#रिओमधून आशेचा अंधुक किरण…

    13-Aug-2016   
Total Views |

भाग ले आणि भाग ले… हिंदीतील हे दोन्हीही शब्द तसे सारकेच पण ते उच्चारताना तुम्हची त्यामागिल मानसिकता आणि शब्दावर दिला जाणारा जोर त्याचा अर्थ पुर्णपणे बदलून टाकतो. एक अर्थ होतो पळ काढणं आणि दुसरा सहभागी होणं. भारतीय बॉक्सर सध्या या अशाच शब्दकोड्यानं त्रस्त आहेत. बॉक्सिंगमध्ये विकासनं क्वॉटर फायनल गाठत ऑलिम्पिक पदकाच्या अपेक्षा कायम ठेवल्यात. मनोज कुमारही प्री क्वॉटर फायनलला पोहचलाय. समस्त भारतीयांच्या पदकाच्या अपेक्षांच ओझं हे दोघंही भारतीय बॉक्सर आपल्या खांद्यावर वाहतायत. पण दुसरीकडे बॉक्सिंग संघटक मात्र अजुनही राजकारणात दंग आहेत. बॉक्सिंगमधिल राजकीय हस्तक्षेपाची गंभीर दखल घेत जागतिक बॉक्सिंग संघटनेनं भारतीय बॉक्सिंग सघटनाच बरखास्त करून टाकली होती. आता काळजीवाहू संघटना आहे पण तीही कणाहीन.

गेली चार वर्ष बॉक्सिंगमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा झालेली नाही. बॉक्सरना जो आधार ऑलिम्पिक संघटनेनं दिला पाहिजे तो मिळत नाही. यंदाच्या ब्राझिल ऑलिम्पिकचेच ताजं उदाहरण घ्या. ऑलिम्पिकच्या नव्या नियमानुसार प्रो बॉक्सिंग आणि वर्ल्ड सीरिज ऑफ बॉक्सिंगमधिल खेळाडूंच्या कामगिरीच्या जोरावर मानांकन मिळणार होते. भारतात सध्या बॉक्सिंग संघटना बडर्तफ केल्यामुळे काळजीवाहू समिती कारभार हाकतेय. या समितीनं भारतीय बॉक्सरर्सना या नव्या नियमाची माहितीच दिली नाही. परिणामी विकास सोडला तर मनोज कुमार आणि शिवा थापा यांना मानांकनचं मिळाले नाही. परिणामी शिवा थापाला पहिल्या फेरीत क्रमवारीतील अव्वल खेळाडूशी झुंझावे लागले, आणि पराभव पत्करावा लागला, मनोज कुमारलाही सिडींग न मिळाल्यामुळ त्यालाही मानांकित खेळाडूंपेक्षा एक मॅच अधिक खेळावी लागली. हे टाळता येऊ शकले असते आणि कदाचित त्यामुळे भारताच्या पदकाच्या अपेक्षाही उंचावल्या असत्या.

गेल्या लंडन ऑलिम्पकमध्ये भारताचे आठ खेळाडू सहभागी झाले होते. यंदा ती संख्या रोडावून अवघ्या तीन खेळाडूंवर आलीय. त्यातील थापाचे आव्हान संपलेय. पण विकास आणि मनोज अजुनही किल्ला लढवतायत.

जिंकण्यासाठी काय लागतं… गुणवत्ता, जिद्द, मानसिक कणकरता, आणि हो जिंकण्याची ईषा. खरंतर ही यादी अशी बरीच वाढत जाईल. हे सगळे गुण आपल्या बॉक्सरमध्य आहेत, नाही आहे ती त्याचा आत्मविश्वास उंचवणारी संघटना. अडचणीच्या वेळी संकंटाशी दोन हात करण्याकरीता भाग ले सांगणारे बॉक्सिंग संघटक उरलेच नसून भाग ले म्हणत पाठीला पाय लावणार्‍यांची संख्या अधिक झालीय.

एवढ्या सगळया विपरित स्थितीतही भारतीय बॉक्सर झुंजतायत. नुसते झुंजत नाहीत तर देशवासियांच्या अपेक्षा पुर्ण करण्यासठी जीवाचे रान करतायत. आता गरज आहे ती या खेळाडूंना आपणा सगळ्यांच्या शुभेच्छाची…

अग्रलेख
जरुर वाचा
अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Bangladeshi राजस्थानातील अजमेर पोलिसांनी २३ वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी घुसखोरी व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या आहेत. व्हिसाशिवाय अवैधपणे बांगलादेशी व्यक्तीने भारतात घुसखोरी केली आणि त्याला तब्बल २३ वर्षानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित अवैधपणे घुसखोरी करणाऱ्याचे नाव हे मोहम्मद शाहिद असून त्याचे वय वर्षे हे ४० आहे. तो अजमेरमधील अंदर कोट परिसरात अवैधपणे वास्तव्य करत होता. एटीएएफने एकूण अकरा कारवायांमध्ये एकूण २१ घुसखोरांना पकडले आहे. दरम्यान, आता दर्गा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121