#Whatsapp Buddiesओह गॉड माय फोन वॉज लॉक..

    09-Dec-2016   
Total Views |


( समीरा ११ वी इयत्तेतील मुलगी, नुकताच स्मार्ट फोन हातात आलेला, आई वडिलांना कूल ग्रुपच्या cool गमती कळू नये म्हणून, त्यावर तिने सगळीकडे लॉक लावून ठेवला.  आईने तिच्या नकळत पासवर्ड बघून तिचा फोन चेक केला आणि झालं... बिनसलं...

त्यातच आली समीराची मैत्रिण रेणुका)

समीरा : रेणु I am so irritated yar.. मम्मा ने सगळं बघितलं. मला नाही आवडलयं हे. अगं मला विचारलं असतं ना?

रेणुका : अगं its ok chill.. काही सापडलं का पण काकू ला?

समीरा : हो.. माझं आणि परेशचं चॅट होतं. आणि मियारा, रेश्मा, तू आणि मी आपल्या ग्रुप वरचं पण सगळं वाचलं आईने.. खूप चिडलेली.काय बोलता का बोलता वगैरे. अगं आता paresh is my BFF (best friend forever) .. you too know कि आमच्यात असं काहीच नाहिये. तरी पण तू त्याच्याशी का बोलतेस? एक मुलगा आणि एक मुलगी कधीच बेस्ट फ्रेंड असू शकत नाही वगैरे लेक्चर दिलं तिने मला. this is so bad yar.... i hate my mom..

रेणुका : shut up sammy,, वेड लागलयं का तुला... how dare you to say that u HATE her.. she is ur mom god damn it.. तू तुझ्या आईलां कसं हेट करु शकतेस. comeon यार.. no matter what she is ur mom. आणि i understand.. तुला राग येणं सहाजिक आहे. पण तू बघते आहेस, आताचे प्रॉब्लेम्स.. तिला काळजी वाटली असणार तुझी.

समीरा : cool, you take her side ok... तुला पण तीच योग्य वाटते ना. it creates distrust between us man... आता मला लॉक पण चेंज करावा लागला.




रेणुका : अगं make her ur best friend.. तु तिच्याशी काही शेअरच करत नाहीस. मग तिला तुझ्या लाईफ बद्दल curiosity असणारच ना. आता तिला परेश कोण हे पण माहीत नाही. मग ती असाच विचार करणार. तू कॉलेज मधून घरी येवून जर तिच्याशी सगळं शेअर केलस, तिला परेशच्या आणि तुझ्या गमती जमती सांगितल्या, आपल्या ग्रुप मध्ये होणाऱ्या टिंगल टवाळक्या, talking about our crushes सांगितलं तर तुला तुझी मॉम पण cool वाटायला लागेल.

समीरा : अगं वेडी झालीयेस का? तिला आपल्या जनरेशनच्या गमती कशा कळणार. आणि परत हे करु नकोस ते करु नकोस ही कॅसेट सुरुच राहणार ना. आणि I am tensed.. तिने बाबांना सांगितलं तर माझं काही खरं नाही. यू नो ही इज अमरीश पुरी डॅड.

रेणुका : देवा.... आपल्या आई बाबांना काहीही बोलतेस तु सॅमी. see I am a best friend of my mom.. so as she.. मी अगदी सगळंच जरी सांगत नसले, तरी IMP गोष्टी नक्कीच सांगते. तिला माझ्या बद्दल माहीत असलं की तिला curiosity राहत नाही. आणि more over i like sharing things with her.. आणि काही झालं तरी मी चुकले किंवा तिला काही पटलं नाही तर ती रागवतेच. but त्यामुळे आमचं bonding काही खराब होत नाही अगं.

समीरा : you are luckey.. ur mom is cool.. माझी आई cool नाहीये गं...

रेणुका : तू तिला cool च्या नजरेनं बघतच नाहीस कधी. try it once...

समीरा : R u sure?

रेणुका : नक्कीच...

( १ महिन्यानंतर)


रेणुका : अगं सॅमी काय भारी pics टाकलेत काकूने तुझे आणि तिचे... दोघी looking dashing 
समीरा : आयला खरंच?  आई पण  technosavvy झाली बघ.
you were right renu.. अगं मी आई सोबत हळु हळु सगळं शेअर करणं सुरु केलं. आणि यू नो शी लव्ड दॅट. परवा नाही का? परेश ने मितालीला प्रपोझ केलं. ते पण तिला सांगितलं. तिचं टेन्शनच गेलं बघ. आता मी तिच्या सोबत पण हॅंग आऊट करते.. थँक्स रेणु... आणि आता माझ्या मोबाईल ला लॉक पण नसतो... :)

रेणुका : दॅट्स लाइक माय गर्ल...

( आपण आपल्या पेरेंट्स सोबत कूल असलो की ते ही आपल्या सोबत कूल असतात. एकदा आपण ट्राय करुन पहावं. कदाचित मोबाईल ला लॉक लावायची गरजच पडणार नाही...)

निहारिका पोळ

रानडे इन्टिट्यूट पुणे विद्यापीठातून पत्रकारितेत पद् व्युत्तर शिक्षण. सध्या वेब मुंबई तरूण भारत येथे उपसंपादक. मूळ गाव जबलपूर. कथक नृत्यात अलंकार. कला, संस्कृती, युवांशी संबंधित विषयांवर लिहिण्याची आवड. 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121