#Whatsapp Buddies व्हाय यू हाईड युवर लास्ट सीन?

    23-Dec-2016   
Total Views |



( व्हॉट्सअप वर लास्ट सीन म्हणजे एक प्रकारची लॉयलटी टेस्टच असते. एखाद्या खूप जवळच्या व्यक्तिने 'लास्ट सीन हाईड' केलं की insecurity वाढणारच, आणि त्यातून भांडणं ही निर्माण होणारच. असंच काहीसं झालं समिधा आणि आदित्य सोबत..)

समिधा : आदी तू last seen hide केलंस? दिसत नाहीये.


आदित्य : हो अगं! ऑफिस मधली बरीच लोक रात्री कधीतरी लास्टसीन बघून मॅसेजेस करायला लागतात. मग ते नकोसं होई पर्यंत बोलत बसा.. म्हणून केलं. 

समिधा :
पण आता मला कसं कळणार तू कधी झोपलास ते...? 


आदित्य : अगं R u mad or wat? रात्री तुझ्याशीच बोलतो ना मी उशीरा पर्यंत. तुला गुडनाईट केल्या शिवाय झोपलोय का कधी? 


समिधा : अरे but u still stay awake after hanging up.. मी बघितलंय खूपदा.. त्या दिवशी विचारलं पण होतं. भडकलास मग तू माझ्यावर. 


आदित्य : obviously.. तू अगदी शक्की असल्यासारखी विचारत होतीस काय करत होतास म्हणून... मग काय करणार मी.?




समिधा : हो पण.. when i see ur last seen i knw that you will reply soon...

आदित्य : ते तुला मॅसेजेसच्या ब्लू टिक वरुन सुद्धा कळेलच की. हल्ली तर तो ही वैताग झालाय नुसता..


समिधा : what do u mean? वैताग का? मी कधी तुला मॅसेजेस करुन त्रास दिलाय रे.. 


आदित्य : त्रास दिला कुठे म्हणतोय मी. बरेचदा i am in hurry.. मी फक्त मॅसेजेस चेक करुन बॅक करतो.. पण मग लगेच reply का केला नाहीस? ignore का करतो आहो? ऐक ना मी काय म्हणतेय वगैरे तुझे मॅसेजेस येतात. तुलाही माहीत आहे, मी कुणालाही ignore केलं तरी तुला करणार नाही.

समिधा : i know.. पण i like to see ur last seen.. it is kind of assurence की सगळं ठीक आहे.

आदित्य : समिधा... dnt b kiddish.. तू मला कधीही कॉल करु शकतेस, मॅसेज करु शकतेस हे तुला नव्याने सांगायच का मी? काय assurence हवाय तुला. मी ठीक नसेन तर मी व्हॉट्सअॅप बघत बसणार आहे का? आणि समजा मी ४ तास व्हॉट्सअॅप बघितलंच नाही तर म्हणजे मी ठीक नाहिये का? इतकी impulsive नको होवूस अगं. 



समिधा : i am sorry.. पण मला जे वाटलं ते बोलले. 


आदित्य : अगं तुझ्याशीच रात्री उशीरा पर्यंत बोलतो मी. आणि विसरु नकोस आपले आई वडील आता टेक सॅवी झाले आहेत. परवाच आई विचारत होती रात्री ३ पर्यंत काय करत होतास व्हॉट्सअॅप वर म्हणून.. वैताग आताय राव.. i cant be available for everyone at anytime समिधा.. समजून घे.. and its just a last seen god damn it.. 

समिधा : अरे हो, प्लीज आता चिडू नकोस. ठीक आहे.. मी नाही बोलणार काही.. 


आदित्य : thanks a lot.. करतो मी मॅसेज जरा डोकं शांत झालं की.. 

समिधा : सॉरी 

आदित्य : इट्स ओके, आय नो यू.. सवय होईल हळू हळू तुला, चिल.

समिधा : hmmmmm... 

(खरंय ना आदित्य चं? नाही राहू शकत आपण available सगळ्यांसाठी, ते ही नेहमीच. लास्ट सीन, ब्लू टिक या सगळ्या सुविधा असल्या तरीही ती एक प्रकारची कटकटच आहे. असंच अनेकांचं मत आहे. कारण आपण मॅसेज बघितला आणि उत्तर देण्यात उशीर झाला, किंवा उत्तर देता आलं नाही तर लगेच आपण समोरच्या व्यक्तिला ignore करतोय असाच समज होतो. बरं त्यात समोरच्या व्यक्तीचाही दोष नाही.. टेक्नोलॉजी चीज ही ऐसी है. लास्ट सीन आणि ब्लू टिक मध्ये facial expressions नाही ना दिसत. ते दिसले असते तर  आणि निम्मे प्रॉब्लेम्स सुटले असते आणि काही प्रॉब्लेम्स वाढले ही असते बरं का.,..)

निहारिका पोळ

रानडे इन्टिट्यूट पुणे विद्यापीठातून पत्रकारितेत पद् व्युत्तर शिक्षण. सध्या वेब मुंबई तरूण भारत येथे उपसंपादक. मूळ गाव जबलपूर. कथक नृत्यात अलंकार. कला, संस्कृती, युवांशी संबंधित विषयांवर लिहिण्याची आवड. 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121