(नम्रता आणि जुई चैट करत असताना..नम्रता तिच्या कॉलेज ग्रुप सोबत कँटीन मध्ये बसली आहे तर जुई घरी...जुई व्हॉइस मैसेज पाठवते)
जुई : namu just stay away from sudiksha, you know how cheap she is.. just dont trust.. आज मी नाहिये कॉलेजला उगाच ती तुला घेवून जायची भलतीकडे...
(नम्रता नकळतपणे ते व्हॉइसनोट मोठ्याने ऐकते..)
सुदीक्षा : wow...this is wat you people think about me??? बरं झालं लवकरच कळलं.. thanks a lot namrata... आणि हो जुईलाही सांग आता मला सॉरी ही नकोय आणि ही फ्रेंडशिपही. तु आणि जुई असाल जुन्या शाळेतल्या मैत्रिणी... But i thought i got great friendz who never judge me... Now its over...
नम्रता : अगं सुदीक्षा ऐक... Plzz listen to me...
...…..........................
नम्रता : जुई have u gone mad or wat?? असा व्हॉइस नोट पाठवायची गरज काय होती अगं?? She was sitting next to me n she heared it all...
जुई : वॉट... हे काय केलस तू.. मूर्ख...व्हॉइस नोट होता तो... मोठ्याने कधी व्हॉइसनोट ऐकतात का? का केलस यार तू असं...
नम्रता : मी खरं सांगतेय मी मुद्दाम केलं नाही जुई.
जुई : नमु बास हान... आपण सुदीक्षा बद्दलच बोलत होतो.. मग तुला कळायला नको, की तो व्हॉइस नोट तिच्या बद्दलच असणार..
नम्रता : अगं हो पण, मला काय माहीत होतं तू असं काही बोलली असशील.. तुला तरी कळायला हवं ना... If i am telling u i am sitting with her मग का असलं भलतं काही पाठवायचं?
जुई : अगं तू नेहमी हैंड्सफ्री वापरतेस ना मग आज काय झालं होतं तुला.?
नम्रता : मूर्खासारखी बडबड करु नकोस जुई. चूक तुझी आहे.
जुई : वाह.. look whos talking.... तुझी चूक होती नमु..
आणि तुझं काय गेलं गं.. सगळ्यांसमोर वाईट तर मी झाले नां... Juz leave it namu.. i really dnt wanna talk now....
जुई ऑफलाइन...
( नम्रता कैंटीन मध्ये हातात फोन घेवून एकटीच बसली आहे....)
खरं तर व्हॉट्सअैप चा व्हॉइसनोट हा प्रकार रिस्कीच आहे. एखाद्या पर्यंत आपल्या भावना पोहोचवण्यासाठी शब्दांसोबत आवाजही महत्वाचा असतो. व्हॉइस नोट हे त्यासाठीच असतात.. पण असं काही झालं तर त्याचा नात्यांवर वाईट परिणामही होवू शकतो नाही का? एखाद्यावेळी लक्ष नसताता चुकून व्हॉइसनोट ग्रुपवर जाणं, किंवा चुकीच्या व्यक्तिला जाणं हे आता अगदीच कॉमन झालयं.. पण व्हॉइसनोट हे देखील भक्कम पुरावे असतात. चुकून एखाद्याच्या हाती लागल्यास "मी असे म्हटलेच नव्हते" किंवा "मला तसे म्हणायचे नव्हते" असं म्हणता येत नाही... नाती मनापासून जपायची असतील तर तंत्रज्ञाच्या या व्हॉइसनोट सारख्या गोष्टींचा वापरही जपूनच केला पाहीजे....
काय म्हणता???
-निहारिका पोळ