#ओवी लाईव्ह.. Focus

    21-Aug-2016   
Total Views | 1

भारत - पाकिस्तान match चालू होती. सगळे रस्ते सुनसान. नजरा TV ला खिळलेल्या. उत्सुकता शिगेला पोहोचलेली. A nail biting finish … शेवटची ओव्हर ...

आणि देवेन मात्र TV कडे ढुंकूनही न पाहता, आतल्या खोलीत, आपला आपला अभ्यास करत बसला होता. याच match च्या बाबतीत तो उदास होता असे नाही, तर संपूर्ण series च्या बाबतीत हा उदासीन! पूर्वी बघायचा matches. याच वर्षी त्याचं match पाहणे बंद झालं होतं.

हे म्हणजे अजबच होतं! न राहवून त्याला म्हणलं, "काय रे! तुला क्रिकेट मध्ये काही interest राहिलेला दिसत नाही. Final होती आज. ती पण पहिली नाहीस की?"

तेंव्हा देवेन म्हणाला - "अग कसं आहे बघ, त्या सगळ्या खेळाडूंनी इथे पोचायला खूप कष्ट घेतले आहेत. ह्या match पर्यंत पोचण्यासाठी त्यांनी किती गोष्टींचा त्याग केला असेल? जसे फोन, फेसबुक, सिनेमे पाहणे, मित्रांबरोबर तास अन तास गप्पा मारणे, अरबट चरबट खाणे, लोळत पडणे, हे सगळं सोडलं असेल ना. आणि स्वतःला किती कठोर शिस्त लावून घेतली असेल - पहाटे उठून व्यायाम करणे, तास अन तास सराव करणे, काटेकोरपणे sports diet पाळणे, स्वतःला motivate करत राहणे. अशा कठोर प्रयत्नाने ते आपलं carrier घडवत आहेत.

“मी माझं भविष्य घडवायचं सोडून त्यांच्या matches दिवस-दिवस कुठे पाहत बसू! त्यासाठी मला वेळ नाही.

“खरं तर हे मी त्यांच्या कडूनच शिकलो आहे! I am focusing on my development!”

 


 

लहानग्या अर्जुनाला फक्त पक्ष्याचा डोळा दिसत होता, त्याला आजूबाजूचे झाड, पान, फुले, नदी, डोंगर, इतकंच काय पक्ष्याचे डोके सुद्धा दिसत नव्हते. दिसत होता तो फक्त डोळा!

Robin Sharma म्हणतो - Picasso did not play piano. Nor did Fedrer play flute. Masters focus on doing one thing at rare-air.

ज्ञानेश्वर म्हणतात – कुठेही लक्ष ना देता, आपलं काम मन लावून, पूजा केल्या सारखे करावे. एकाग्र चित्ताने केलेल्या कामाने विश्वदेवता प्रसन्न होते!  इतकेच नव्हे तर तेच तुमचा योगक्षेम पण चालवेल.

-दिपाली पाटवदकर

 

दीपाली पाटवदकर

संतसाहित्य, खगोलशास्त्र, भूमिती, इतिहास व चित्रकला या सर्वाचा मिलाफ त्यांच्या लिखाणात आहे. ‘चित्र ज्ञानेश्वरी’ हे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवरचे चित्रमय पुस्तक, 'नक्षत्रांची फुले' हे आकाशाच्या गोष्टींचे पुस्तक प्रकाशित. त्यांनी काढलेल्या ज्ञानेश्वरी व आकाशाच्या चित्रांची प्रदर्शने झाली आहेत. त्यांची चित्रे व पुस्तके www.facebook.com/kalaapushpa पाहायला मिळतील.

अग्रलेख
जरुर वाचा
५० वर्षांपूर्वी इस्लाम धर्म स्वीकारणाऱ्यांची हिंदू धर्मात  घरवापसी

५० वर्षांपूर्वी इस्लाम धर्म स्वीकारणाऱ्यांची हिंदू धर्मात घरवापसी

Hinduism उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यातील स्वामी यशवीर महाराज यांनी एका कुटुंबातील १० मुस्लिम सदस्यांना हिंदू धर्मात घरवापसी केल्याची हिंदूंसाठी आनंदवार्ता आहे. स्वामी यशवीर यांनी शांती करत सर्व १० जणांची इस्लाममधून हिंदू धर्मात घरवापसी केली. ते ५० वर्षांपासून देवबंदमध्ये राहणाऱ्या कश्यप समुदायातील एका महिलेने इस्लाम धर्म स्वीकारला होता. त्यावेळी त्या महिलेचा विवाह हा मुस्लिम व्यक्तीसोबत झाला होता. ती अनेकदा पालकांच्या घरीच वास्तव्य करायची. यामुळे तिच्या सासरच्यांना याबाबत मोठा आक्षेप असायचा. संबंधित..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121