#Whatsapp buddies- कमऑन आय डोन्ट वॉन्ट दिस ग्रुप..... 

    30-Dec-2016   
Total Views |
 
दीपीका आणि सोनम बालपणीच्या मैत्रिणी. आता वेगवेगळ्या कॉलेज मध्ये आहेत, मात्र शाळेत अगदी एका बाकावर बसायच्या. त्यांच्या शाळेच्या कॉमन मित्र मैत्रीणींचा ग्रुप आहे. त्यातील काहींनी मिळून व्हॉट्सअॅपवर देखील फ्रेंडशिप फॉरेव्हर नावाचा ग्रुप तयार केला, त्यात इतरंही कॉलजची मंडळी होतीच. मात्र सगळ्यांनाच दीपीका ओळखत नव्हती म्हणून तिने ग्रुप मध्ये तिला अॅड करण्यास नकार दिला. आणि त्यावरुनच दीपीका आणि सोनमचं वाजलं..

दीपीका : सोनम अगं प्लीज मला अॅड करु नकोस त्या ग्रुप मध्ये. त्यात आपल्या कॉमन फ्रेण्ड्स पैकी ४-५ च आहेत बाकीच्या कुणालाच ओळखत नाही अगं मी. प्लीज नको सारखं अॅड करुस मला.
 
सोनम : चिल दिपा, काय अगं हे. plzz dont behave like a school girl.. we are in clg nw. meet new people, make them friends हे काय बुळचटासारखं. मला अॅड करु नकोस म्हणे. 
 
दीपीका : अगं, I am not comfortable yar.. सगळ्यांकडे कारण नसताना नंबर जातो, कुणीही मॅसेज करतं मग. you know na कोचिंगच्या ग्रुप वर पण असंच झालेलं.
 
sonam added deepika 
 
deepika left 
 
दीपीका : सोनम नको म्हटलयं ना मी सारखं का अॅड करतेयस? 

 
सोनम : whats ur problem dude.. तू मला का embarrass करतेयस? माझे सगळे फ्रेंड्स विचारताते की या मुलीला इतका काय attitude आहे. 

 
 
दीपीका : यात attitude कसला आलाय? common.. if i m nt cmfrtable m juz nt cmfrtable.. thats it.. 

 
सोनम :  अगं पण का? problem काय आहे तुझा? 

 
दीपीका : see सोनम, मी एक तर त्यात ९०% लोकांना ओळखत नाही. दुसरं म्हणजे त्या ग्रुप वर अनोळखी लोकांचे इतके messges येणार. why i read all those idiotic msgs in which i am nt at all intrested? this is soooo irritating man.. 
 
सोनम : wat.. see deeps m fed up.. मीच मूर्खासारखं माझ्या फ्रेंड्स ना उत्तर देत बसायचंय म्हणजे. तू माझी best friend from childhood आहेस. आणि तूच अशी करणारेस. do whatever you wanna do.. 
 
दीपीका : अगं मी कुठे काय म्हणतेय.. m juz saying k m not comfortable.. thats it.. 
 
सोनम : ok leave it..  
 
(कधी कधी नाही आवडत आपल्याला प्रत्येकच ग्रुप मध्ये अॅड होणं. मग त्यात अनोळखी लोक आणि त्यांचे वीट येई पर्यंतचे मॅसेजेस असतात. होतं असं कधी कधी.. त्याला आपणही फार मनावर घेवू नये.. आवडत नसेल तर लेफ्ट व्हावं ग्रुप मधून... आणि ग्रुपच्या लोकांनी पण फार मनावर घेवू नये... its ok.. its just a whatsapp group.. खरे मित्र मैत्रिणी आपल्याला एखाद्या ग्रुप वर अॅक्टिव असण्यावरुन तसेही जज करणार नाहीतच... )
-निहारिका पोळ

निहारिका पोळ

रानडे इन्टिट्यूट पुणे विद्यापीठातून पत्रकारितेत पद् व्युत्तर शिक्षण. सध्या वेब मुंबई तरूण भारत येथे उपसंपादक. मूळ गाव जबलपूर. कथक नृत्यात अलंकार. कला, संस्कृती, युवांशी संबंधित विषयांवर लिहिण्याची आवड. 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121