बहुगुणी नाऱळ

Total Views |


भारतामध्ये समुद्र किनारपट्टीला लागून बरीच राज्ये आहेत. या सर्व ठिकाणी रोजच्या आहारात व स्वयंपाकात नारळाचा वापर अविभाज्य आहे. खवलेला नारळ, नारळाचे पाणी, नारळाचे तेल आणि नारळाचे दूध आवर्जून वापरले जाते. घराघरांमधून विविध शुभकार्याच्या सुरुवातीस नारळ वापरला जातो. कलश पूजनावेळी, वाहनपूजन करतेवेळी, प्रवास सुरू करण्यापूर्वी, ओटी भरतेवेळी इ. ‘श्री’ चे प्रतीक म्हणून नारळाला ‘श्रीफळ’ असेही म्हटले जाते. नारळाच्या विविध भागांचाही वापर होतो. झावळीचा वापर खराटा तयार करण्यासाठी, शेंडीच्या केसांचा वापर घासणी म्हणून, समान गादीत ही घालण्यासाठी आणि चुलीत विस्तव पेटविण्यासाठी!! करवंटीचाही वापर तेल काढण्यासाठी केला जातो. असा हा बहुउपयोगी आणि तेवढाच बहुगुणी नारळ...


जसा भारतात विविध राज्यांतून आणि प्रांतातून नारळ वापरला जातो, तसेच जगभरातील एक तृतीयांश जनता नारळाचा वापर करते. बेटांवरील लोकांचा नारळ हा आहारातील अविभाज्य घटक आहे. प्रशांत महासागर येथील बेटांवरील रहिवाशांचा असा समज आहे की, नारळाचे तेल सर्व आजारावरील रामबाण उपाय आहे. आयुर्वेदात याला ‘नारिकेल’, ‘दृढफल’, ‘तुंग’, ‘तृणराज’, ‘सदाफल’, ‘कूर्चशीर्षक’ आणि दाक्षिणात्यक म्हटले आहे. (पर्यायवाची नावे) नारिकेल/दृढफल-याचे फळ कठीण असल्यामुळे. तुंग- अत्युच्च वृक्ष असल्यामुळे. कूर्चशीर्षक- शिरोभागी कूची (टोकासमान) असल्यामुुळे. तृणराज- तृण (गवत) जातीतील सर्वोच्च वृक्ष असल्यामुळे. सदाफल- सदैव फळं लागलेले असल्यामुळे. दाक्षिणात्यक- दक्षिण देशांमध्ये, प्रदेशांमध्ये उत्पन्न होणारा असल्यामुळे. नारळाचे औषधी गुणधर्म नारळ चवीला मधुर (गोड) आहे. पचायला गुरु (जड) व स्निग्ध (तेलयुक्त, स्निग्धांशयुक्त) आहे. शीत वीर्याचे आहे. (शरीरात पचतेवेळी शीत आहे) विविध वात आणि पित्तामुळे होणार्‍या विकारांवर, आजारांवर उपयोगी आहे. नारळाचे पाणी हे त्वचेसाठी वर्ण्य आहे. (त्वचेची कांती सुधारते, डागांना मिटविते) यासाठी नारळाचे पाणी चेहर्‍यावर नियमित लावावे किंवा फेसपॅक नारळाच्या पाण्यात मिसळून लावावा. गोवर-कांजिण्याच्या फोडांवर नारळाचे पाणी लावावे/फोड नारळ पाण्याने धुवावेत. याने फोडांच्या ठिकाणी होणारी आग कमी होते. नारळाचे पाणी/शहाळ्याचे पाणी प्यायल्याने त्वरित ऊर्जा मिळते. हा एक उत्तमपोषणाचा स्रोत आहे. नारळाच्या पाण्याने ताजेतवाने वाटते, थकवा दूर होतो आणि शारीरिक क्षमता आणि खेळाडू क्षमता (athletic performance) सुधारतो आणि अधिक काळ टिकतो. विविध वृक्काच्या (Kidney) मूत्राच्या (Urinary) आणि मूत्राशयाच्या (Bladder ) त्रासांवर नारळाचे पाणी उपयोगी आहे. मूत्रनिर्मिती नीट होऊन त्याचे उत्सर्जन कार्य चांगल्या प्रकारे घडविण्याची क्षमता नारळाच्या पाण्यात आहे. हल्ली गर्भिणी अवस्थेत रोज शहाळ्याचे पाणी पिण्याचे ‘फॅड‘ सुरू आहे. शहाळ्याचे पाणी खूप पौष्टिक आहे, पण याने थंडावा वाढतो. त्यामुळे पावसाळ्यात आणि थंडीत याचा वापर टाळावा. तसेच, ज्यांची कफ प्रकृती आहे, त्यांनी शहाळ्याचे पाणी टाळावे. असे बघण्यात येते की, ज्या मातेने गर्भिणी अवस्थेत नियमित शहाळ्याचे पाणी प्यायले आहे, त्या मातेची मुले बहुतांशी कफाच्या विविध त्रासांनी ग्रस्त असतात (अति तेथे माती)
नारळाच्या तेलाचे औषधी उपयोग तेलाचे विविध उपयोग आहेत. खोबरेल तेल म्हटले की, डोळ्यासमोर केसांसाठी असे काहीसे समीकरण उभे राहते? पण या पलीकडे जाऊनही तेलाचे विविध फायदे आहेत. खोबरेल तेल शुद्ध असल्यास (Virgin oilfree radicals degenerative diseases ) शरीराचे पासून संरक्षण करते. त्यामुळे अंतर अकाली येणार्‍या वार्धक्यापासून बचाव होतो, तसेच विविध पासून ही संरक्षण होते. खोबरेल तेलाचा बाह्य वापर फक्त केसांच्या वाढीसाठी मर्यादित नाही. तेलाचा वापर जखमभरण्यातही उत्तमहोतो. खपली तयार होणे, ती मऊ-मुलायमराहण्यासाठी तेल उपयोगी आहे. (खपली खरखरीत /कडक झाल्यास लवकर निघते. जखमभरल्यावर निघाली की, त्वचेवर डागही राहत नाही) विविध त्वचा विकारांमध्ये स्निग्धतेसाठी रूक्षपणा कमी करण्यासाठी, संक्रमणापासून (infections ) संरक्षणासाठी तेल उपयोगी आहे. खोबरेल तेलाने जखमेवरील दाह (आग) कमी होते. यामुळे तेला-तुपाने/विस्तवाने भाजलेल्या ठिकाणी पाणी न लावता खोबरेल तेल लावावे, आग लवकर शमते आणि पाण्याचा फोडही त्या ठिकाणी तयार होत नाही. जखमलवकर भरून येते आणि त्याचा डागही उरत नाही. करवंटी जाळून निघालेले तेलही व्रणांवर आणि त्वचा विकारांवर लावण्यासाठी उपयोगी आहे. हळद आणि तेल लावण्याची पद्धत आपल्याकडे पूर्वीपासून रुढ असावी. तेलामध्ये जंतुघ्न आणि बुरशीनाशक (Antibacterial, Antifungal & Antiviral  Eczema Psoriasis, Dermatitis ring worm, athlete's foot, thrush, candidiasis ) गुणधर्म आहेत. त्यामुळे त्वचेवर नियमित खोबरेल तेलाचे अभ्यंग केल्यास (विशेषत: पावसाळ्यात आणि थंडीत) त्वचेची प्रतिकारशक्ती उत्तमराहते आणि त्वचा मऊ मुलायमराहते. इ. त्वचा विकारांमध्ये खूप शुष्कता आणि खपल्या बनण्याची प्रक्रिया सुरू असते. खोबरेल तेलातील मलम/किंवा फक्त खोबरेल तेलाच्या नियमित वापराने त्वचा मृदू होते, खपल्या कमी तयार होतात आणि शुष्कता कमी झाल्याने खाज कमी होते. तसेच बुरशीजन्य त्वचा विकार जसे खरूज, व diaper rash  या सर्वांवर उत्तमगुण येतो. सूर्याच्या प्रखर तेजापासूनही (u.v. rays पासून ) त्वचेचे संरक्षण केले जाते. त्वचा सुरुकुतणे, लोंबणे
(sagging(aging spots) आणि त्वचेवरील डाग ) यापासून (prevention) (dandruffconditioner (active ingredient) (additive & preservatives) प्रतिबंध होतो. खोबरेल तेल केसांच्या वाढीसाठी तर उपयोगी आहेच, त्यामुळे टक्कल पडले असल्यास फायद्याचे आहे. केसांमध्ये कोंडा होणे ) उवा, लिखा होणे यावर उपाय आहे. केसांचा पोत सुधारणे आणि केसांचे पोषण खोबरेल तेलाने होते. (म्हणून म्हणून वापरावे) बाजारात विविध प्रसाधने उपलब्ध आहेत, पण त्यात कार्यकारी घटक कमी टक्के असते आणि अन्य रसायने अधिक असते. यापेक्षा नैसर्गिक स्वरूपात उपलब्ध असलेले औषधी गुणधर्मांनी युक्त घटक वापरणे कधीही सोपे आणि स्वस्त ठरते. खोबरेल तेलाच्या आभ्यंतर वापराने विविध मूत्रवह स्रोतांचे विकार (Uti(throat infections) हिरड्यांचे त्रास आणि घशाच्या संक्रमणावर ) फायदा होतो. गोवर, कांजिण्या, नागीण इ. आजारांमध्ये दाह कमी करण्यासाठी आणि आजार लवकर आटोक्यात आणण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर होतो. करवंटीपासूनचे तेल सांधेदुखीवर उपयोगी आहे. नारळ जे भारतात उगवतात ते फार उंच असतात. त्याचा इथे औषधी उपयोग नमुद करते.

कोलेस्टेरॉल वाढण्याच्या भितीने हल्ली आहारातील खोबरं/नारळाचा वापर बहुतांशी लोकांनी कमी केलाय/बंद केलाय. पण, नवीनच आलेल्या संशोधनातून असे लक्षात आले आहे की, याने धमनींमधील (शुद्ध रक्त वाहणार्‍या नलिका-arterial plaquesMCFA (Medium Chain Fatty Acids) गुठळी तयार होण्यावर प्रतिबंध बसतो. रक्तातील प्लेटलेटमधील चिकटपणा तयार होण्यावर रोख बसतो आणि गुठळी तयार होत नाही. म्हणजेच, एवढे दिवस जे हृद्यरोगकारक सांगितले जाते, तेच हृदयरोगरोधक आहे! नारळाने रक्तचाप कमी होतो आणि धमनीवरील दाबामुळे होणार्‍या त्रासांचे प्रमाण रोखता येते. नारळामध्ये ) आहेत. म्हणजे नारळाचे शरीरात पचन होण्यासाठी खूप कालावधी लागत नाही. याने पचनप्रक्रिया सुधारते आणि चरबीनिर्मिती टळते. तसेच नारळामुळे अंतःस्राव(ENZYME SYSTEM   Osteoporosis  ) ही प्राकृतरित्या कार्यरत राहतात. पण, ‘अति तिथे माती’ हा नियमकायमलक्षात ठेवावा. नारळाचा जेवणातील वापर मर्यादित मात्रेतच असावा. कारण, स्निग्धांशाची शरीराला असणारी गरज ही मर्यादितच आहे. नारळाचा फायदा हाडांवरही दिसून येतो. कॅल्शियमआणि मॅग्नेशियमचे शरीरात शोषण नारळामुळे सुधारते. यामुळे दात आणि हाडे मजबूत आणि बळकट तयार होतात टिकतात. अस्थिभंगुरतेपासून प्रतिबंधक होतो. पंचखाद्य, गुळखोबरे इ. स्वरूपात सुके खोबरे नैवेद्यांसाठी वापरले जाते. पंचखाद्य पौष्टिक आणि गुळखोबरं बुद्धिवर्धक आहे. ते नित्य नैवेद्याच्या प्रमाणात खाल्ल्यास उपयोगी आहे. काळे तीळ, आवळा चूर्ण आणि खोबरं एकत्र (समप्रमाणात) करून सकाळ, संध्याकाळ खाल्ल्याने केस काळेभोर राहतात. केस अकाली पिकणे टळते. तसेच अकाली गळणेही कमी होते. नारळाचा कीस, गुळ आणि मध असे मिश्रण एकत्र खाल्ल्याने कृश व्यक्तींच्या अंगावर जरा मांस दिसण्यास/ त्यांचे वजन वाढण्यास मदत होते. नारळाची शेंडी जाळून त्याची राख करावी. ही राख तेलामध्ये घालावी आणि हे चाटण थोड्या थोड्या वेळाने चाटवावे. उचकी थांबण्यास उपयोगी आहे. दम्यातही या राखेचा फायदा होतो. यात राख, सैंधव मीठ आणि तेल हे मिश्रण चाटवावे. दमकमी होतो. नारळाचा वापर आम्लपित्तात, मलविबंध करण्यात, पाळीच्या त्रासांमध्ये आणि वाजीकर म्हणून होतो. असा हा बहुगुणी वृक्ष, ज्याची जोपासनाही खूप करावी लागत नाही. याची लागवड अवश्य करावी. चला तर मग श्रीफळ वापरूया आणि शुभ आणि सुकर आयुष्य जगूया!

                                                                                              वैद्य किर्ती देव

वैद्य कीर्ती देव

वैद्य सौ.कीर्ती देव, एम्.डी. (आयुर्वेद, मुंबई), आयुर्वेदिक कॅास्मेटॅालॅाजिस्ट. आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सेचा २५ वर्षांचा अनुभव. आयुर्वेदातील त्वचा व केशविकारांवरत उपचार तसेच सौंदर्य शास्त्र यांचा सखोल अभ्यास करून “आयुर्वेदिक कॅास्मेटॅालॅाजी” ही संकल्पना विकसित केली. गेली पंधरा वर्ष त्वचा व केश विकारांवर संपूर्णपणे आयुर्वेदिक पध्दतीने उपचार करीत आहेत.
आयुर्वेद व सौंदर्य शास्त्राच्या प्रसारार्थ राष्ट्रीय स्तरावर अनेक शोधनिबंध व लेख प्रसिध्द. 
अग्रलेख
जरुर वाचा
वक्फ सुधारणा विधेयकामुळे देशाचे विभाजन होईल! मौलानाचा देशाप्रति द्वेष

वक्फ सुधारणा विधेयकामुळे देशाचे विभाजन होईल! मौलानाचा देशाप्रति द्वेष

Waqf Amendment Bill २ एप्रिल २०२५ रोजी संसदेत केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी सादर केले आहे. यावेळी त्यांनी वक्फ सुधारणा विधेयकामुळे गरीब मुस्लिम आणि गरीब निराधार महिलांसाठी हा कायदा महत्त्वपूर्ण असल्याचं म्हटलं आहे. एवढेच नाहीतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही वक्फ सुधारणा विधेयकावर संसदेत भाषण केले. यावेळी बोलताना त्यांनी वक्फची एकूण माहिती दिली. त्यावेळी अनेक विरोधकांनी याला विरोध केला. मात्र, त्यांनी वक्फ सुधारणा विधेयकामुळे गरीब मुस्लिम आणि मुस्लिम महिलांना त्याचा फायदा होईल असेही ..

बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानातील वाघाटी प्रजनन केंद्र ठरतोय पांढरा हत्ती; तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नेमणूकच नाही

बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानातील वाघाटी प्रजनन केंद्र ठरतोय पांढरा हत्ती; तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नेमणूकच नाही

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 'वाघाटी संवर्धन प्रजनन केंद्र' पांढरा हत्ती ठरला आहे (rusty spotted cat breeding centre). कारण, 'केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणा'ने (सीझेडए) सूचित केलेल्या तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नेमणूकच लाखो रुपये खर्चुन तयार करण्यात आलेल्या या केंद्रात न झाल्यामुळे याठिकाणी वाघाटींचे प्रजनन गेल्या १३ वर्षात झालेले नाही (rusty spotted cat breeding centre). दै. 'मुंबई तरुण भारत'ने मंगळवार दि. १ एप्रिल रोजी केंद्रातील वाघाटीच्या पिल्लांचे मृत्यूचे वृत्त प्रकाशित केले होते (rusty..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121