बाघी चित्रपटातील मुख्य अभिनेता टायगर श्रॉफ याचा आगामी चित्रपट फ्लाईंग जाटचे नावे पोस्टर आज प्रदर्शित झाले आहे. या पोस्टरमध्ये टायगर श्रॉफचा आणि धावपटू नेथन जोन्सचे चित्रीकरण करण्यात आले आहे.
रेमो डिसुझा दिग्दर्शित "फ्लाईंग जाट" या चित्रपटाचे ट्रेलरदेखील आज २:३० वाजता प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफ, जॅक्लीन फर्नांडीस आणि प्रसिद्ध धावपटू नेथन जोन्स हे मुख्य भूमिकेत असणार आहेत.
हा चित्रपट येत्या २५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. याआधी फ्लाईंग जाटचे टीझर प्रदर्शित झाले होते. सुलतान आणि ग्रेट ग्रँड मस्ती नंतर आता मोहेंजोदारो आणि फ्लाईंग जाट या दोन्ही चित्रपटांना कसा प्रतिसाद मिळतो हे लवकरच कळेल.