खादी म्हणजे काय?

    23-Jul-2016
Total Views |




आजकाल बऱ्याच साड्यांच्या प्रदर्शनात आणि दुकानाच्या जाहिरातीत 'वोवन' साड्या म्हणजे 'विणलेल्या' साड्या इथे मिळतात असे लिहिलेले असते, पण ते बरेचदा दिशाभूल करणारे असते, कारण तसे पाहिले तर कुठलाही कपडा हा 'वोवन' म्हणजे विणलेलाच असतो. पण हे विणकाम कुठल्या सुताने केलंय आणि कुठलं यंत्र वापरून केलंय त्यावर तो कपडा खादीचा आहे की हातमागावरचा की
यंत्रमागावरचा हे लेबल अवलंबून असतं.

खादीची साडी म्हणजे हाताने कातून जे सूत निघतं त्या सुतापासून बनवलेली साडी. एकेकाळी भारतात घरोघरी चरखे असायचे, टकळया असायच्या. स्वतःला, कुटुंबाला लागेल तेव्हढं सूत बरेच लोक घरीच कातायचे आणि ते धागे मगविणकरांकडे नेऊन त्याचं हातमागावर कापड विणलं जायचं. ते खरं खादी आणिहातमागाचं कापड. पण आजकाल हाताने सूत कातणारे लोक दुर्मिळ होत चाललेत, त्यामुळे हातमागावर विणलेल्या साड्यादेखील मशीनवर जिनिंग झालेल्यासुताच्या असतात. ह्या साड्या हातमागावरच्या असतात पण त्यांना खादीचं लेबल लावता येणार नाही. विणकरांच्या प्रदर्शनांमधून विकल्या जाणाऱ्या बहुसंख्य साड्या आजकाल अशा असतात. धागा मशीनचा पण विणकाम हातमागावरचं. ह्यासाड्यांना 'hand-woven' म्हणजे हातमागावर विणलेल्या असं म्हणता येईल, पण ह्या साड्या खादीच्या साड्या नाहीत.

पण आजही भारतात एक-दोन ठिकाणं अशी आहेत की जिथे घरोघरी अजूनही लाकडी चरख्यावर सूतकताई होते. पोंडुरु हे आंध्रप्रदेशमधलं श्रीकाकुलम जिल्ह्यातलं छोटंसं गांव. इथे अजूनही लोक जवळपासच्या शेतात पिकणाऱ्या लोकल कापसापासून सूत काततात. हा कापूस दोन प्रकारचा असतो, लाल आणि पांढरा. पांढऱ्या 'डोंगरी' कापसापासून १००-१०५ काउंट चा तलम कपडा बनतो जो साडी, धोती वगैरेला वापरला जातो तर जाड लाल कापसापासून टॉवेल, चादरी वगैरे कपडे विणले जातात. पोंडूरू खादी हायब्रीड कापसापासून बनत नाही.

पोंडुरु खादी फार वर्षांपासून प्रसिद्ध आहे. अगदी गांधीजींनी सुद्धा ह्या खादीची तारीफ केली होती असे म्हणतात. भारताच्या स्वातंत्र्य लढयातल्या बऱ्याच थोर लोकांनी इथल्या खादीचे कपडे वापरले आहेत. इथल्या सुताची एक खासियत म्हणजे कापूस साफ करायला, कोंबिंग करायला लाकडी फणी नाही तर छोटे, तीक्ष्ण दांत असलेलं इथे मिळणाऱ्या वालूगा नावाच्या एका माश्याच्या जबड्याचं हाड वापरतात. कापूस पिंजायला लाकडी धनुकली वापरली जाते आणि कातायला चरखा. इथे कातलेल्या सुतापासून बनवलेल्या साड्या आणि धोतरं अतिशयमऊ आणि तलम असतात.

दुर्दैवाने पोंडुरु खादी ही कला आज शेवटचे आचके देत आहे, कारण जुन्या सुत कातणाऱ्या बायका म्हाताऱ्या होत चालल्यात आणि नव्या पिढीत कुणाला ह्या कलेत रस नाही. पैसेही जास्त मिळत नाहीत आणि हायब्रीड गुंटूर कापसाच्या आक्रमणामुळे लोकल कापसाची शेतीही दिवसेंदिवस आक्रसत चालली आहे. एकेकाळी ह्या गावात दोनशेच्यावर चरखे चालायचे. आजकाल जेमतेम तीस-पस्तीस चरखे कसेबसे तग धरून आहेत, तेही खादी बोर्डातर्फे मिळणाऱ्या सबसिडीवर. सुत कातणारे लोक कमी झाल्यामुळे साहजिकच इथल्या खादी कपड्याचे भाव कडाडलेत. एकेकाळी पोंडुरु खादी सगळ्यांच्याच अंगावर सरसकट दिसायची, आता फक्त मोजक्याच चोखंदळ लोकांच्या अंगावर हे कपडे दिसतात. तेही किती दिवस हे सांगता येत नाही.

मी नेसलेली साडी ही पोंडुरु खादीची साडी आहे. वापरलेला रंगदेखील नैसर्गिक निळा म्हणजे indigo आहे. ही मी दामा ह्या आंध्रप्रदेश मध्ये हातमाग वीणकरांमध्ये काम करणाऱ्या संस्थेतर्फे भरवण्यात येणाऱ्या प्रदर्शनात घेतलेली आहे. पुण्यात सेनापती बापट रस्त्यावर रत्ना हॉस्पिटलपाशी दामाचं मोठं दुकान आहे जिथे ह्या साड्या विकत मिळू शकतात.

अग्रलेख
जरुर वाचा
बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानातील वाघाटी प्रजनन केंद्र ठरतोय पांढरा हत्ती; तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नेमणूकच नाही

बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानातील वाघाटी प्रजनन केंद्र ठरतोय पांढरा हत्ती; तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नेमणूकच नाही

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 'वाघाटी संवर्धन प्रजनन केंद्र' पांढरा हत्ती ठरला आहे (rusty spotted cat breeding centre). कारण, 'केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणा'ने (सीझेडए) सूचित केलेल्या तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नेमणूकच लाखो रुपये खर्चुन तयार करण्यात आलेल्या या केंद्रात न झाल्यामुळे याठिकाणी वाघाटींचे प्रजनन गेल्या १३ वर्षात झालेले नाही (rusty spotted cat breeding centre). दै. 'मुंबई तरुण भारत'ने मंगळवार दि. १ एप्रिल रोजी केंद्रातील वाघाटीच्या पिल्लांचे मृत्यूचे वृत्त प्रकाशित केले होते (rusty..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121