मुजोर मान

    25-Jul-2016   
Total Views |

पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडून आल्यानतंर त्यांनी जेव्हा पहिल्यांदा संसदेत पाऊल टाकलं तेव्हा 'हे लोकशाहीचं मंदीर आहे' ह्या पवित्र भावनेने त्यांनी संसदेच्या पायरीवर डोकं ठेवून त्या वास्तूला वंदन केलं आणि मगच आत पाऊल टाकलं. ह्या उलट आम आदमी पक्षाचे भगवंत मान हे पंजाबमधून निवडून आलेले खासदार म्हणे दररोज दारू पिऊन तर्र होऊन लोकसभेत येतात अशी त्यांच्याच पक्षातल्या काही लोकांची तक्रार आहे. अर्थात हा ज्याच्या त्याच्या पक्ष संस्कृतीतला आणि वैयक्तिक वृत्तीतला फरक आहे, पण भगवंत मान ह्यांचे पराक्रम केवळ संसदेत दारू ढोसून येण्यापुरतेच मर्यादित नाहीत. 

गेल्या आठवड्यात भगवंत मान ह्यांनी संसद भवनाच्या आत शिरताना कुठे कुठे आणि कशी कशी सुरक्षा तपासणी होते ह्याचं चित्रीकरण करून तो व्हिडियो स्वतःच्या सोशल मीडियावरून शेअर केला. अल्पावधीतच तो व्हिडियो व्हायरल झाला. सोशल मीडियावरून झालेल्या टीकेनंतर भगवंत मान ह्यांनी तो व्हिडियो काढून टाकला खरा पण तंत्रज्ञानाच्या ह्या युगात माहिती एकदा आंतरजालावर आली की ती कधीही नष्ट होत नाही. भगवंत मान ह्यांच्या ह्या कृत्यामुळे संसदेची पूर्ण सुरक्षा व्यवस्था आता सार्वजनिक झालेली आहे. ही माहिती कुणाच्या हाती पडली असेल हे सांगता येत नाही. देशापुढे दहशतवादाचं एवढं मोठं संकट उभं असताना एखाद्या निवडून आलेल्या खासदाराने जाणून बुजून संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेची माहिती उघड करणे हा निव्वळ बेजबाबदारपणा नाही तर दखलपात्र गुन्हा आहे. हा व्हिडियो व्हायरल झाल्यानंतरही आपण कसलाही गुन्हा केलेला नाही असं तोंड वर करून उर्मटपणे सांगणाऱ्या माजोरी मान ह्यांनी पुढे सर्वपक्षीय खासदारांनी त्यांच्या विरोधात आघाडी उघडल्यामुळे नाईलाजाने बिनशर्त माफी मागितली. परंतु निव्वळ माफी मागून प्रकरण मिटवण्याइतपत भगवंत मान ह्यांचा गुन्हा किरकोळ नाही.      

आपल्या संसदेत अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था असते, कारण राष्ट्रपती आणि पंतप्रधानांपासून ते मंत्र्यांचा, खासदारांचा, उच्च पदावरील सरकारी अधिकाऱ्यांचा, पत्रकारांचा अश्या देशाचा कारभार ज्यांच्या हाती आहे अश्या सर्वच महनीय व्यक्तींचा संसदेच्या दोन्ही सदनांमधून सतत वावर असतो. त्यामुळे भारतीय संसद ही कायमच दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असते. इतकी कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही ती भेदून १३ डिसेम्बर २००१ रोजी संसेदवर लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मुहम्मद ह्या संघटनांच्या दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केला होता. त्यावेळी पोलिसांनी आणि सुरक्षा दलातल्या जवानांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता एके-४७ रायफली आणि स्फोटके घेऊन लढणाऱ्या दहशतवाद्यांशी मुकाबला केला होता. दहशवाद्यांशी लढताना आपले १३ जवान शाहिद झाले होते. त्यानंतर संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेची कसून चौकशी झाली होती आणि करोडो रुपये खर्चून संसद भवनाची सुरक्षा व्यवस्था बदलली गेली होती. ते सगळे प्रयत्न, त्यामध्ये खर्च झालेला पैसा, मनुष्यबळ आणि संसदेवरच्या हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांच्या पवित्र स्मृती, ह्या सगळ्याचा मान ह्यांनी जाणून बुजून अपमान केलेला आहे. ह्या प्रकरणाची कसून चौकशी होईलच, पण मान यांनी हा व्हिडियो का सार्वजनिक केला हे देशाला समजायला हवे. असे व्हिडियो अनावधानाने सोशल मिडियावर टाकण्याइतके भगवंत मान  निश्चितच मूर्ख नाहीत. त्यांनी हे कृत्य दारूच्या नशेत केले की एखाद्या भारत विघातक शक्तीने भगवंत मान ह्यांना हाताशी धरून हे काम त्यांच्याकडून करवून घेतले हे जाणून घ्यायचा भारतीय जनतेला पूर्ण अधिकार आहे. 

अश्याप्रकारचे अजून लेख वाचण्यासाठी मुंबई तरुण भारतचे फेसबुक पेज लाईक करा...

लेख पुढे चालू आहे... 

 

 

 



भगवंत मान यांच्या या एका  कृत्यामुळे परत एकदा संसदेची सुरक्षा व्यवस्था समूळ बदलावी लागेल. त्यासाठी लागणारे करोडो रुपये, मनुष्यबळ हे सगळे ना भगवंत मान भरून देतील ना त्यांच्या आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल. हा सगळा खर्च माथी बसेल तो तुमच्या-आमच्या सारख्या सामान्य करदात्याच्या. देशाच्या सुरक्षा व्यवस्थेला जर एखाद्या माणसाच्या कृत्यामुळे सुरुंग लागत असेल तर त्या माणसाला कठोर शिक्षा व्हायलाच हवी, मग ते कृत्य एखाद्या सामान्य भारतीय नागरिकाच्या हातून होवो किंवा भगवंत मान ह्यांच्यासारख्या खासदाराच्या. कायदा सर्वांपुढे समान असतो हे मान ह्यांच्यासारख्या बेजबाबदार, मद्यधुंद, माजोरी माणसाला कळायलाच हवे.

शेफाली वैद्य

सोशल मीडियावर विविध विषयांवर अभ्यासपूर्ण तरीही रंजक शैलीत लेखन करणाऱ्या मोजक्या लोकप्रिय लेखिकांमध्ये शेफाली वैद्य ह्यांचे नाव गणले जाते. शेफाली वैद्य यांनी पुणे विद्यापीठातून संज्ञापनशास्त्र आणि पत्रकारिता ह्या विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्या मिडिया क्षेत्रात सतत कार्यरत आहेत. दूरचित्रवाणी, सोशल मिडिया, डॉक्युमेंटरी, आंतरजाल इत्यादी विविध क्षेत्रांत त्यांनी काम केलंय. त्या मराठी, इंग्रजी आणि कोंकणी अशा तिन्ही भाषांतून सातत्याने लेखन करीत असतात.

अग्रलेख
जरुर वाचा
हे वक्फ बोर्ड नाहीतर तर हे

हे वक्फ बोर्ड नाहीतर तर हे 'लँड माफिया', योगी आदित्यनाथ यांचा टोला

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वक्फच्या सावळा गोंधळावरून टीका केली आहे. त्यांच्यावर प्रयागराजमध्ये जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. योगींच्या वक्तव्याने लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या वक्फ दुरूस्ती विधेयक, २०२५ च्या आवश्यकतेनुसार समर्थन करण्यात आले, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. त्यानंतर ते म्हणाले की, महाकुंभादरम्यान, वक्फ बोर्ड जमीन त्यांची आहे असे मनमानी कारभार करणारी विधानं करत होत आणि आता मात्र वक्फ बोर्ड हे जमीन लाटण्याचा प्रकार आहे का असा प्रश्न उपस्थित होत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121