संवेदनशील मुख्यमंत्री

    21-Jul-2016   
Total Views |

अहमदनगर जिल्ह्यच्या कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे गेल्या आठवड्यात एका अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. ह्या भयानक, बीभत्स आणि विकृत गुन्ह्याने सारा महाराष्ट्र ढवळून निघालाय. ह्या मुलीला जिवंतपणी ज्या नरकयातना भोगाव्या लागल्या त्याचे रिपोर्ट वाचले तर माणूस म्हणवणाऱ्या प्रत्येकाला शरमेने मान खाली घालावी लागेल. २०१६ साली असे गुन्हे स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात घडावेत ही खरोखर दुर्दैवाची गोष्ट आहे.

त्याहूनही दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ह्या अत्यंत निर्घृण अश्या गुन्ह्याचा वापर ह्याच पुरोगामी महाराष्ट्रात अत्यंत खालच्या दर्जाचे जातीय राजकारण खेळण्यात केला जातोय. जेव्हा एखाद्या स्त्रीवर अत्याचार  करून तिची हत्या केली जाते तेव्हा त्या स्त्रीला धर्म नसतो, जात नसते, देश नसतो. तिच्या मारेकऱ्यांसाठी तिची फक्त एकच ओळख असते, तिचं 'बाई' असणं. अश्या वेळी गुन्हा कुठल्या जातीच्या माणसाने  केला ह्यावरून जर समाजाच्या, राजकारण्यांच्या आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिक्रियेची तीव्रता ठरत असेल तर स्वतःला सुसंस्कृत समाज म्हणवून घ्यायला आपण नालायक आहोत.

आरोपींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि ह्या केसचा निकाल शक्य तितका लवकर लागला पाहिजे हे खरेच आहे, पण केवळ ह्या केसमधल्या आरोपींना कडक शिक्षा झाल्याने अशा  घटना भविष्यात घडणार नाहीत असे समजणे भाबडेपणाचे आहे. ह्या गुन्ह्याचा फायदा घेऊन जातीय राजकारण खेळणाऱ्या लोकांनी हे लक्षात घेतले पाहिजे की निव्वळ सत्तेत असलेल्या सरकारला अडचणीत आणण्यासाठी म्हणून ह्या घटनेचा वापर करणे हे अत्यंत हीन दर्जाचे कृत्य आहे. ह्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुखमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात ह्या विषयावर झालेल्या चर्चेला काल विधानपरिषदेतल्या त्यांच्या भाषणात ज्या संयतपणे उत्तर दिले ते खूप महत्वाचे वाटते.

संवेदनशीलता आणि प्रसारमाध्यमप्रेमी दिखाऊपणा ह्यात फरक असतो हे देवेंद्र फडणवीसांनी आपल्या अभ्यासपूर्ण तरीही सेन्सिटिव्ह भाषणात दाखवून दिले. सरकारला बदनाम करण्यासाठी ह्या केसमधल्या आरोपींचे मंत्र्यांबरोबरचे खोटे फोटो प्रसिद्ध करणाऱ्या धनंजय मुंडेसारख्या बेजबाबदार विरोधी पक्षनेत्यांचे माप तर मुखमंत्र्यांनी त्यांच्या पदरात टाकलेच पण कोपर्डी प्रकरणाचा तपास करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या विशेष तपास पथकात रश्मी शुक्लांसारख्या कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकाऱ्याची निवड करून आपण ह्या गुन्ह्याचा तपास किती गंभीरपणे घेतोय हे दाखवून दिले. कोपर्डी गावाला भेट न देण्याचा निर्णय आपण केवळ पॉस्को कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आणि पोलिसांच्या तपासात व्यत्यय येऊ नये ह्याच कारणांमुळे घेतला हे सांगतानाच गुन्हा दाखल करण्यात आणि गुन्हेगारांवर कारवाई करण्यात दिरंगाई झालेली नाही हे मुखमंत्र्यांनी पुराव्यानिशी दाखवून दिले. कुठल्याही आवेशाविना केलेले हे अत्यंत संयत तरीही अभ्यासपूर्ण भाषण
मुख्यमंत्र्यांच्या आजवरच्या सर्वोत्तम भाषणांपैकी एक म्हणून गणले जाईल ह्यात शंका नाही. ह्या भाषणाने जनतेत मुख्यमंत्र्यांबद्दलचा विश्वास
वाढलेला आहे हे नक्कीच, पण त्याचबरोबर अपेक्षाही वाढलेल्या आहेत. अश्या घटना पुन्हा घडू नयेत ह्यासाठी सरकारने पावले उचलणे गरजेचे आहे.

ह्या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पूर्ण होऊन गुन्हेगारांना कडक शिक्षा झालीच पाहिजे ही तमाम जनतेची फडणवीस सरकारकडून अपेक्षा आहे. कारण असे निर्घृण गुन्हे जोपर्यंत घडत राहतील तोपर्यंत 'बेटी बचाव, बेटी पढाव' सारख्या सरकारी धोरणांना काहीही अर्थ राहणार नाही.

कोपर्डी अत्याचार प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य:

शेफाली वैद्य

सोशल मीडियावर विविध विषयांवर अभ्यासपूर्ण तरीही रंजक शैलीत लेखन करणाऱ्या मोजक्या लोकप्रिय लेखिकांमध्ये शेफाली वैद्य ह्यांचे नाव गणले जाते. शेफाली वैद्य यांनी पुणे विद्यापीठातून संज्ञापनशास्त्र आणि पत्रकारिता ह्या विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्या मिडिया क्षेत्रात सतत कार्यरत आहेत. दूरचित्रवाणी, सोशल मिडिया, डॉक्युमेंटरी, आंतरजाल इत्यादी विविध क्षेत्रांत त्यांनी काम केलंय. त्या मराठी, इंग्रजी आणि कोंकणी अशा तिन्ही भाषांतून सातत्याने लेखन करीत असतात.

अग्रलेख
जरुर वाचा
बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानातील वाघाटी प्रजनन केंद्र ठरतोय पांढरा हत्ती; तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नेमणूकच नाही

बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानातील वाघाटी प्रजनन केंद्र ठरतोय पांढरा हत्ती; तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नेमणूकच नाही

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 'वाघाटी संवर्धन प्रजनन केंद्र' पांढरा हत्ती ठरला आहे (rusty spotted cat breeding centre). कारण, 'केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणा'ने (सीझेडए) सूचित केलेल्या तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नेमणूकच लाखो रुपये खर्चुन तयार करण्यात आलेल्या या केंद्रात न झाल्यामुळे याठिकाणी वाघाटींचे प्रजनन गेल्या १३ वर्षात झालेले नाही (rusty spotted cat breeding centre). दै. 'मुंबई तरुण भारत'ने मंगळवार दि. १ एप्रिल रोजी केंद्रातील वाघाटीच्या पिल्लांचे मृत्यूचे वृत्त प्रकाशित केले होते (rusty..

छत्रपती शिवाजी महाराज भारताच्या शाश्वत विजयाचे प्रेरणास्त्रोत

छत्रपती शिवाजी महाराज भारताच्या शाश्वत विजयाचे प्रेरणास्त्रोत

"छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या शाश्वत विजयाचे प्रेरणास्त्रोत आहेत. शिव चरित्राचा अभ्यास करून आपण त्यांच्या ऋणानुबंधाशी जोडले जातो. शिवचरित्र कायम संघर्षाची प्रेरणा देते. म्हणूनच त्यांस युगंधर, युगप्रवर्तक आणि युगपुरुष म्हणतात. एक व्यक्ती आणि राजा म्हणून शिवाजी महाराजांचे चारित्र्य अनुकरणीय आहे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. नागपुरातील मुंडले सभागृहात 'युगंधर शिवराय' हे पुस्तक नुकतेच सरसंघचालकांच्या शुभहस्ते प्रकाशित झाले. त्यावेळी ते बोलत होते. Yug..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121