PC: www.templefolks.com

दीपाली पाटवदकर

संतसाहित्य, खगोलशास्त्र, भूमिती, इतिहास व चित्रकला या सर्वाचा मिलाफ त्यांच्या लिखाणात आहे. ‘चित्र ज्ञानेश्वरी’ हे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवरचे चित्रमय पुस्तक, 'नक्षत्रांची फुले' हे आकाशाच्या गोष्टींचे पुस्तक प्रकाशित. त्यांनी काढलेल्या ज्ञानेश्वरी व आकाशाच्या चित्रांची प्रदर्शने झाली आहेत. त्यांची चित्रे व पुस्तके www.facebook.com/kalaapushpa पाहायला मिळतील.

अग्रलेख
जरुर वाचा
बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानातील वाघाटी प्रजनन केंद्र ठरतोय पांढरा हत्ती; तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नेमणूकच नाही

बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानातील वाघाटी प्रजनन केंद्र ठरतोय पांढरा हत्ती; तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नेमणूकच नाही

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 'वाघाटी संवर्धन प्रजनन केंद्र' पांढरा हत्ती ठरला आहे (rusty spotted cat breeding centre). कारण, 'केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणा'ने (सीझेडए) सूचित केलेल्या तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नेमणूकच लाखो रुपये खर्चुन तयार करण्यात आलेल्या या केंद्रात न झाल्यामुळे याठिकाणी वाघाटींचे प्रजनन गेल्या १३ वर्षात झालेले नाही (rusty spotted cat breeding centre). दै. 'मुंबई तरुण भारत'ने मंगळवार दि. १ एप्रिल रोजी केंद्रातील वाघाटीच्या पिल्लांचे मृत्यूचे वृत्त प्रकाशित केले होते (rusty..

छत्रपती शिवाजी महाराज भारताच्या शाश्वत विजयाचे प्रेरणास्त्रोत

छत्रपती शिवाजी महाराज भारताच्या शाश्वत विजयाचे प्रेरणास्त्रोत

"छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या शाश्वत विजयाचे प्रेरणास्त्रोत आहेत. शिव चरित्राचा अभ्यास करून आपण त्यांच्या ऋणानुबंधाशी जोडले जातो. शिवचरित्र कायम संघर्षाची प्रेरणा देते. म्हणूनच त्यांस युगंधर, युगप्रवर्तक आणि युगपुरुष म्हणतात. एक व्यक्ती आणि राजा म्हणून शिवाजी महाराजांचे चारित्र्य अनुकरणीय आहे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. नागपुरातील मुंडले सभागृहात 'युगंधर शिवराय' हे पुस्तक नुकतेच सरसंघचालकांच्या शुभहस्ते प्रकाशित झाले. त्यावेळी ते बोलत होते. Yug..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121