#आकाशाशी जडले नाते- happy birthday मित्रा

    17-Aug-2016   
Total Views | 1

 

Happy Birthday मित्रा!

 

Image Source: Wikipedia. The Sun Temple of Garni, Armenia. 1st Century CE.

Happy Birthday मित्रा!” सुमितने केकचा box टेबलावर ठेवला, आणि दुर्गाबाईंना म्हणाला, “आजी, आई-बाबा मागून येत आहेत. ते आल्यावर केक कापू.”

शंकरराव, you old boy! आज तुम्ही किती वर्षांचे झालात?" आबांच्या पाया पडत सुमितने विचारले.

सुम्या, मी आज ७२व्या वर्षात पदार्पण केलं!”, सुमितच्या पाठीवर थाप मारून आबा म्हणाले.

Astronomically speaking, आज माझ्या सूर्याभोवती ७१ प्रदक्षिणा पूर्ण झाल्या! आहेस कुठे! जन्मल्यापासून माझा साधारणपणे ६६ अब्ज किमी प्रवास झाला! शुद्ध मराठीत सांगायचं तर – This Shankara, the cosmic traveller, has covered 66 billion km so far! काय सुंदर प्रवास आहे सुमित! गडद काळोख्या अवकाशातुन, सुसाट वेगाने, सूर्य, चंद्र, तारकांनी उजळलेला प्रदक्षिणेचा मार्ग डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे!”

Wow! आबा, वाढदिवस म्हणजे - सूर्याभोवती प्रदक्षिणा! कसं काय सुचलं तुम्हाला असं!"

सुचणारच! मी स्वतःला उगीचच सूर्योपासक म्हणत नाही!”

"तुम्ही कशा प्रकारे सूर्याची उपासना करता?" सुमितने पृच्छा केली.

"सुमित, मी कायेने, वाचेने आणि मनाने सूर्याची उपासना करतो. तुला तिन्ही प्रकार सांगतो –

कायेने - मी रोज १२ सूर्यनमस्कार घालतो. हे माझ्या उत्तम आरोग्याचे रहस्य आहे.

वाचेने - रोज गायत्री मंत्र म्हणतो. कधी कधी आदित्य हृदयस्तोत्र म्हणतो.

मनाने - माझं भरण-पोषण करणारा, प्रकाश व ऊब देणारा सूर्य, मला पितासमान आहे; ही कृतज्ञतापूर्ण जाणीव माझे मन भरून टाकते.

हे खूप old fashioned वाटत असेल तर आधुनिक सूर्योपासना सांगतो. Solar Water Heater, Solar Cooker, Solar Power चे संशोधक, उत्पादक, वितरक, ग्राहक सगळे सूर्योपासकच आहेत!”

"मान्य! एकदम मान्य! पण सूर्य भक्तांसारखे सूर्य haters पण आहेत का?" सुमितने गालातल्या गालात हसत विचारले.

"आहेत तर! अरे उन्हात फिरून फुकटचं Vitamin-D मिळवायचे सोडून suncoat घालून, तोंडाला फडकी बांधून फिरणारी तुमची generation! दिवसभर खिडक्यांना sunscreen लावलेल्या offices मध्ये बसता आणि मग खा लेकांनो Vitamin-D च्या गोळ्या! दैवाने दिलं अन कर्माने नेलं, म्हणतात ते हेच!"

आबा, भारता बाहेर सूर्योपासना करतात का?” सुमितने नवीन generation घसरलेली गाडी पुन्हा रुळावर आणली.

हो तर! फार प्राचीन काळापासून, जगातील अनेक संस्कृती सूर्योपासक होत्या आणि आहेत! सूर्याचे वेदकाळातील एक नाव होते मित्र. 'मित्र' अथवा 'मिथ्र' या सूर्य देवतेची पूजा करणारा पंथ बांगलादेश, भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, इराक, तुर्कस्तान, इजिप्ट, इटली, जर्मनी, इंग्लंड असा दूर दूर पसरला होता. एकट्या रोम शहरात एके काळी ६८० मित्र मंदिरे होती असा अंदाज आहे. अजूनही अनेक मंदिरांचे अवशेष पाहायला मिळतात.

 
 

Plaque at the London Mithraeum

"तुला एक गंमत सांगतो. यूरोप मधील सूर्योपासक उत्तरायणाचा सण मोठ्या प्रमाणात साजरा करीत असत. आपल्या मकर संक्रांत सारखा. हा 'अजित-सूर्य' अर्थात 'Unconquered Sun' चा उत्सव २५ डिसेंबरला साजरा करत असत. चौथ्या शतकात यूरोप मध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रसार झाला होता, पण नव्याने ख्रिश्चन झालेले लोक हा उत्सव साजरा करणे थांबवेनात. तेंव्हा चर्चने येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस ‘थ्री किंग्स डे’ च्या ऐवजी २५ डिसेंबरला साजरा करायचे ठरवले! यथावकाश उत्सवाचे मूळ मागे पडून 'ख्रिसमस' असे नामकरण झाले!

जगभर साजरा होणारा येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस, हा खरं तर सूर्याचा उत्तरेकडे सुरु होणाऱ्या प्रवासाचा उत्सव आहे! मित्राचा Happy Birthday!

काय मग, सुमित? चालते की नाही तुमचे global politics आणि religion सूर्याप्रमाणे?”

सुमित आणखीन काही बोलणार, इतक्यात बेल वाजली. तेंव्हा दुर्गाबाई म्हणाल्या "अहो! आता जरा आवरते घ्या! जावईबापू आले असतील!"

"हो, हो! आता सुमितने आणलेला केक कापू! आणि मित्रा, सूर्य मंदिरांबद्दल पुन्हा कधीतरी सविस्तर बोलू."

 

 

दीपाली पाटवदकर

संतसाहित्य, खगोलशास्त्र, भूमिती, इतिहास व चित्रकला या सर्वाचा मिलाफ त्यांच्या लिखाणात आहे. ‘चित्र ज्ञानेश्वरी’ हे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवरचे चित्रमय पुस्तक, 'नक्षत्रांची फुले' हे आकाशाच्या गोष्टींचे पुस्तक प्रकाशित. त्यांनी काढलेल्या ज्ञानेश्वरी व आकाशाच्या चित्रांची प्रदर्शने झाली आहेत. त्यांची चित्रे व पुस्तके www.facebook.com/kalaapushpa पाहायला मिळतील.

अग्रलेख
जरुर वाचा
जनसुरक्षा कायद्याविरोधी अपप्रचाराचे षड्यंत्र उधळून लावण्याची गरज : सागर शिंदे

जनसुरक्षा कायद्याविरोधी अपप्रचाराचे षड्यंत्र उधळून लावण्याची गरज : सागर शिंदे

राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेसाठी धोकादायक ठरलेल्या शहरी माओवाद आणि नक्षली चळवळीविरोधात ‘महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा’ प्रस्तावित आहे. यासंदर्भात आवश्यक त्या सूचना आणि प्रस्तावदेखील राज्य सरकारच्यावतीने सार्वजनिक स्वरूपात मागवण्यात आले असून, त्या सूचनांचाही कायद्याचा मसुदा अंतिम करण्यापूर्वी विचार केला जाईल. परंतु, या कायद्याविषयी सध्या मोठ्या प्रमाणात संभ्रमनिर्मिती नक्षली संघटनांकडून सुरु आहे. त्यानिमित्ताने या कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी आणि कायद्याविरोधातील अपप्रचाराचे षड्यंत्र, याविषयी ‘विवेक विचार ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121