रिओ ऑलिम्पिकमधील कालच्या सामन्यानंतर भारत आशावादी

    11-Aug-2016
Total Views |

बोम्बल्या देवीचा उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला तिरंदाजीच्या वैयक्तिक गटात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बोम्बल्या देवी लैश्राम हिने पहिल्या फेरीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. बोम्बल्या देवीने ऑस्ट्रियाच्या लौरेन्स बाल्डौसोबत सामन्यात तिने विजय प्राप्त करून पुढील फेरीत प्रवेश केला आहे. दुसऱया फेरीतही बोम्बल्या देवीने चमकदार कामगिरी करत तैवानच्या शीन चाय लीन हिच्यावर मात केली. महिला गटात बोम्बल्या देवीकडून चांगल्या कामगिरीच्या भारतीय चाहत्यांच्या अपेक्षा आहेत.



दीपिका कुमारीचा उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय तिरंदाज दीपिका कुमारीने अचूक लक्ष्यवेध करत अंतिम सोळामध्ये स्थान मिळविले आहे. पहिल्या फेरीत दीपिका कुमारीने जार्जियाच्या ४६ व्या मानांकित क्रेस्टीनाला पराभूत केले आहे. यापूर्वी भारताच्या बोम्बल्या देवी लैश्राम हिने चमकदार कामगिरी करत तिरंदाजीत आगेकुच केली होती. त्यामुळे भारताला तिरंदाजीतून पदकाच्या मिळणाच्या अपेक्षा आहेत.

भारतीय महिला हॉकी संघाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव

महिला हॉकीच्या सााखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ६-१ असा दारुण पराभव केला. त्यामुळे भारतीय संघाच्या स्पर्धेतील भवितव्यावर टांगती तलवार आली आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये सलामीच्या लढतीत जपानविरुद्धचा पहिला सामना अनिर्णित राखण्यात भारतीय महिला संघाला यश आले होते, तर दुसऱया सामन्यात ग्रेट ब्रिटनने ३-० असा धुव्वा उडवला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात चांगल्या कामगिरीची नितांत गरज असतानाही भारताने निराशा केली.
सामन्याच्या पाचव्याच मिनिटाला ऑस्ट्रेलियाने खाते उघडले होते. मग नवव्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाने पुन्हा एक गोल करून सामन्यावर वर्चस्व राखले. दुसऱया सत्रात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा चांगला प्रतिकार केला. मात्र, तिसऱया सत्रात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी लागोपाठ तीन गोल करून ५-० अशी भक्कम आघाडी घेतली. चौथ्या सत्रात ऑस्ट्रेलियाने आणखी एक गोल करून भारतीयांच्या आशा संपुष्टात आणल्या. अखेरच्या क्षणी भारताच्या अनुराधाने एक गोल केला खरा पण तिच्या गोलला काहीच महत्त्व उरले नाही. तोपर्यंत ऑस्ट्रेलियाने सामना ६-१ असा जिंकला होता.

मनोज कुमारची विजयी सलामी, लिथुनियाच्या एव्हल्डासला नमवले

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत मनोज कुमारने गटात ६४ किलो बॉक्सिंगमध्ये लिथुनियाच्या एव्हल्डास पेत्राउस्कासला नमवून पहिला विजय नोंदवला. सामन्यात मनोजने आपल्या उंचीचा फायदा घेत सुरुवाती पासूनच चांगला खेळ केला.
रिओ ऑलिम्पिक स्पध्रेत भारताला आत्तार्यंत एकही पदक मिळवता आलेले नाही. काल झालेल्या सामन्यात भारताच्या विकास यादवने ७५ किलो गटात बॉक्सिंगमध्ये अमेरिकेच्या चार्ल्स् कोनवेलचा पराभव करुन भारताला विजय मिळवून दिला यामुळेच, भारताला बॉक्सिंगमधून पदकाच्या खूप अपेक्षा आहेत.

जितू रायचे रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात

रिओ ऑलिम्पिक २०१६ मध्ये भारतीय नेमबाजांनी निराशा केली असून, १० मी. एअर पिस्तूल प्रकारानंतर जितू रायचे ५० मी. एअर पिस्तुलमधील आव्हान देखील संपुष्टात आले आहे. ५० मी. एअर पिस्तूल प्रकारात जितू रायला १२ व्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यामुळे त्याला अंतिम फेरी देखील गाठता आली नाही.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121