मेंटॉर
--------------------
शेजारचा निनाद दादा जे करेल तेच अमेय करायचा. अमेयला "copy-cat" म्हणालं तरी त्याला त्याचं काही वाटायचं नाही.
निनाद अभ्यास करतांना दिसला की हा पण अभ्यासाचे पुस्तक घेऊन बसायचा. निनादची encyclopedia, atlas चाळत बसायची सवय अमेयला बेमालूम लागली. निनाद दादा खूप अभ्यास करायचा, खेळायचा, भरभरून बोलायचा. त्या सगळ्या गोष्टी कळत-नकळत अमेयने आत्मसात केल्या. कॉलेजला गेल्यावर निनादने भांग बदलला, की अमेयचा पण भांग बदलला!
निनादने B.Tech झाल्यावर आता एक start-up सुरु केली आहे. अमेयने निनाद जायचा त्याच कॉलेजला ११ वी साठी admission घेतली, तेच classes लावले! निनाद सारखंच त्याला B.Techकरायचंआहे.
अगदी असंच मामी आजी कडून स्वयंपाक शिकली. तिला "लोणचे वर्षभर कसे टिकवायचे", किंवा "पुरणाच्या पोळीची कणिक किती सैल मळायची" वगैरे experiments न करता, trial & error शिवाय, पहिल्या पासूनच चांगला स्वयंपाक यायला लागला!
ज्ञानेश्वर म्हणतात - एखादी गोष्ट मुळापासून शिकून, त्याविषयी सर्व वाचून,अभ्यासकरून नंतर implement करणे, अशक्य आहे. त्या करिता त्या क्षेत्रातील एकआदर्श व्यक्ती शोधा. आणि त्याच्या प्रमाणे अनुकरण करा.
दगडावर दगड घासून, अग्नी निर्माण करून, दिवा लावण्यापेक्षा दिव्यावर दिवा लावणे सोयीचे आहे. तलाव बांधून पाणी पिण्यापेक्षा ज्याने तलाव बांधला आहे त्याचे कडून पाणी पिणे जसे सोपे आहे, तसे सज्जनांचे अनुकरण केले असता त्याला जे फळ मिळाले तेच फळ विनासायास आपल्या पदरी पडते.
-दिपाली पाटवदकर