#Whatsup buddies? इट्स ऑल अबाउट ट्रस्ट...

    04-Nov-2016
Total Views |


 

अद्वैत : शालिनी मी राघव ने तुला पाठवलेल्या मॅसेजेसचे स्क्रीनशॉट्स आपल्या ग्रुपवर टाकतोय. तो असं करुच कसं शकतो. आमची मैत्री सगळ्यांना माहिती होती. तो माझ्या बद्दल तुला बोलेल हे मला वाटलं ही नव्हतं. मी अजिबात सहन करुन घेणार नाही. सगळ्यांना कळूच देत आता.

शालिनी : अद्वैत थांब! तू असं करु शकत नाहीस. अरे I already told you  की त्याने खूप विश्वासानं मला हे सांगितलयं. मी तुला स्क्रीन शॉट्स पाठवले कारण I thought that it was about you so तुला माहित असायला हवं. पण तू तर सरळ ते स्क्रीनशॉट्स ग्रुप वर टाकायला निघालास. This is not fair.

अद्वैत : का फेअर नाही? तो तुला माझ्या बद्दल काहीही बोलेल आणि मी ते खपवून घ्यायचं? का बरं?

शालिनी :  calm down अद्वैत हे आमचं पर्सनल चॅट होतं, तुझ्यामुळे मी ही अडकेन प्लीज असं करु नकोस. राघव माझाही खूप चांगला मित्र आहे.

अद्वैत : हो का? मग तसं होतं तर मला हे का पाठवलेस. आता पाठवलेच आहेस तर मग माझी बाजू घे ना. आता का त्याचा पुळका आलाय तुला शालिनी?

शालिनी : पुळका ? r u mad or wat? मला ते योग्य वाटत नाहिये म्हणून नको म्हणतेय. आणि मला कुणाचाही पुळका बिळका आला नाहिये.

(स्क्रीनशॉट्स ग्रुपवर टाकल्यावर)

शालिनी : टाकलेसच ना ते ग्रुपवर तू. नको म्हटलं होतं तरीही टाकलेस. केवढा मोठा प्रॉब्लेम क्रिएट केलाएस अद्वैत तू. मीच मूर्ख होते, आमच्या पर्सनल चॅट्स चे स्क्रीन शॉट्स तुला पाठवलेत. आता तू ते ग्रुप वर टाकलेत. आता माझी आणि राघव ची मैत्री तर गेलीच पण तुझी आणि माझी मैत्री ही संपली.

अद्वैत : ओके! ठीके तुला तसं करायचं असेल तर तसं कर पण माझा अपमान मी नाही सहन करुन घेणार हे तुलाही माहीत आहे. बाय. That too for forever.

वरचा संवाद काहीसा ओळखीचा वाटला ना? कदाचित वाटलाही असेल. तंत्रज्ञान काय काय शिकवतं नाही आपल्याला? एका बाजूला या तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे व्यक्ती, परिवार एकमेकांच्या जवळ आले आहेत. पण याच तंत्रज्ञानाच्या दूसऱ्या बाजूमुळे नाती एकमेकांपासून लांब गेली आहे. स्क्रीनशॉट सुद्धा त्याचाच एक भाग आहे. मोबाईलच्या स्क्रीन चा फोटो आपल्याला काढून ठेवता येवू शकतो. यालाच स्क्रीनशॉट असं म्हणतात. खरं तर मोबाईल कंपन्यांनी हे आपल्या सोईसाठी केलं होतं. पण आज याचा वापर फारच वेगळ्या पद्धतीनं होतो आहे. एकमेकांशी झालेला पर्सनल संवाद सर्रास ग्रुप वर किंवा दूसऱ्या कुणाला तरी पाठवण्यात येत आहे. बरेचदा रागाच्या किंव भावनेच्या भरात आपण काहीबाही बोलून जातो. तसंच मेसेज करतानाही होतं. पण बोललेलं विसरणं शक्य असतं मात्र फोटो काढून संग्रह करुन ठेवलेले शब्द नव्हे. यामुळे अनेक मनं दुखावतात, नाती दूर जातात, एकाकीपणा वाढतो.

आपणही राघव, शालिनी आणि अद्वैत सारखे कितीतरी लोक बघितलेच असतील. नेमकं काय होतयं, सत्य समोर आणण्यासाठी वेळप्रसंगी वापरात येउ शकणाऱ्या या तंत्रज्ञानाचा उपयोग खरंच योग्य त्या कारणासाठी होतो आहे, का तंत्रज्ञानानं इतके वर्ष आपसात जपलेल्या विश्वासाची मुळं हलवली आहेत? का याचा समतोल साधण्यात आपण यशस्वी झालो आहोत?

-निहारिका पोळ

अग्रलेख
जरुर वाचा
मंदिर-चर्चपासून थेट गावांपर्यंत

मंदिर-चर्चपासून थेट गावांपर्यंत 'कलम ४०' चा गैरवापर; वक्फ बोर्डाचे धक्कादायक वास्तव उघडकीस!

लोकसभेत १२ तासांबून अधिक काळ चाललेल्या चर्चेनंतर अखेर वक्फ सुधारणा विधेयक पास झाले. दरम्यान विधेयकाच्या बाजूने एकूण २८८ मते पडली, तर विरोधात २३२ मते पडली आहेत. वास्तविक हे विधेयक वक्फ मालमत्तेच्या पारदर्शकतेबाबत आहे, मात्र विरोधक याला धार्मिक दिशा देण्याचा प्रयत्न करत आहेत. खरंतर वक्फ विधेयकात सुधारणा करणे आवश्यक होते. कारण त्यातील 'कलम ४०' त्याला कोणत्याही मालमत्तेवर दावा करण्याची सूट देत होते. अशातून वक्फने शेतकऱ्यांच्या जमिनीच नाही तर मंदिरे आणि चर्चवरही आपला दावा मांडला होता. Waqf Board misuse of ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121