सर्वसाक्षी सूर्य

    21-Dec-2016
Total Views |

“आबा, आज मी जय्यत तयारीनिशी आलो आहे, दूरचा प्रवास करायचा म्हणजे चांगलीच तयारी हवी ना?”, सुमित त्याची जड sack पाठीवरून उतरवत म्हणाला.

“मी छानशी शिदोरी पण बांधून देते, मजल दरमजल करत पृथ्वी प्रदक्षिणेला निघालेले सूर्योपासक वीर तुम्ही!”, दुर्गाबाई दोघांच्या हातात कांदे पोह्याची बशी देत म्हणाल्या.

“आजी, आबांसाठी एक चहाची किटली दे, आणि माझ्यासाठी मात्र काय तहान-लाडू, भूक-लाडू बांधून देणार ते दे!”, सुमित म्हणाला.

“हंम्म! एक चहाची किटली आणि एक मस्त पुस्तक. बास! मग इकडचं जग तिकड झालं ...” 

“... की जगाच्या तिकडच्या बाजूची सूर्य मंदिरे बघा!”, दुर्गाबाईंनी आबांचे वाक्य पूर्ण केले!

“हा! हा! प्रवास करून जगाच्या पाठीवर हिंडण्यापेक्षा हा बरा उपाय आहे!”, आबा म्हणाले. 

“मग निघायचे जगाच्या पलिकडची सूर्य मंदिरे पाहायला?“, सुमितने विचारले.

“सुमित, मंदिर ही बाहेरची पूजा झाली. आपण आज ‘आतली’ पूजा पाहू. म्हणजे सूर्या विषयी भारतात आणि भारता बाहेर मनातील भावना काय होती, ते पाहू. मागे आपण भारता पासून अमेरिकेपर्यंत सूर्याची ‘मित्र’ या नावाने उपासना पहिली आहेच. आज वेगळ्या दृष्टीने सूर्योपासना पाहू.

“भारतापासूनच सुरुवात करूया. ऋग्वेदातील पुरुषसुक्ता मध्ये, पुरुषाचे, किंवा विश्वदेवाचे म्हण, वर्णन असे केले आहे -

च॒न्द्रमा॒ मन॑सो जा॒तः । चक्षोः॒ सूर्यो॑ अजायत ।
मुखा॒दिन्द्र॑श्चा॒ग्निश्च॑ । प्रा॒णाद्वा॒युर॑जायत ॥

“अर्थात, हे विश्वेश्वरा! तुझ्या मना पासून चंद्राचा जन्म झाला. डोळ्यातून सूर्याचा. मुखातून इंद्र व अग्नी प्रकटले, तर तुझ्या श्वासातून वायू अवतरला!

“आपण सूर्योपासना पाहत असल्याने, यातील महत्वाचे काय पाहायचे आहे तर हे – विश्वपुरुषाचा डोळा म्हणजे सूर्य, ही कल्पना.

“आता भारताच्या पश्चिमेला प्रवास करू. जवळच्याच पर्शिया मधली ही संकल्पना पाहा – अहुर माझदा हा पारसी जनांचा अनादी अनंत देव. आकाशात राहणारा, चांदण्या रात्रीची शाल पांघरणारा देव. अहुर माझदाचा डोळा म्हणजे सूर्य!       

“पर्शियाच्या पलीकडे मेसोपोटोमिया मध्ये जाऊ. साधारण तीन – साडेतीन हजार वर्षांपूर्वी.  मिटान्नी राजांच्या काळात अशी भावना होती की - सूर्य, म्हणजे ‘मित्र’ सर्व काही पाहतो, त्यामुळे त्याच्या पासून काही लपवता येत नाही. राजे लोक मित्र देवतेला साक्षी ठेवून तह करत असत. १४०० BCE मध्ये, मिटान्नी राजाने हिताईतस् राजा बरोबर केलेल्या एका तहात मित्र, वरुण, इंद्र व अग्नी यांना साक्षीदार केले आहे.

“मित्र म्हणजे सूर्य हा सर्व साक्षी, सर्व काही पाहणारा देव अशी भावना, मेसोपोटोमिया मधली.        

“आणखी थोडं पश्चिमेला ग्रीस राज्यात जाऊ. ग्रीक अख्यायिका अशी की ओरफियस् नावाचा एक प्राचीन कवी, गायक होता. त्याला कवितेचा जनक म्हणत. या सूर्योपासक कवीने सूर्याला उद्धेशून लिहिलेल्या प्रार्थनेत म्हणले आहे -  

Hear golden Titan, whose eternal eye
With broad survey, illumines all the sky.

Lord of the seasons, with thy fiery car

And leaping coursers, beaming light from far.

“अर्थात, हे कनकादित्य! तुझा अमर नेत्र, सर्व काही पाहणारा नेत्र, नित्य आकाश उजाळतो. हे ऋतूपती! तुझ्या अग्निरथातून तू प्रकाशाची उधळण करीत जातोस!”

“इथे महत्वाचे काय पाहायचे आहे तर, सूर्य म्हणजे आकाशातील नेत्र ही ग्रीक संकल्पना.

“आता इथून थोडं दक्षिणेला ईजीप्ट मध्ये जाऊ. प्राचीन काळी इथले लोक Horus नावाच्या आकाश देवतेची पूजा करीत असत. या देवतेचा डोळा म्हणजे Ra, अर्थात सूर्य. आकाशाचा डोळा, सूर्य! इथपर्यंत ‘सूर्य म्हणजे डोळा’ ही कल्पना होती, इथून पुढे literally एक मानवी डोळा असे चिन्ह तयार झाले.
Eye of Ra. PC: symboldictionary.net

“The Eye of Ra किंवा The Eye of Horus ही सर्वसाक्षी देवता आहे. यालाच नंतरच्या काळात All seeing Eye असे म्हणत किंवा Eye of Providence अर्थात Eye of God असेही म्हणतात.

“ख्रिश्चन धर्मात हा सर्वसाक्षी डोळा, सूर्याच्या किरणांसह, Holy Trinity च्या त्रिकोनात बद्ध केलेला दिसतो. अनेक चर्चवर, येशूच्या चित्रांमध्ये पण हा डोळा दिसतो.

चर्चच्या भिंतीवरील चित्र. PC: photoukraine.com

“French Revolution दरम्यान All Seeing Eye चे चिन्ह अज्ञानाचे ढग वितळवणारा ज्ञान सूर्य या अर्थाने वापरले होते. त्यांच्या Declaration of Human Rights वर All Seeing Eye चे चिन्ह होते.Declaration of Human Rights, France 1789. PC: Wikipedia

“आणि हाच Eye of Providence अमेरिकेच्या सीलवर आहे. त्रिकोनात बद्ध केलेला सर्वसाक्षी सूर्य. एक डॉलरच्या नोटवर हा सर्वसाक्षी आकाशाचा डोळा दिसतो – “, आबा म्हणाले.

सुमित म्हणाला, “आबा, असा All Seeing Eye तर अनेक कंपनीच्या logo मध्ये पण दिसतो जसे –

“एकूण, जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी, कळत नकळत सगळे तुमच्या सारखेच दिव्य सूर्योपासक आहेत!”, दुर्गाबाई म्हणाल्या.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121